Gold Price Prediction In Marathi 2025:- सोनं ही अशी गोष्ट आहे जी अनेक वर्षांपासून सुरक्षित गुंतवणूक मानली जाते. आता पुन्हा एकदा सोन्याचे दर झपाट्याने वाढत आहेत. त्यामुळे अनेक लोकांच्या मनात प्रश्न आहे – पुढील ६ महिन्यांत सोन्याचा दर किती वाढेल? World Gold Council ने यावर रिपोर्ट तयार केला आहे, त्यात त्यांनी असे सांगितले आहे की, पुढील 6 महिन्यात सोन्याचा भाव अजून जास्त वाढू शकतो.

गेल्या काही महिन्यांत सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे. मार्च 2025 मध्ये प्रति तोळा दर ₹68,000 च्या पुढे गेला होता. त्यानंतर एप्रिल आणि मेमध्ये सोन्याची किंमत आणखी वाढली. वर्ल्ड गोल्ड कौन्सिलच्या म्हणण्यानुसार, डॉलरची कमजोरी, जागतिक तणाव, आणि महागाई यामुळे लोक पुन्हा सोन्याकडे वळत आहेत. याच कारणामुळे सोन्याला मागणी वाढतेय आणि त्यामुळे त्याचे दरही चढत आहेत.
या रिपोर्टमध्ये असं सांगितलं आहे की पुढील सहा महिन्यांत म्हणजेच 2025 च्या शेवटपर्यंत सोन्याचा दर 5% ते 10% पर्यंत वाढू शकतो. म्हणजेच जर आज सोन्याचा दर ₹70,000 प्रति तोळा असेल, तर तो ₹73,000 ते ₹77,000 च्या आसपास जाऊ शकतो. पण जर जागतिक परिस्थिती आणखी खराब झाली, जसं की युद्ध, राजकीय अस्थिरता, किंवा डॉलरमध्ये मोठी घसरण झाली – तर सोन्याचा दर 15% पर्यंत वाढू शकतो.
CMEGP योजना महाराष्ट्र 2025: 10 लाखांचं कर्ज घ्या आणि फक्त 7 लाख रुपयेच भरा
दुसरीकडे, काही तज्ज्ञ असंही सांगतात की, जर सगळं सुरळीत राहिलं, आणि महागाई कमी झाली, तर सोन्याचा दर स्थिर राहू शकतो किंवा किंचित कमी होऊ शकतो. त्यामुळे सोन्यात गुंतवणूक करताना थोडी सावधगिरी बाळगावी लागेल.
केंद्र बँकाही मोठ्या प्रमाणावर सोने खरेदी करत आहेत. 2024 मध्ये अनेक देशांच्या बँकांनी मोठ्या प्रमाणावर सोनं साठवले आहे. यामुळेही सोन्याला मागणी अधिक वाढतेय. भारतातही लग्नसराई, सण, आणि गुंतवणुकीच्या दृष्टिकोनातून सोनं खूप खरेदी केलं जातं. त्यामुळे देशांतर्गत मागणीही कायम आहे.
जर तुम्ही सोन्यात गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल, तर हे लक्षात घ्या की हे दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी चांगलं माध्यम आहे. पुढील काही महिन्यांत सोनं थोडं महाग होणार आहे, पण तुमचं बजेट आणि गरज बघून योग्य वेळी खरेदी करणं उत्तम ठरेल.
महत्त्वाचं म्हणजे, पुढील 6 महिन्यांत सोन्याचा दर वाढण्याची शक्यता जास्त आहे. वर्ल्ड गोल्ड कौन्सिलचा अंदाज आहे की, 2025 च्या शेवटी सोन्याचा दर 5% ते 10% पर्यंत वर जाऊ शकतो. काही परिस्थितीत ही वाढ आणखी मोठी असू शकते. त्यामुळे जर तुम्ही सोनं खरेदी करणार असाल, तर बाजारात काय घडतंय हे लक्षात घेऊनच निर्णय घ्या.