गेल्या काही दिवसांपासून एक मोठी बातमी सगळीकडे चर्चेत आहे – सरकारने 15 लाख लाडक्या बहिणींचे हफ्ते थांबवले आहेत. वृद्ध लोकांना पेन्शन मिळायची, काहींना विधवा किंवा अनाथ महिला म्हणून महिन्याला पैसे मिळायचे, तर काहीं लोकांना महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार योजनेतून थोडा आधार मिळायचा. पण आता अचानक चालू असणारे हफ्ते येणं बंद झालं आहे.

हे अचानक कसं आणि का झालं, आणि सगळ्यात महत्त्वाचं. तुमचं नाव यादीत आहे का? हे कसं कळणार, याची माहिती आपण आज सोप्या भाषेत बघणार आहोत.
15 लाख लाडक्या बहिणींचे हफ्ते थांबवले?
सरकारकडून जेव्हा योजना राबवल्या जातात, तेव्हा त्या योजनेचा फायदा खरंच गरजू लोकांपर्यंत पोहोचतो आहे की नाही हे पाहण्यासाठी वेळोवेळी तपासणी केली जाते. यावेळी Digital पद्धतीने मोठ्या प्रमाणात यादी तपासली गेली आणि 15 लाख महिलांचे नावे थेट यादीतून काढून टाकण्यात आली.
➡️ महिलांना मिळणार मोफत पीठ गिरणी अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा
काही महिला अशा होत्या ज्यांचे Document चुकीचे होते, आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नव्हते, काहींनी अर्ज केले होते पण Updates दिले नाहीत, तर काही अपात्र ठरल्या कारण त्यांची माहिती सरकारी नियमांनुसार योग्य नव्हती.
माझं नाव यादीत आहे का? कसं पाहायचं?
हा प्रश्न सगळ्यांना सतावतोय. आपलं नाव बंद यादीत आहे का? हे पाहण्यासाठी तुमच्याकडे दोन मार्ग आहेत
- तुमच्या कोणत्या योजनेचे हफ्ते बंद झाले आहेत ते आधी पहा. उदा. वृद्धापकाळ पेन्शन, विधवा योजना, अनाथ स्त्री योजना, लाडकी बहीण योजना etc.
- त्या योजनेची Website किंवा CSC सेवा केंद्र) येथे जाऊन तुमचं नाव शोधा. तिथे लाभार्थी यादी (Beneficiary List) किंवा हफ्ता स्टेटस (Installment Status) असा पर्याय मिळतो.
अशा पद्धतीने तुम्ही नाव टाकून शोधल्यास लगेच कळू शकतं की, तुमचं नाव अद्याप यादीत आहे की काढलं गेलं आहे.
माझा हफ्ता बंद झाला तर मी काय करावं?
जर तुमचं नाव यादीतून वगळलं गेलं असेल, किंवा हफ्ता थांबला असेल, तर घाबरू नका. पुढची पावलं उचला.
- तुमचं आधार कार्ड आणि बँक खाते एकमेकांशी लिंक आहे का? ते पहा.
- काही योजनांमध्ये दरवर्षी माहिती Update करणं आवश्यक असतं. जर हे केलं नसेल, तर हफ्ता थांबतो.
- जवळील CSC Center किंवा पंचायत समिती कार्यालयात जाऊन चौकशी करा. तिथून तुम्हाला अर्ज Update करून देतात.
- तुमच्याकडे मागील हफ्त्यांचा पुरावा ( SMS, बँक पासबुक) असेल, तर तो घेऊन जा. त्यामुळे पुन्हा हफ्ते सुरू होण्यासाठी मदत होते.
हफ्ता पुन्हा सुरू होईल का?
हो, होऊ शकतो. जर माहिती योग्य पद्धतीने Update केली तर तुमचा हफ्ता पुन्हा सुरू होऊ शकतो. त्यासाठी फक्त योग्य Document तयार ठेवणं, फॉर्म भरणं आणि वेळेत Follow-up करणं महत्त्वाचं आहे.
काही महिला फक्त ऐका लहान चुकी मुळे अपात्र ठरल्या होत्या. जसं की, बँक खातं बंद असणं, मोबाईल नंबर चुकीचा असणं, किंवा फोटो न लागणं. या गोष्टी सुधारल्या, की हफ्ता पुन्हा चालू होतो.
हे सगळं माझ्याच गावातील महिले सोबत घडलं होत.
गावातल्या राधाबाई यांना दर महिन्याला ₹2,000/- पेन्शन मिळायची. पण मागील दोन महिने पैसे आलेच नाहीत. त्यांनी CSC केंद्रात विचारलं, तर कळलं की त्यांचं आधार कार्ड बँकेशी लिंक नव्हतं. त्यांनी लगेच आधार Update करून बँकेत तपासलं आणि पुढच्या महिन्यापासून त्यांचा हफ्ता पुन्हा सुरू झाला.
महत्त्वाचे
जर तुमचं किंवा तुमच्या घरातील एखाद्या बहिणीचं, आईचं, आजीचं हफ्ते अचानक थांबले असतील, तर हे नक्की तपासा. नाव यादीत आहे का? हे शोधा, आणि जर नसेल तर फक्त योग्य पद्धतीने अर्ज Update करा.
सरकारकडून 15 लाख लाडक्या बहिणींचे हफ्ते थांबवले असतील तरी, ज्या महिलांना खरंच गरज आहे त्यांच्यासाठी हक्क टिकवणं शक्य आहे. फक्त माहिती हवी, आणि थोडा वेळ द्यायला हवा.