दहावी पास विद्यार्थ्यांना मोफत लॅपटॉप आणि 6GB इंटरनेट? जाणून घ्या खरी माहिती

दहावी पास विद्यार्थ्यांना मोफत लॅपटॉप – दहावीदहावी पास विद्यार्थ्यांना मोफत लॅपटॉप आणि दररोज सहा जीबी इंटरनेट मिळत असल्याची बातमी ऐकून तुम्हाला खूपच धडधड सुरू झाली असेल, पण सध्याच्या घडीला हे पूर्णपणे एक वायरल अफवा आहे. तसेच केंद्र सरकारकडून किंवा कोणत्याही राज्य सरकारकडून याबाबतची कोणतीही माहिती किंवा अधिकृत घोषणा अजून पण जाहीर केलेली नाही.

दहावी पास विद्यार्थ्यांना मोफत लॅपटॉप

फॅक्ट चेकिंग च्या संकेतस्थळांनी याबाबत सर्वांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. कारण अशा जाहिरातीमध्ये लिंक असते आणि त्या लिंक वर क्लिक करून त्या व्यक्तीची वैयक्तिक माहिती भरून घेतली जाते, आणि त्याला फसवणूक होण्याचा धोका असतो.

दहावी पास विद्यार्थ्यांना मोफत लॅपटॉप

Press Information Bureau (PIB) ने फॅक्ट-चेक केला आहे की, सरकार मार्फत कोणतीही अशी योजना राबवण्यात आलेली नाही किंवा विद्यार्थ्यांना मोफत लॅपटॉप देण्यासाठी सरकारने अशी कोणतीही माहिती अधिकृतपणे जाहीर केलेली नाही. त्यामुळे अशा अफवांवर आपणच स्वतःहून सावधगिरी बाळगावी.

आता राहिला प्रश्न की, अशा कोणत्याही योजना असल्यास त्याची माहिती लोकांपर्यंत कशी पोहोचेल. जर तुम्हाला सरकारी योजनांची ऑफिशियल माहिती घ्यायची असेल तर मी सरकारी वेबसाईट खाली सांगितल्या आहेत. त्या वेबसाईटचा वापर करून तुम्ही राज्य सरकारच्या कोणत्याही सरकारी योजना विषयी सर्व माहिती एका क्लिकवर येऊ शकतात.

सरकारी वेबसाईटचे नाव, पीएम इंडिया किंवा PIB या वेबसाईटवर कोणतीही नवीन योजना आल्यास त्याची अधिकृत प्रेस रिलीज केली जाते. पण जसं की तुम्ही दहावी पास विद्यार्थ्यांना दररोज 6 GB इंटरनेट आणि मोफत लॅपटॉप देणार असल्याची माहिती ऐकली आहे, ती अफवा आहे. अशी कोणतीही योजना सरकारने जाहीर केलेली नाही.

योजना खोटी आहे की खरी?

यावरून हे सिद्ध होत आहे की, सध्या तरी दहावी पास विद्यार्थ्यांना कोणतेही मोफत लॅपटॉप किंवा दररोज सहा जीबी डेटा मिळू शकणार नाही. ह्या सर्व अफवा फसवणूक करण्यासाठी घोषित झालेल्या आहेत.

भविष्यात सरकारकडून अशा योजनांची घोषणा जरी झाली, तरी सरकारला नोटिफिकेशन किंवा अधिकृत माहिती वेबसाईटवर जाहीर करावी लागते. परंतु दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना मोफत लॅपटॉप आणि दररोज सहा जीबी इंटरनेट ची योजना कुठेही अधिकृतपणे सांगितलेली नाही.

हे हि वाचा – PM किसान सन्मान निधी योजनेचा 20 वा हप्ता कधी येईल

तुम्हाला जर योजना संदर्भात खरी माहिती अपेक्षित असेल तर तुम्ही ती अधिकृत मार्गाने घेऊ शकता. तसेच सरकारी संकेतस्थळाचा वापर करून तुम्ही सरकारच्या विविध योजना विषयी अधिक माहिती घेऊ शकता. आणि नवीन योजना विषयी अपडेट राहू शकतात.

शेवटी तुम्हाला हे सांगायचं आहे की, सोशल मीडियावर आलेल्या सर्वच योजना खऱ्या नसतात. अशा कोणत्याही जाहिरातीवर विश्वास ठेवू नका आणि तुमची वैयक्तिक माहिती कोणालाही शेअर न करता, फसवणूक टाळा आणि ऑफिशियल माहिती मिळेपर्यंत सहज कोणावरही विश्वास ठेवू नका. दहावी पास विद्यार्थ्यांना मोफत लॅपटॉप या योजने विषयी आणखी काही प्रश्न असतील, तर खाली कमेंट बॉक्स मध्ये टाईप करून मला विचारू शकता.

Kishor Gaikwad-Patil


नमस्कार! मी किशोर गायकवाड-पाटील.
गेल्या 6 वर्षांपासून ब्लॉगिंग करत आहे. 2019 पासून मी सरकारी योजना या विषयावर ब्लॉग लिहायला सुरुवात केली, आणि आजपर्यंत अनेक लोकांपर्यंत योजनांची योग्य माहिती पोहोचवली आहे.
लोकांना योजना समजावून सांगणं, अर्ज कसा करायचा ते सांगणं, आणि योग्य माहिती देणं हे माझं मुख्य काम आहे.
आमचं एकच ध्येय आहे – सर्वसामान्य माणसाला कोणती योजना आहे, तिचा फायदा कसा घ्यायचा, आणि अर्ज कसा करायचा हे नीट समजलं पाहिजे.

Leave a Comment