प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना : PM Vishwakarma Yojana 2025 आपल्या देशातील पारंपारिक कामगार, कारागीर आर्थिक दृष्ट्या मागासले आहेत. तर त्या लोकांना आर्थिक दृष्ट्या पाठबळ देण्यासाठी भारत सरकारने एक योजना सुरू केलेली आहे. त्या योजनेचे नाव म्हणजे प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना.

प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना : PM Vishwakarma Yojana 2025 आपल्या देशातील पारंपारिक कारागिरांना आर्थिक साह्य मिळावे, म्हणून पीएम विश्वकर्मा योजना सुरू केली आहे. या योजनेतून त्यांना केंद्र सरकार काही पैसे देऊन त्यांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु आजच्या या धावपळीच्या युगामध्ये खूप सारे पारंपारिक व्यवसाय कारागीर मागासलेले आहेत. अशा लोकांना कारागिरांना सक्षम आणि आत्मनिर्भर होण्यासाठी सरकारने प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना चालू केली आहे.
PM Vishwakarma Yojana 2025 : प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना
पी एम विश्वकर्मा योजना 17 सप्टेंबर 2023 रोजी आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केली आहे. केंद्र सरकार या योजनेच्या अंतर्गत सुतार, लोहार, कुंभार, मूर्तिकार, शिंपी, कलाकार आदी नागरिकांना आर्थिक सहाय्य आणि मोफत कौशल्य विकास प्रशिक्षण देणार आहे.
हे हि वाचा –
प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेच्या माध्यमातून फक्त पारंपारिक कारागिरांना किंवा कामगारांना आर्थिक सहाय्य करणे एवढाच उद्देश नसून, त्यांची उत्पादन क्षमता वाढवणे हा आहे. आणि त्यांना आत्मनिर्भर करणे हा एक या योजनेचा मुख्य उद्देश ठेवण्यात आलेला आहे. या योजनेच्या माध्यमातून त्या नागरिकांना अनेक प्रकारचे फायदे दिले जातात. तर आता आपण बघूया कोण कोणते फायदे लाभार्थ्यांना दिले जातात.
प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेचे फायदे : Benefits of Pradhan Mantri Vishwakarma Yojana
पीएम विश्वकर्मा योजनेच्या मदतीने लाभार्थ्यांना तीन लाख रुपयांचे कर्ज मिळवून दिले जाते. या योजनेत दोन टप्प्यांमध्ये कर्ज वाटप केले जाते. पहिल्या टप्प्यात त्या व्यक्तीला एक लाख रुपयांचे कर्ज मिळते. तर दुसऱ्या टप्प्यात त्यांच्या व्यवसायाच्या वाढीसाठी दोन लाख रुपयांचे कर्ज मिळते. या लाभार्थ्यांना हे कर्ज खूपच स्वस्तात मिळते. म्हणजे या कर्जावर फक्त 5 % व्याजदर लावला जातो. अशा लाभार्थ्यांना केंद्र सरकार कौशल्य विकास प्रशिक्षण ही मोफत देते. त्यामुळे त्यांना आत्मनिर्भर बनण्यास मदत होऊ शकते, आणि त्यांचा व्यवसाय वाढू शकतो.
या योजनेमध्ये लाभार्थ्यांना मोफत प्रशिक्षण सरकारतर्फे दिले जाते. आणि प्रशिक्षण कालावधीमध्ये त्यांना 500 रुपये प्रति दिवस आर्थिक सहाय्य ही दिले जाते.
प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर लाभार्थ्यांना PM विश्वकर्मा प्रमाणपत्र आणि आयडी ही मिळतो, त्याचबरोबर लाभार्थ्याला 15000/- रुपये टूलकिट म्हणून मोफत दिले जातात.
डिजिटल इंडिया स्वप्नपूर्ती साठी किंवा त्यांच्या व्यवसायाला प्राधान्य देण्यासाठी केंद्र सरकार लाभार्थ्यांना दर महा इन्सेटिव्ह ही देते.
तर मित्रांनो अशा प्रकारे PM Vishwakarma Yojana 2025 : प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना भारत सरकारने अमलात आणलेली आहे. तुम्हीही पीएम विश्वकर्मा योजनेचा लाभ घेऊन आपला व्यवसाय आर्थिक दृष्ट्या सक्षम करू शकता.