Ladaki bahin money महिला बालकल्याण विभागाने स्पष्ट केले आहे की, माझी लाडकी बहीण योजनेसाठी आता पात्रतेचे नियम अधिक जाचक करण्यात आले आहेत.

सरकारी सेवेत असलेल्या महिलांना योजनेचा लाभ घेता येणार नाही. त्यामुळे जर तुम्ही सरकारी नोकरीत असाल तर तुम्हाला या योजनेतून वगळण्यात येणार आहे. हे पाऊल गरजू लोकांना लाभ मिळावा यासाठी उचलण्यात आले आहे.
जून महिन्याचा माझी लाडकी बहिण हप्ता वितरणासाठी प्रक्रिया सुरू झाली आहे. बँक खात्यांत पैसे जमा होण्यासाठी अजून थोडे दिवस लागणार आहेत. या प्रक्रियेत कोणताही गैरप्रकार होऊ नये म्हणून, विशेष काळजी घेतली जात आहे. लाभार्थ्यांनी आपल्या बँक खात्याची ekyc करून ठेवावी, जेणेकरून पैसे थेट खात्यात जमा होतील.
Ladaki bahin money माझी लाडकी बहीण पैसे
लाडक्या बहिणींना ऑनलाईन पद्धतीने सुध्दा आपल्या खात्यात पैसे जमा झाले आहेत की नाही हे बघता येते. तुमचे ज्या बँकेत खाते आहे त्या बँकेच्या वेबसाईटवर किंवा मोबाईल अॅपवर लॉगिन करावे. त्यानंतर खात्याचा बॅलन्स तपासा किंवा मिनी स्टेटमेंट चेक करा. जर निधी जमा झाला नसेल, तर 2 ते 3 दिवसांनी पुन्हा तपासून बघा.
हे सर्व केल्याने घरबसल्या आपण आपल्या खात्यात पैसे जमा झालेत का नाही जाणून घेऊ शकतो. यामुळे तुम्हाला बँकेत जाण्याची गरज पडणार नाही.
Ladaki bahin money सरकारने ज्या महिलांना अपात्र ठरवले आहे, त्यांची यादी सरकार मार्फत जाहीर करण्यात आली आहे. लाडकी बहिण योजनेत अपात्र ठरलेल्या महिलांना या योजनेचा लाभ कधीच मिळणार नाही. या योजनेत ज्या महिलांनी चुकीची माहिती देऊन, लाभ घेतला आहे, त्यांच्यावर कडक कारवाई होण्याची शक्यता आहे. म्हणून लाभ घेणाऱ्या प्रत्येक लाडक्या बहिणीने आपल्या कागदपत्रांची तपासणी करून घ्या.
ऑनलाइन विवाह प्रमाणपत्र अर्ज कसा करावा? आवश्यक कागदपत्रं व अर्ज लिंक
या योजने बद्दल आणखी काही सुधारणा आणि नवीन नियम पुढील काळात जाहीर होऊ शकतात. सरकारचा येकच उद्देश आहे की, हा निधी गरजू लोकांना मिळावा. त्यामुळे लाभार्थ्याने सरकारी घोषणांवरच विश्वास ठेवावा आणि अफवांपासून दूर राहावे.
या पोस्ट चा मुख्य उद्देश असा आहे की, सरकारच्या या योजनेत पारदर्शकता टिकवून ठेऊन, गरजू महिलांना मदत मिळवून देण्याचा प्रयत्न सरकार कसे करत आहे हे सांगणे आहे.