CSC eGovernance Jobs – गावात सरकारी सेवा मिळणं पूर्वी खूप कठीण होतं. पण आता सरकारने सुरू केलेल्या CSC म्हणजेच Common Service Centre या उपक्रमामुळे हे खूप सोपं झालं आहे. हे केंद्र म्हणजे छोटं ऑफिस, जिथून सामान्य नागरिकांना सरकारी सेवा मिळतात.

ज्या सेवांमध्ये आधार अपडेट, पॅन कार्ड, स्कॉलरशिप, डिजीपेय, बँकिंग सेवा, वीज बिल भरणं इत्यादी. हे काम करायला लोक लागतात आणि त्यासाठीच ही नोकरीची संधी आहे.
CSC eGovernance Jobs पात्रता
CSC मध्ये काम करण्यासाठी फार मोठं शिक्षण लागत नाही. 10वी किंवा 12वी पास असणं पुरेसं आहे. तुम्हाला जर कॉम्प्युटर वापरता येत असेल. जसे की, Word, Excel, Internet तर तुमची अर्धी पात्रता पूर्ण आहे. CSC eGovernance Jobs साठी एखादा छोटासा कोर्स (जसं की CCC) असेल तर अजून चांगलं. यात वयाची अट आहे वय 18 वर्षांपेक्षा जास्त असावं लागतं.
कोणती कामं करावी लागतात?
CSC मध्ये मुख्य काम म्हणजे डेटा एंट्री, म्हणजे लोकांचे फॉर्म भरून देणं, माहिती स्कॅन करून अपलोड करणं, प्रिंट काढून देणं. याशिवाय ग्राहकांना मार्गदर्शन करणं, सरकारी योजनांची माहिती देणं आणि काही ठिकाणी Digi pay सारख्या बँकिंग सेवा देखील द्याव्या लागतात. एकंदरीत सरकारी सेवा पोहचवणं हेच आहे, पण गावाच्या पातळीवर.
CSC Jobs साठी अर्ज कसा करावा?
या नोकऱ्या सरकारच्या राष्ट्रीय करिअर सेवा (NCS) पोर्टलवर Available असतात. तुम्ही NCS वर Profile तयार करून CSC eGovernance Services India Ltd असं नाव शोधून त्यासाठी अर्ज करू शकता. काही नोकऱ्या थेट शॉर्टलिस्टिंगवर असतात, तर काहीसाठी छोटा इंटरव्ह्यू घेतला जातो.
पगार किती मिळतो?
पगार नक्की कामावर आणि ठिकाणावर अवलंबून असतो. डेटा एंट्री ऑपरेटरसाठी 10,000\- ते 15,000\- पर्यंत, आणि बँकिंग सेवा, ग्राहक सहाय्यकसाठी ₹15,000 ते ₹25,000 पर्यंत पगार मिळतो. जर तुम्ही स्वतःचं CSC सेंटर चालवत असाल, तर अधिक पैसे कमवू शकता.
➡️ सीमा सुरक्षा दल नवीन भरती (BSF) 2025: पात्रता, प्रक्रिया आणि अर्ज माहिती
फसवणूक टाळा
आजकाल अनेक ठिकाणी सरकारी नोकरी लावतो म्हणणारे एजंट फिरत असतात. पण CSC साठी कोणतीही खास फी नसते. म्हणूनच फक्त अधिकृत वेबसाइटवरूनच अर्ज करा. कुणालाही पैसे देऊ नका. जर अर्ज करताना काही अडचण आली तर CSC कार्यालयात किंवा जिल्हा सूचना केंद्रात चौकशी करा.
महत्त्वाचे
CSC eGovernance Job म्हणजे एक उत्तम संधी आहे. 10वी/12वी पास तरुणांसाठी. जिथे स्पर्धा कमी, सर्व प्रक्रिया सोपी आणि काम खऱ्या अर्थाने समाजासाठी असतं. तुम्हाला तुमच्या गावात काम करता येतं, पगार मिळतो, आणि डिजिटल इंडियाचा भाग होण्याची संधी देखील मिळते.