श्रावणबाळ निवृत्तीवेतन योजना असेल किंवा संजय गांधी निराधार योजना असेल या योजनेचे जर तुम्ही लाभार्थी असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे 3 जानेवारी 2025 रोजी महाराष्ट्र शासनामार्फ एक GR काढण्यात आला होता. आणि या शासन निर्णया मध्ये सांगितलं होतं की, श्रावणबाळ निवृत्तीवेतन योजनेचा येणारा तुमचा पगार असेल तो पगार डायरेक्ट MAHA DBT प्रणाली मार्फत येणार आहे.

आता पुढील पोस्ट मध्ये आपण बघणारच आहोत की, नेमकी ही महा डीबीटी प्रणाली आहे तरी काय? दुसरा महत्त्वाचा विषय म्हणजे तुमचा डिसेंबरचा आणि जानेवारी चा पगार लवकरच तुमच्या खात्यावर निर्गमित केला जाईल. त्यासाठी सुद्धा महाराष्ट्र शासनामार्फत जीआर काढण्यात आलेला आहे. आता कोणत्या तारखेला तुमच्या खात्यावरती पैसे येतील हे बघू.
श्रावणबाळ निवृत्तीवेतन योजना l Shravanbal Nivrutti Vetan Yojana
श्रावणबाळ निवृत्तीवेतन योजना नवीन झालेले बदल काय आहे? याची संपूर्ण माहिती आपण या पोस्ट च्या माध्यमातून बघणार आहोत.
तुमच्या खात्यावर जे पैसे येत आहेत ते कसे येतात? आणि दुसरं म्हणजे तुमचा जानेवारीचा आणि डिसेंबरचा जो पगार बाकी आहे, तो पगार केव्हा येणार आहे. सर्वप्रथम बघुयात की MAHA DBT प्रणाली नेमकी काय? तर मित्रांनो हे पगारीचे जे पैसे टाकण्याच्या पद्धती आहेत त्या दोन पद्धती आहेत पहिली म्हणजे BIMS आणि दुसरी म्हणजे जी नवीन आलेली पद्धत MAHA DBT.
हे हि वाचा – मागेल त्याला विहीर योजना 2025
BIMS प्रणाली काय तर BIMS प्रणाली अशी की तुमचा पगार होतो तो बँकेमार्फत होतो. मग ज्या बँकेत तुमचा पगार असेल त्या बँकेला पैसे पाठवले जातात आणि त्या बँकेमार्फत तुमचा पगार केला जातो. तुम्ही बघितल असेल की, काही लोकांचे पगार या ठिकाणी लवकर येतात काही लोकांचे पगार उशिरा येतात. नवीन जी प्रणाली आली ती म्हणजे महा डीबीटी.
महा डीबीटी मार्फत पगार होणार
MahaDBT म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर (Direct Benefit Transfer) जो लाभार्थी असेल किंवा ज्या व्यक्तीचे या योजनेमध्ये नाव असेल त्या योजनेचे पैसे खात्यावरती डायरेक्टर एका क्लिक मध्ये पैसे येतात. म्हणजे जेवढे तुम्ही लाभार्थी असाल जेव्हा तुमच्या खात्यावरती पैसे येतील सर्वांच्या खात्यावर एकाच वेळीच एका सेकंदात पैसे येतात. तिलाच महा डीबीटी प्रणाली म्हणतात. तुम्हाला जेव्हा तुमचा पगार होईल ताबडतोब तुमच्या खात्यावरती हे पैसे टाकले जातील
शासनाचा नवीन शासन निर्णय
3 जानेवारी रोजी नवीन जीआर आलेला आहे. हा जीआर कशाबद्दल आहे? तुमचा डिसेंबरचा आणि जानेवारी च्या पगारा बाबत आहे. तुम्ही जर का बघितलं तर या निराधार योजनेचे किंवा श्रावणबाळ निवृत्ती वेतन योजनेचे लाभार्थी जवळपास 27 लाखांपेक्षा जास्त आहेत. यासाठी महाराष्ट्र शासनामार्फत 400 पेक्षा जास्त कोटीचा निधी वितरित केला आहे.
श्रावणबाळ निवृत्तीवेतन योजनेचे पैसे कधी येणार
official website :- श्रावणबाळ निवृत्तीवेतन योजना
3 जानेवारीला त्याचा जीआर आलेला आहे म्हणजे लवकरच तुमच्या खात्यावरती जानेवारीच्या पहिल्याच आठवड्यात किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये तुमच्या खात्यावरती तुमचा पगार जमा होईल. तुमचा पगार डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचा दीड दीड हजार मिळून तीन हजाराचा पगार तुमच्या खात्यावरती जमा होईल.