अल्पभूधारक शेतकरी प्रमाणपत्र कसे काढायचे? ऑनलाईन अर्जाची संपूर्ण प्रक्रिया, लागणारी कागदपत्रं आणि मिळणाऱ्या सरकारी योजनांची सविस्तर माहिती.

अल्पभूधारक शेतकरी प्रमाणपत्र म्हणजे असे शेतकरी ज्याच्याकडे पाच एकर किंवा त्यापेक्षा कमी शेत जमीन असते त्यांनाच अल्पभूधारक शेतकरी म्हणतात. अशा शेतकऱ्यांना सरकार अनेक योजना देते. जसे की, अनुदान, मशिनरी, पैसे, खते, बियाणे तसेच कर्जाची मुदत ही मिळते.
अल्पभूधारक शेतकरी प्रमाणपत्र कसे काढायचे?
परंतु या सर्व योजनांचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला सर्वात आधी अल्पभूधारक शेतकरी प्रमाणपत्र काढावे लागेल. अल्पभूधारक शेतकरी प्रमाणपत्र काढण्यासाठी सरकारने ऑनलाईन पद्धत ही सुरू केलेली आहे. त्यामुळे तुम्ही घरबसल्या इंटरनेटच्या माध्यमातून आपले अल्पभूधारक प्रमाणपत्र सहज अर्ज करून काढू शकतो.
सर्वप्रथम आपल्याला आपले सरकार या वेबसाईटवर जाऊन तुमची नाव नोंदणी करावी लागेल. त्यामध्ये तुमचे नाव, मोबाईल क्रमांक, तसेच ई-मेल आयडी आणि पासवर्ड भरून लॉगिन करून घ्यावे.
त्यानंतर महसूल विभाग निवडून अल्पभूधारक शेतकरी असे ऑप्शन समोर दिसेल, तर ते ऑप्शन आपल्याला निवडायचे आहे. हे प्रमाणपत्र काढण्यासाठी आपल्याकडे काही कागदपत्र असणे आवश्यक आहे. जसे की आधार कार्ड, सातबारा उतारा, 8 अ उतारा ऍड्रेस प्रूफ (उदा. लाईट बिल, बँक पासबुक किंवा स्वतः लिहिलेले स्वयंघोषणापत्र )
वरील सर्व कागदपत्रे असणे आवश्यक आहे. त्यानंतर आपण ही सर्व कागदपत्रे स्कॅन करून, त्या पोर्टलवर अपलोड करावी. फॉर्म वरील सर्व माहिती भरून झाल्यावर फार्म सबमिट या बटनवर क्लिक करावे. हा फॉर्म सबमिट करण्यासाठी आपल्याला त्यांचे शुल्क ऑनलाईन पद्धतीने भरावयाचे आहे. आणि आपला अर्ज सबमिट करायचा आहे. ही सर्व प्रोसेस झाल्यानंतर आपला अर्ज पुढील प्रक्रियेसाठी पाठवला जाईल.
अल्पभूधारक शेतकरी प्रमाणपत्र अर्ज प्रक्रिया
जर तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे खूपच अवघड वाटत असेल, तर तुम्ही तुमच्या गावातील शेतू सुविधा केंद्र किंवा तहसील कार्यालयात जाऊन सुद्धा अर्ज दाखल करू शकता.
ऑफलाइन पद्धतीने अर्ज सादर करण्यासाठी तेथील कर्मचाऱ्यांकडून फॉर्म घेऊन तुम्हाला तो पूर्ण फॉर्म आपल्या वैयक्तिक माहितीने भरायचा आहे. त्यानंतर आपल्याला जे कागदपत्र सांगितले आहेत, ते कागदपत्र त्या फॉर्म सोबत जोडून तो फॉर्म तेथील कर्मचाऱ्याकडे सादर करावा. अर्ज केल्यापासून साधारण 15 ते 20 दिवसात तुम्हाला तुमचे अल्पभूधारक शेतकरी प्रमाणपत्र मिळते.
