महाराष्ट्रातील सरकारने युवकांसाठी एक नवीन योजना सुरू केलेली आहे. ती योजना म्हणजे CMEGP योजना – (Chief Minister Employment Generation Programme) आहे. मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना खास करून अशा तरुणांसाठी आहे, जे आपला स्वतःचा व्यवसाय किंवा बिजनेस करू इच्छिता तुमच्यासाठी या योजनेचा खूपच फायदा आहे. महत्त्वाचं म्हणजे तुम्ही 10 लाख रुपयाचं कर्ज घ्याल, तर तुम्ही फक्त 7 लाख रुपये भरायचे आहेत. कारण उरलेले जे 3 लाख रुपये सरकार भरते.

CMEGP योजना जे नागरिक नवीन व्यवसाय सुरू करू इच्छिता त्यांच्यासाठीच आहे. जसं की जर तुम्हाला एखादा वर्कशॉप, वेल्डिंग सेंटर, डेअरी फार्म, अन्नप्रक्रिया युनिट, शिवणकाम, बेकरी, रिपेरिंग दुकान, कॅम्पुटर सेंटर किंवा कोणताही लहान उद्योग सुरू करायचा असेल. तर ही योजना खास तुमच्यासाठी चालू केलेली आहे.
CMEGP योजना 2025 – मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना
जर तुम्हाला CMEGP योजनेचा लाभ मिळवायचा असेल, तर काय करायला हवे. तुम्हाला त्यांच्या CMEGP या पोर्टलवर जाऊन अर्ज करायचा आहे. अर्ज करण्यासाठी मला खालील कागदपत्रे लागतील. जसे की, आधार कार्ड, बँक पासबुक, व्यवसायाचा प्रोजेक्ट रिपोर्ट, शिक्षण प्रमाणपत्र आणि स्वतःचा फोटो. हे सर्व कागदपत्र त्या योजनेसाठी लागतात
तुमच्या अर्जाची तपासणी जिल्हा उद्योग केंद्र म्हणजेच, DIC किंवा बँकेकडून केली जाते. जर तुमची सर्व माहिती योग्य असेल तर तुमचे कर्ज लवकरच मंजूर होते. कर्ज मिळाल्यानंतर तुम्ही तुमचा व्यवसाय सुरू करू शकता. यामध्ये अर्ज करण्याची कर्ज घेण्याची सर्व प्रोसेस एकदम सोपी आहे.
नवीन पोलिस दंड नियम कायदा 2025 – पोलिस मोबाईलने दंड करू शकत नाहीत
हे कर्जत तुम्हाला बँकेमार्फत मिळतं आणि सरकार त्यावर 25% ते 30 % सबसिडी देते. म्हणजे तुम्ही जर 10 लाखाच कर्ज घेतलं. तर त्यातील 3 लाख रुपये सरकार स्वतः भरते आणि तुम्ही फक्त सात लाख रुपये परत करायचे आहेत. या योजनेत जो आधी अर्ज करेल त्यालाच पहिल्यांदा कर्ज दिले जाईल या तत्त्वावर ही योजना काम करत आहे. त्यामुळे अर्ज करण्यासाठी कोणीही उशीर करू नका.
CMEGP योजनेचा फायदा असा आहे की, आपल्याला व्यवसाय सुरू करण्यासाठी बिगर व्याजी मोठं भांडवल मिळते. जास्त कर्जही आपण घेऊ शकतो. आणि सरकार थेट या कर्जात मदत करते. त्यामुळे तुमचे उत्पन्न वाढतं आणि इतर लोकांसाठी तुम्ही रोजगार निर्माण करू शकतो.
या योजनेसाठी काही अटी आहेत त्या तुमचं वय 18 वर्षापेक्षा जास्त असायला हवे किमान शिक्षण आठवीपर्यंत असायला हवे आणि तुमच्याकडे व्यवसायाबद्दल नवीन कल्पना असावी. तरच तुम्ही या योजनेसाठी अर्ज करू शकता. या योजनेत काही जिल्ह्यांमध्ये प्रशिक्षण केंद्र ही चालू केलेली आहे. म्हणून आधी प्रशिक्षण दिलं जातं आणि त्यानंतरच अर्ज स्वीकारले जातात.
राज्य सरकारने CMEGP योजना सुरू करून तरुणांना नवीन बिजनेस नवीन व्यवसाय करण्यासाठी आर्थिक मदतीचे प्रोत्साहन दिले आहे. आता गरज आहे ती, तरुणांनी पुढे येण्याची आणि ऑनलाईन अर्ज करून स्वतःचा व्यवसाय स्वतःच चालू करून यशस्वी होण्याची.
कृपया तुम्ही नोंद घ्या