श्रावण बाळ निवृत्ती वेतन योजना असेल किंवा संजय गांधी निराधार योजना या योजनेचे जर तुम्ही लाभ घेतला असेल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी देतो तीन जानेवारी 2025 रोजी राज्य शासनामार्फत एक नवीन जीआर काढण्यात आला आहे आणि या शासन निर्णय मध्ये सांगितले आहे की श्रावण बाळ निवृत्ती वतन योजनेचा जो तुमचा पगार आहे तो पगार आता तुम्हाला डायरेक्ट महाडीबीटी प्रणाली मार्फत दिला जाणार आहे.

Shravanbal Nivrutti Vetan Yojana आता आपण बघूयात की नेमकं महाडीबीटी प्रणाली आहे तरी काय दुसरा महत्त्वाचा विषय म्हणजे तुमचा जून आणि पुढील येणारा जुलै चा पगार लवकरच तुमच्या खात्यावर दिला जाणार आहे. ही माहिती सुद्धा त्या नवीन जीआर मध्ये दिलेले आहे आता तुमचे पैसे कधी येतील हे बघूया.
श्रावणबाळ निवृत्तीवेतन योजना l Shravanbal Nivrutti Vetan Yojana
श्रावण बाळ निवृत्ती वेतन योजनात काय नवीन बदल झाले याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला या पोस्टच्या माध्यमातून देणार आहे. मित्रांनो तुम्हाला माहीत नसेल की आपल्या खात्यावर पैसे कसे येतात आणि जून जुलै चा येणारा जो पगार बाकी आहे तो पगार केव्हा येईल. सर्वात आधी बघूयात की महाडीबीटी प्रणाली म्हणजे नेमकं काय तर मित्रांनो ही प्रणाली पगारीचे पैसे टाकण्याची पद्धत आहे त्यात दोन पद्धती आहेत पहिली म्हणजे बीआयएमएस व दुसरी जी नवीन आलेली पद्धत आहे ती महाडीबीटी प्रणाली आहे.
हे हि वाचा – मागेल त्याला विहीर योजना 2025
BIMS ही एक महाडीबीटी सारखीच प्रणाली आहे आणि या प्रणाली द्वारे सुद्धा पेमेंट केले जाते जसे की तुमचे स्थानिक कोणत्याही बँकेत खाते असेल तर त्या बँकेत पैसे पाठवण्याचे काम सुद्धा बी आय एम एस प्रणाली करत असते तुम्ही बघितले असेल की या प्रणाली द्वारे लोकांचे पगार लवकर येतात तर काही लोकांचे उशिरा येतात म्हणूनच आता जी वापरात आहे ती प्रणाली आणावी लागली तिलाच आपण महाडीबीटी असे म्हणतो.
MahaDBT म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर (Direct Benefit Transfer) जे काही लाभार्थी असतील किंवा ज्या व्यक्तीचे या योजनेमध्ये नाव आहे त्या व्यक्तीचे पैसे खात्यावरती डायरेक्ट एका क्लिक मध्ये जातात म्हणजे जेवढे तुम्ही लाभार्थी असाल तेवढ्या लाभार्थ्यांचे पैसे त्यांच्या बँक खात्यावर फक्त काही सेकंदात पाठवले जातात तिलाच महाडीबीटी प्रणाली म्हणतात तुम्हाला जेव्हा तुमचा पगार होईल त्यावेळेस तुमच्या बँकेत याच प्रणाली द्वारे पैसे पाठवले जातात.
शासनाचा नवीन शासन निर्णय
चार मे रोजी शासनामार्फत एक नवीन जीआर काढण्यात आलेला आहे हा जीआर तुमच्या जून जुलै च्या पगाराबाबत आहे बघायला गेलं तर या निराधार योजनेचे किंवा श्रावण बाळ निवृत्ती वेतन योजनेचे लाभार्थी जवळपास 27 लाखांपेक्षा जास्त आहे त्यासाठी महाराष्ट्र महाराष्ट्र शासनामार्फत 400 कोटींपेक्षा जास्त चा निधी वितरित करावा लागतो. म्हणून काही तांत्रिक अडचणीमुळे सर्व निराधार लोकांचे पगार थांबवले होते परंतु ते जीआर मध्ये नमूद करून लवकरच लाभार्थ्यांचे पैसे त्यांच्या खात्यावरती पाठवले जातील असे देखील gr मध्ये सांगितले आहे.
श्रावणबाळ निवृत्तीवेतन योजनेचे पैसे कधी येणार
official website :- श्रावणबाळ निवृत्तीवेतन योजना
जीआर मध्ये सांगितल्याप्रमाणे लवकरच तुमच्या खात्यावरती जून आणि जुलै चे बाकी राहिलेले हप्ते म्हणजेच पगार जुलै च्या पहिल्या ते दुसऱ्या आठवड्यात प्रत्येक लाभार्थ्याच्या खात्यावर जमा होतील. प्रत्येक लाभार्थ्याचे दोन महिन्यांचे पगार अडकलेले आहेत तरी दोन महिन्यांचे मिळून एकत्रित तीन हजाराची रक्कम प्रत्येकाच्या खात्यावरती जमा केली जाईल