जिल्हा परिषद योजना अर्ज सुरु – शिलाई मशीन, फवारणी पंप, काटेरी कुंपण, पाईपलाईन इत्यादि साठी अर्ज करा
अल्पभूधारक प्रमाणपत्र मिळाल्यानंतर तुम्हाला अनेक सरकारच्या योजनांचा थेट लाभ मिळतो. जसे की शेतीसाठी लागणारी अवजारे, फवारणी पंपा, ट्रॅक्टर, पाईपलाईन साठी अनुदान आणि अशा बऱ्याच योजनांचा लाभ घेऊ शकतो.
विशेष करून शेतकऱ्यांना अल्पभूधारक म्हणून बँक कर्जही लवकर देते. आणि त्याची प्रोसेस खूपच सोपी असते. खूप वेळा विमा कंपन्या ही तुम्हाला प्रथम प्रधान्य देतात. सरकारच्या बऱ्याच योजनांमध्ये तुम्हाला सवलती मिळतात आणि तुम्ही त्या योजनांचा पुरेपूर लाभ घेऊ शकता.
यामध्ये महिला शेतकऱ्यांना विशेष सहाय्य दिले जाते. जसे की, शिलाई मशीन, घरगुती उद्योगासाठी मदत तसेच स्वयंसहायता समूहात प्रधान्य या सर्व योजनांमध्ये महिलांना सवलती मिळतात. परंतु या सर्व योजनांचा लाभ घेण्यासाठी अल्पभूधारक प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
या प्रमाणपत्रामुळे लाभार्थी शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचं ओळखपत्र मिळतं आणि सरकारच्या सरकारी योजनांचा लाभ मिळण्यासाठी याचा वापर करता येतो. खेडेगावातील खूप सारे शेतकरी योग्य माहिती नसल्यामुळे किंवा कागदपत्राच्या अडचणीमुळे या सवलती पासून वंचित राहतात. म्हणून तुम्ही जर अल्पभूधारक शेतकरी असाल आणि तुमच्याकडे पाच एकरापेक्षा कमी जमीन असेल, तर जास्त वेळ न घालवता हे प्रमाणपत्र आजच काढून घ्या.
घरबसल्या मोबाईल वरून अल्पभूधारक प्रमाणपत्र काढा
आजच्या नवीन युगात म्हणजेच डिजिटल युगात सरकारी सेवा ही ऑनलाइन झालेल्या आहेत. त्यामुळे अगोदर ज्या काही समस्या होत्या त्या आता कमी दिसत आहे. लाभार्थ्याच्या वेळेचे ही बचत होते. महाराष्ट्र राज्याच्या सरकारी वेबसाईट वापरायला खूपच सोप्या आहेत आणि सगळी माहिती मराठीतून सुद्धा तुम्हाला मिळते. त्यामुळे तुम्हाला जर जास्त कम्प्युटरचे मोबाईलचे ज्ञान नसले तरी सुद्धा तुम्ही सहज अर्ज करू शकता.
तुमच्याकडे जर नवीन मोबाईल म्हणजे अँड्रॉइड फोन असेल आणि तुम्हाला थोडं फार मोबाईल विषयी नॉलेज असेल, तर तुम्ही घरबसल्या स्वतःहून अल्पभूधारक प्रमाणपत्र आपल्या मोबाईलवर घर बसल्या काढू शकता. आणि भविष्यात कोणत्याही सरकारी योजना विषयी अर्ज करायचा असेल तर तुम्ही हीच पद्धत उपयोगात आणू शकता. म्हणून थोडेफार तरी डिजिटल होण्याचा प्रयत्न करा.
अल्पभूधारक शेतकरी प्रमाणपत्र हे एक महत्त्वाचं कागदपत्र आहे याच्या साह्याने तुम्ही अनेक सरकारी योजनांचा थेट लाभ घेऊ शकता. जर तुम्ही या योजनेसाठी पात्र असाल, तर जास्त वेळ न घालवता लगेच अर्ज करा आणि आपले प्रमाणपत्र काढून घ्या. अर्ज करताना अर्जातील सर्व माहिती अचूक भरा आणि तुमचे प्रमाणपत्र मिळवा. सरकारी योजनांमध्ये सहभागी होणे तुमच्यासाठी खूप फायद्याचे आहे. कारण तुमच्या कुटुंबाला आर्थिक मदत मिळते आणि तुमची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी ही आपण त्याचा फायदा घेऊ शकतो.