सोलर प्लेट साफ करताना करंट लागून शेतकऱ्याचा मृत्यू – अलीकडेच एक धक्कादायक घटना घडली. एका शेतकऱ्याने शेतात लावलेल्या सोलर प्लेट ओल्या कपड्याने साफ करत असताना त्याचा करंट लागून मृत्यू झाला. ही घटना ऐकून सगळेच सुन्न झाले. कारण सोप्या वाटणाऱ्या सफाई च्या कामात शॉक कसा लागू शकतो, यावर लोकांचा विश्वास बसत नाही.

पण हे खरं आहे – आणि अशा गोष्टी खूप वेळा घडत आहेत. या पोस्ट मध्ये आपण हे समजून घेणार आहोत की सोलर प्लेट्स का धोकादायक आहेत, त्या वापरताना काय चुका टाळल्या पाहिजेत आणि सुरक्षिततेसाठी कोणते नियम पाळायला हवेत.
सोलर प्लेट म्हणजे काय?
सोलर प्लेट म्हणजे सूर्यप्रकाशातून वीज तयार करणारा उपकरणाचा एक भाग. ही वीज घरामध्ये लाईट, फॅन, पंप वगैरे चालवण्यासाठी वापरली जाते. ह्या प्लेट्स सतत सूर्यप्रकाशात असतात, त्यामुळे त्या कायम वीज तयार करत असतात.
आता प्रश्न असा की, सोलर मोटर बंद असताना पण Solar plate मध्ये करंट असतो का? तर हो करंट असतो. त्यामुळे कोणी हाताने किंवा पाण्याने सोलर प्लेट सफाईचे काम करत असेल, तर करंट लागण्याची शक्यता असते.
सोलर प्लेट साफ करताना करंट लागून शेतकऱ्याचा मृत्यू कसा झाला?
शेतकऱ्याने शेतात बसवलेल्या सोलार प्लेट वरील धूळ साफ करायला ओला कपडा घेतला आणि सोलर प्लेट्सवर जमा झालेली धूळ स्वच्छ करायला सुरुवात केली. प्लेटवर पाणी गेलं आणि हाताचा थेट संपर्क आला.
त्यामुळे लगेचच करंट लागला. कुणालाही काही समजायच्या आत, त्या तरुणाचा जीव गेला. ही घटना जितकी दुर्दैवी आहे, तितकीच शिकवण देणारीसुद्धा आहे.
सोयाबिन पिवळी पडण्याची कारणे? आणि उपाय जाणून घ्या – शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची माहिती
अशा चुका टाळा
- भिजलेल्या फडक्याने सोलर प्लेट साफ करू नये. पाणी व वीज एकत्र आली की धोका हमखास असतो.
- सकाळी किंवा दुपारी प्लेट्स साफ करू नका. सूर्यप्रकाश खूप असल्यामुळे त्यावेळी करंट जास्त असतो.
- प्लेट साफ करताना हात, पाय, कपडे कोरडे ठेवा. शक्य असल्यास हॅण्ड ग्लोव्हज (Hand gloves) वापरा आणि रबरी चप्पल घाला.
- एकटे असताना सोलर प्लेट ची सफाई करू नका. कुणीतरी जवळ असलं पाहिजे जे वेळ आली तर मदत करू शकेल.
- प्रशिक्षण नसेल तर Expert व्यक्तीला बोलवा. सोलर प्लांट साफ करणारे लोक असतात. त्यांच्या मदतीने हे काम सुरक्षितपणे करता येते.
सुरक्षेसाठी काय करावे?
- सोलर प्लेट्स साफ करताना पाणी वापरू नका. त्याऐवजी कोरड्या कपड्याने किंवा प्लॅस्टिक ब्रशचा वापर करा.
- एक वेळ निश्चित ठेवा – सकाळी दिवस उगवण्याच्या आधी किंवा संध्याकाळी अंधार झाल्यावर जेव्हा सूर्यप्रकाश कमी असतो.
- शक्य असल्यास main switch बंद करा.
- हातात रबरचे हातमोजे, पायात ग्रिप असलेली चप्पल वापरा.
- सुरक्षित अंतरावरून काम करा आणि एकटे अजिबात काम करू नका.
शेतकरी, गावातली मंडळी आणि घरगुती यंत्रणा असणारे सर्वांनी ही काळजी घ्यावी
आज खूप शेतकरी सौरऊर्जेचा वापर करत आहेत. त्यामुळे सोलर पॅनल्स स्वच्छ करणे हे शेतकऱ्यांचे रोजचेच काम झाले आहे. पण थोडीशी असावधता प्राणघातक ठरू शकते.
ही माहिती देऊन कोणालाही घाबरवण्याचा उद्देश नाही, पण “सावध रहा, सुरक्षित राहा” यासाठी माहिती दिली आहे.
महत्त्वाचे
सोलर प्लेट सफाई करणे सोप वाटते, पण काळजी नाही घेतली तर शॉक लागू शकतो. आपली एक चूक बायको आणि मुलांना आयुष्यभरासाठी संकटात नेऊ शकते. सर्वांना विनंती आहे की, सोलर यंत्रणा वापरत असाल तर हे नियम पाळा आणि इतरांनाही सांगत रहा. ही माहिती तुमच्या जवळील इतर शेतकऱ्यांना पाठवा कारण या माहितीमुळे त्यांचाही जीव वाचवू शकतो
धन्यवाद ! 🙏🏻