MahaDBT कृषी यंत्र लॉटरी यादी – महाराष्ट्र सरकारतर्फे शेतकऱ्यांसाठी अनेक योजना राबवल्या जातात. त्यातीलच एक महत्त्वाची योजना म्हणजे कृषी यांत्रिकीकरण योजना.

या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना ट्रॅक्टर, पेरणी यंत्र, थ्रेशर, मल्चिंग मशीन, स्प्रे मशीन, रोटाव्हेटर अशा विविध यंत्रांसाठी अनुदान दिलं जातं.
MahaDBT कृषी यंत्र लॉटरी यादी का काढतात?
राज्यभरातून हजारो शेतकरी अर्ज करतात. त्यामुळे सर्वांना लगेच यंत्र मिळू शकत नाही. त्यामुळे सरकारकडून Lottery प्रणाली वापरली जाते. म्हणजे निवड हा एक प्रकारचा Computer वर चालणारा नियमानुसार सोडत पद्धतीचा Program असतो.
ज्या शेतकऱ्यांचे नाव या लॉटरीत येते, त्यांनाच पुढील प्रक्रिया पूर्ण करून अनुदान आणि यंत्र मिळते.
जिल्हानिहाय लॉटरी यादी कुठे पाहायची?
- सर्वात आधी महाडीबीटी (MahaDBT) च्या वेबसाइटवर जा.
- “Agriculture Department” हा पर्याय निवडा
- “Agricultural यांत्रिकीकरण” योजना शोधा
- “Beneficiary List” किंवा “Funds वितरित यादी” या विभागावर क्लिक करा
- जिल्हा, तालुका आणि गाव निवडा
- तुमचं नाव यादीत आहे की नाही ते Check करा.
जर यादीत तुमचं नाव असेल, तर तुम्ही लाभार्थी म्हणून निवडले गेलेले आहात.
यादीत नाव आल्यानंतर पुढे काय करायचे?
जर तुमचं नाव MahaDBT Lottery list मध्ये असेल, तर पुढील 7 दिवसांत Documents Upload करणे गरजेचं असतं
➡️ ऊस तोडणी यंत्र अनुदान योजना 2025 – शेतकऱ्यांसाठी 35 लाखांची सरकारी मदत
महत्त्वाची कागदपत्रे
- 7/12 उतारा
- आधार कार्ड
- बँक पासबुक
- होल्डिंग प्रमाणपत्र (शेतीची जमीन स्वतःची आहे याचा पुरावा)
- ज्या यंत्रासाठी अर्ज केला आहे त्याचे कोटेशन
- यंत्राचा Test report किंवा वाहन RC Book (जर वाहन स्वरूपाचं यंत्र असेल तर)
ही कागदपत्रे वेळेत अपलोड केल्यास पुढील प्रक्रिया सुरु होते.
काही शेतकऱ्यांचे नाव यादीत का लागत नाही?
- एकाच विभागातून खूप Application आलेली असतात परंतु जागा मर्यादित असतात.
- कधीकधी Document योग्य नसतात
- ज्या शेतकऱ्यांचे वय, जमीन, मागील योजना लाभ घेतलेली आहे, अशांची निवड लवकर होऊ शकते
जर यावेळी MahaDBT lottery list मध्ये नाव आले नसले तरी पुढच्या टप्प्यात अर्ज करू शकता
नवीन काय बदल आहे?
आतापर्यंत ही योजना Lottery पद्धतीने चालत होती, पण या सालापासून Government ने “मागेल त्याला कृषी यंत्र” (First Come First Served) Policy लागू करण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. म्हणजे जो शेतकरी आधी अर्ज करेल आणि सर्व Documents वेळेवर भरेल, त्याला यंत्राचे अनुदान लवकर मिळेल.
निष्कर्ष
कृषी यंत्र मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना थोडा Patience आणि Preparation ठेवावी लागते. Lottery लागणं ही नशिबाची गोष्ट असते, पण सर्व अटी पूर्ण आणि योग्य कागदपत्रे दिल्यास नक्कीच या योजनेचा फायदा मिळू शकतो. MahaDBT कृषी यंत्र लॉटरी यादी वेळोवेळी पाहत राहा, नाव लागल्यास वेळ वाया न घालवता पुढील प्रक्रिया पूर्ण करा.