Ayushman Bharat Yojana Marathi 2025 – 5 लाख रुपयांचे मोफत उपचार

Ayushman Bharat Yojana Marathi सध्या दवाखान्यात उपचार घेणे आर्थिक दृष्ट्या दुर्बल व्यक्तींसाठी खूपच महागात पडत आहे. त्यात ऑपरेशन, औषध आणि बाकीचे खर्च एवढे वाढले आहेत की, अनेक कुटुंब त्यात अडकून राहतात. पण भारत सरकारने सुरू केलेल्या आयुष्यमान भारत योजनेमुळे गरीब कुटुंबांना दिलासा मिळाला आहे. ही योजना प्रधानमंत्री जन आरोग्य योजना (PM-JAY) या नावाने देखील ओळखली जाते.

Ayushman Bharat Yojana Marathi

आणि या योजनेत एका कुटुंबासाठी वर्षाला 5 लाखापर्यंत हॉस्पिटलचा सर्व खर्च मोफत दिला जातो. भारत सरकारने ही योजना आर्थिक दृष्ट्या गरीब व गरजू नागरिकांसाठी चालू केली आहे.

Ayushman Bharat Yojana Marathi माहिती

PM-JAY योजनेत घरातील सर्व व्यक्तींना वय, लिंग किंवा संख्येची कोणतेही अट न ठेवता, उपचार मिळतात. म्हणजेच या योजनेमध्ये सहभागी असणाऱ्या रुग्णालयात जाऊन तुम्ही फ्री मध्ये उपचार घेऊ शकता. व त्याचे पैसे तुम्हाला द्यावे लागत नाहीत.

तुम्ही PM-JAY योजनेसाठी पात्र आहात का नाही. हे SECC-2011 च्या डेटा चा वापर करून चेक केले जाते. तुम्ही देखील तुमचे नाव आयुष्यमान भारत योजनेच्या यादीत आहे का नाही, हे त्यांच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन चेक करू शकता. योजनेच्या पोर्टलवर गेल्यानंतर आधार कार्ड किंवा मोबाईल नंबर डिटेल्स वापरून तुम्हाला चेक करता येऊ शकते. जर तुम्ही पात्र असाल, तर जवळच्या ग्राहक सेवा केंद्रात जाऊन आयुष्यमान भारत कार्ड मिळवू शकता. या योजनेत सहभागी असणाऱ्या हॉस्पिटलमध्ये जाऊन हे कार्ड दाखवून उपचार घेऊ शकता.

Ayushman App येथून आयुष्मान योजनेचे ॲप डाऊनलोड करा

मोफत हॉस्पिटल उपचार योजना

या योजनेचा सर्वात मोठा फायदा म्हणजे, तुमच्यावर उपचार सुरू होण्याच्या 3 दिवस आधीपासूनच ते रुग्णालयांमधून सुटल्यानंतर 15 दिवसापर्यंतचा खर्च या योजनेत दिला जातो. या खर्चात तपासण्या, ॲम्बुलन्स, औषधे व आधीपासून असलेल्या आजाराचाही समावेश केला जातो. त्यामुळे दमा, मधुमेह, रक्तदाब यासारख्या जुनाट आजारांसाठी ही योजना उपयुक्त ठरते.

वय वंदना कार्ड माहिती

वृद्ध व ज्येष्ठ नागरिकांसाठी नवीन योजनाही चालू केलेली आहे ती योजना म्हणजे वय वंदना आयुष्यमान कार्ड योजना. त्यासाठी त्या व्यक्तीचे वय 70 वर्षावरील असावे लागते. तसेच त्या नागरिकांना वय वंदना आयुष्यमान कार्ड ही स्वतंत्रपणे दिले जाते. प्रत्येक व्यक्तीला उपचारासाठी स्वातंत्र्य मिळते, व एका वर्षात तुम्ही पाच लाख रुपयांपर्यंत रकमेचे उपचार घेऊ शकता.

नवीन ट्रॅक्टर अनुदान योजना सुरू! अर्ज करा आणि मिळवा ट्रॅक्टरवर थेट सरकारी मदत

बघायला गेलं तर महाराष्ट्रात याआधी महात्मा फुले जन आरोग्य योजना चालू होती. आता तीच योजना आयुष्यमान भारत मध्ये समाविष्ट करण्यात आलेली आहे. या योजनेमुळे महाराष्ट्रातील अधिक नागरिकांना रुग्णालयातून उपचार मिळवणे सोपं झालेला आहे. आणि त्यांच्या वरील आर्थिक ताण देखील कमी झाला आहे.

आयुष्मान भारत कार्ड पात्रता

संपूर्ण देशभरात सध्या 20 हजाराहून अधिक हॉस्पिटल्स, रुग्णालय या योजनेत सहभागी आहेत. तसेच कोट्यावधी पेक्षा जास्त लोकांनी आयुष्यमान भारत योजनेचा लाभ घेतलेला आहे. जर तुमच्याकडे खालील कागदपत्र असतील, तर तुम्ही तात्काळ या योजनेचा लाभ घेऊ शकता. त्यासाठी रेशन कार्ड, आधार कार्ड आणि अन्य आवश्यक कागदपत्रे लागतील. हे कागदपत्रे घेऊन तुम्ही तुमच्या जवळील ग्राहक सेवा केंद्रावर जाऊन, कुटुंबातील सर्व व्यक्तींची नोंदणी करून घ्यावी.

सरकारने चालू केलेली आयुष्यमान भारत योजना गरजू व आर्थिक दृष्ट्या दुर्बल असणाऱ्या नागरिकांसाठी आरोग्याचे कवच आहे. सरकारकडून मिळणारे पाच लाख रुपयांपर्यंतचे संरक्षण म्हणजे त्यांच्यासाठी एक सुविधा नसून, त्यांचे आयुष्य वाचवण्याची संधीच आहे. याच माध्यमातून मी तुम्हाला विनंती करतो की, ही माहिती तुम्ही तुमच्या इतर मित्रांना आणि समाजातील गरजू व्यक्तींना शेअर करा. कारण आरोग्य हीच खरी संपत्ती आहे. आणि आता ती या योजनेच्या माध्यमातून मोफत मिळू शकते.

Kishor Gaikwad-Patil


नमस्कार! मी किशोर गायकवाड-पाटील.
गेल्या 6 वर्षांपासून ब्लॉगिंग करत आहे. 2019 पासून मी सरकारी योजना या विषयावर ब्लॉग लिहायला सुरुवात केली, आणि आजपर्यंत अनेक लोकांपर्यंत योजनांची योग्य माहिती पोहोचवली आहे.
लोकांना योजना समजावून सांगणं, अर्ज कसा करायचा ते सांगणं, आणि योग्य माहिती देणं हे माझं मुख्य काम आहे.
आमचं एकच ध्येय आहे – सर्वसामान्य माणसाला कोणती योजना आहे, तिचा फायदा कसा घ्यायचा, आणि अर्ज कसा करायचा हे नीट समजलं पाहिजे.

Leave a Comment