E Peek Pahani new Update राज्य शासनाने शेतकऱ्यांसाठी एक खूप मोठा निर्णय घेतला आहे. हा निर्णय ई‑पिक पाहणी ॲप संदर्भात आहे. कारण आता शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीत त्यांनी काय पिकवले आहे, किती क्षेत्रात पेरणी केली आहे. याची सर्व माहिती त्यांच्या सातबारा वर दाखवण्यासाठी कुठेही जायची आवश्यकता नाही. कारण आता प्रत्येक शेतकरी स्वतःच आपल्या मोबाईल वरून E Peek Pahani करू शकणार आहे.

याच्या अगोदर हे काम त्या गावचे तलाठी किंवा महसूल विभागाचे अधिकारी करत होते. पण ही प्रक्रिया शेतकऱ्यांसाठी वेळखाऊ प्रक्रिया होती. कारण शेतकऱ्यांना सरकारी कार्यालयामध्ये सारख्या फेऱ्या माराव्या लागत होत्या. आणि माहितीमध्ये विसंगती आढळत होती.
नवीन E Peek Pahani अॅप कसे वापरावे?
परंतु आता सरकारने इ पीक पाहणी नावाचे एक मोबाईल ॲप्लिकेशन तयार केलेले आहे. त्या ॲप्लिकेशन मध्ये, शेतकरी स्वतःच आपल्या मोबाईल वरून शेताच्या प्लॉटची नोंद करू शकतो. आणि त्यात कोणतं पीक घेतलं आहे, किती क्षेत्रात ते पीक घेतलेलं आहे. त्याची सर्व वर्तमानातील माहिती त्याच्यामध्ये टाकू शकतो. ही सर्व माहिती फक्त शेतकरी काही मिनिटात आपल्या स्वतःच्या मोबाईलवरून भरू शकतो.
हे ही वाचा – मुलगी असेल तर मोफत मिळवा 3 लाख रुपये
ई पीक पाहणीच्या नवीन ॲप्लिकेशन मुळे शेतकऱ्यांना अनेक फायदे होणार आहेत. उदा. पिक विमा योजना, अनुदान, नुकसान भरपाई तसेच इतर सरकारी योजनांसाठी थोडाही वेळ न जाता. शेतकऱ्यांना या योजनांचा थेट फायदा मिळतो. कारण शेतकऱ्यांनी दिलेली माहिती अधिकृत मानली जाते. त्यामुळे शेतकऱ्यांचा आत्मविश्वास वाढतो.
ई पीक पाहणी मध्ये अजून एक चांगली गोष्ट म्हणजे, आता तलाठ्यांना किंवा दुसऱ्या अधिकाऱ्यांना देखील याच ऍप द्वारे नोंद करता येते. तसेच त्यांना एका प्लॉट ची पाहणी करण्याबद्दल 10 रुपयांचा मोबदलाही सरकार मार्फत दिला जातो. त्यामुळे या विभागाचे काम अतिशय जलद गतीने आणि अचूक माहिती गोळा करून, वेळेवर शासनाकडे पोहोचवली जाते.
नवीन ई‑पिक पाहणी ॲप वापरणं शेतकऱ्यांसाठी खूप सोपं आहे. हे ॲप डाऊनलोड करण्यासाठी प्ले स्टोअर वर जाऊन ई‑पिक पाहणी असं टाईप करून, ते ॲप डाऊनलोड करू शकता. त्यानंतर त्यामध्ये तुमचा मोबाईल नंबर टाकावा. काहीच वेळात तुमच्या मोबाईलवर एक ओटीपी येईल तो ओटीपी टाकून लॉगिन करा.
पुढील स्टेप मध्ये तुमच्या शेताचा सातबारा गट नंबर निवडावा. आणि त्या प्लॉटमध्ये किंवा त्या शेतामध्ये कोणते पीक घेतले आहे, त्याची संपूर्ण माहिती भरून फोटो काढून ती सर्व माहिती अपलोड करा. बस, एवढं झालं की तुमची ई पिक पाहणी पूर्ण होते. बघा एवढ्या सोप्या पद्धतीने तुम्हाला तुमचं पीक यामध्ये नोंदवता येते.
ई‑पिक पाहणीची सुविधा फक्त मोबाईल वापरणाऱ्या शेतकऱ्यांसाठीच नसून, ज्यांच्याकडे मोबाईल किंवा स्मार्टफोन नाही त्यांच्यासाठी CSC सेवा केंद्रावरून सुद्धा ही माहिती भरता येते. त्यामुळे आता कोणीही E pik Pahani पासून वंचित राहणार नाही.
या नवीन नियमामुळे शासनालाही याचा मोठा फायदा मिळणार आहे. आता राज्य शासनाला कळेल की, महाराष्ट्रात कुठल्या भागात कोणती पिकं घेतली जात आहे. याचा सर्व अंदाज सरकारला थेट वर्तमान मिळतो. या सर्व माहितीच्या आधारे हवामान बदल, पाण्याचे नियोजन, अनुदान वितरण, कीटक नियंत्रण अशा सगळ्या गोष्टी नियोजित वेळेमध्ये पूर्ण करता येतात.
शेतकऱ्यांना आता कोणत्याही सरकारी योजना घेण्यासाठी कोणाच्याही हातापाया पडायची गरज नाही. कारण ते स्वतःच्या मोबाईल वरूनच आपल्या जमिनीची माहिती भरू शकतात, आणि त्या आधारे सरकारच्या अनुदान योजना कर्ज योजना किंवा विमा योजनेमध्ये फायदा मिळू शकतात.
ई‑पिक पाहणी ऍप मुळे डिजिटल युगात शेतकऱ्यांसाठी उघडलेले नवीन दारच आहे. कारण शेतकरी आता स्वतःच्या मोबाईलवरूनच स्वतःची शेती शासनाच्या नजरेत आणू शकतो. त्यामुळे चुकीची माहिती, चुकीचे सातबारे, चुकीची पिके किंवा इतर माहिती टाकण्यापासून कायमचा बंदोबस्त झाला आहे.
प्रत्येक शेतकऱ्यांनी आजच ई पीक पाहणी नवीन ॲप गुगल प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करावे व शेतात जाऊन आपल्या पिकाची माहिती भरावी, आणि फोटो काढून ही माहिती सादर करावी. इथून पुढे येणाऱ्या सरकारी योजनांचा थेट लाभ घेण्यासाठी ही एक सोपी आणि महत्त्वाची पायरी आहे.