Gas Cylinder Rate 2025 | महाराष्ट्रातील जिल्ह्यानुसार गॅस सिलेंडर दर | कोणत्या शहरात किती आहे किंमत?

महाराष्ट्रातील प्रत्येक ग्राहकासाठी Gas Cylinder Rate घरगुती गॅस सिलेंडरचे दर हा एक महत्त्वाचा विषय आहे. १ सप्टेंबर २०२५ रोजी तेल कंपन्यांनी जाहीर केलेले दर सध्या अमलात आले आहेत. १७ सप्टेंबर २०२५ रोजी या दरात बदल झाले आहेत. आजच्या या पोस्ट मध्ये आम्ही तुमच्यासाठी महाराष्ट्रातील प्रमुख जिल्ह्यांच्या शहरांनुसार १४.२ किलो गॅस सिलेंडरच्या सध्याच्या दरांची माहिती देणार आहोत.

Gas Cylinder Rate in Maharashtra 2025

Gas Cylinder Rate List | गॅस सिलेंडर दर २०२५

खालील तक्त्यामध्ये विविध शहरांसाठी १४.२ किलो क्षमतेच्या गॅस सिलेंडरचे अंदाजे दर (रुपये) दिले आहेत. हे दर तेल कंपन्या (Indian, BPCL, HPCL etc.) ने जाहीर केलेल्या दरांवर आधारित आहेत.

शहर (जिल्हा)गॅस सिलेंडरची किंमत (₹)
मुंबई८५२.५०
ठाणे८०२.५०
पुणे८५६.००
नागपूर९०४.५०
नाशिक८५६.५०
छत्रपती संभाजीनगर८८४.००
अमरावती८९५.००
अहमदनगर८६९.००
लातूर८७७.५०
सोलापूर८१८.५०
सातारा८५७.५०
सांगली८५५.५०
कोल्हापूर८५५.५०
जळगाव८०८.५०
नांदेड८७८.५०
गडचिरोली९२२.५०

Crop Insurance Status Check – 2025 | पीक विमा रक्कम कशी तपासाल? | PMFBY Online Status

दरांमध्ये फरक का?

वरील दर पाहता असे दिसते की, मुंबई, ठाणे, सोलापूर आणि जळगाव सारख्या शहरांमध्ये Gas Cylinder Rate कमी आहेत, तर नागपूर, औरंगाबाद, गडचिरोली आणि अमरावती सारख्या शहरांमध्ये दर जास्त आहेत. या किमतीतील फरकामागे मुख्य वाहतूक खर्च, स्थानिक कर (GST, VAT) आणि तेल कंपन्यांचे ऑपरेशनल खर्च यासारख्या घटकांचा समावेश होतो. समुद्रकिनाऱ्याजवळील शहरांमध्ये दर कमी असतात.

आपल्या शहरातील दर कसा तपासावा?

वरील दर हे अंदाजे आहेत आणि तेल कंपन्येनुसार ते थोडे फार बदलू शकतात. तुमच्या गॅस डीलरकडून मिळणाऱ्या अंतिम बिलावरील किंमत हीच अंतिम किंमत असते.
Gas Cylinder Rate अचूक दर तपासण्यासाठी खालील पद्धती वापरू शकता:

  • तुमच्या गॅस डीलरला थेट संपर्क करा. आणि त्यांना आपला दर विचारा ही सर्वात विश्वासार्ह पद्धत आहे.
  • तेल कंपन्यांच्या अधिकृत वेबसाइटवर भेट देऊन तुमची गॅस एजन्सी कोणत्या कंपनीची आहे (उदा., इंडेन, बीपीसीएल, एचपीसीएल) त्या कंपनीच्या वेबसाइटवर जाऊन तुमचा पिनकोड टाकून अचूक दर बघा.
  • मोबाइल ॲप चा वापर करून तुमच्या गॅस सप्लायर कंपनीचा अधिकृत मोबाइल ॲप वापरून दर तपासणे सोपे आहे.

वेळोवेळी दरांवर नजर ठेवा

१७ सप्टेंबर २०२५ रोजी गॅस सिलेंडरचे दर स्थिर राहिले आहेत. दरमहा होणाऱ्या दरबदलांमुळे, ग्राहकांनी गॅस Refill करण्यापूर्वी ताजे दर तपासून घेणे फायद्याचे ठरू शकते. अधिकृत स्रोतांकडून माहिती मिळवणे नेहमीच फायद्याचे असते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top