Kisan Credit Card Yojana : शेतकऱ्यांसाठी सरकारने अनोखी नवीन योजना सुरू केलेली आहे. आणि ती योजना शेतकऱ्यांसाठी खूपच उपयोगी योजना आहे. या योजनेचे नाव किसान क्रेडिट कार्ड योजना हे आहे. ही योजना म्हणजे बँकेकडून मिळणारे एक प्रकारचे तात्पुरतं कर्ज असते. जे फक्त शेतकऱ्यांसाठीच दिले जाते. 2025 मध्ये या योजनेत काही बदल आणि नव्या सुविधा दिल्या आहेत. ज्यामुळे अर्ज करणे खूप सोपं झालं आहे.

या योजने मागचा मुख्य उद्देश म्हणजे, शेतकऱ्यांना वेळेवर पैसे मिळावेत हा आहे. जेणेकरून ते शेतकरी बी बियाणे, खते, पंप, औषधे, फवारणी पंप यासाठी खर्च करू शकतील. खूप वेळा शेतकऱ्यांना तातडीने पैसा लागतो, आणि मग ते गावातील खाजगी सावकाराकडे जातात. ते सावकार त्यांच्याकडून खूप जास्त व्याज घेऊन त्यांना पैसे देतात. परंतु किसान क्रेडिट कार्डमुळे हे टाळता येऊ शकतं.
Kisan Credit Card Yojana 2025 – कमी व्याजात ₹5 लाख कर्ज मिळवा
KCC योजनेमधून आता शेतकऱ्यांना 5 लाखापर्यंत कर्ज कमी व्याजदरात मिळू शकत. कारण या कर्जावरती फक्त 4 टक्क्यापर्यंतच व्याजदर आकारला जातो. आणि जर तुम्ही या कर्जाची वेळेवर परतफेड केली, तर व्याजात आणखी सवलत दिली जाते. त्यामुळे तुम्ही कमी व्याज दरात शेतीसाठी लागणारे साहित्य किंवा तुमच्या आर्थिक गरजा भागवण्यासाठी हे कर्ज घेऊ शकतात.
हे ही वाचा – पंतप्रधान आवास योजना अर्ज पडताळणी सुरु! तुमचं नाव यादीत आहे का? लगेच Verification करून घ्या
किसान क्रेडिट कार्ड योजनेमध्ये पात्रता देखील खूप सोपी आहे. जर तुमच्याकडे स्वतःची जमीन असेल किंवा तुम्ही जमीन भाड्याने घेऊन त्यामध्ये शेती करत असाल किंवा तुम्ही दूध व्यवसायात, मेंढी पालन, मासेमारी, यासारखी शेती विषयक काम करत असाल. तर तुम्ही या योजनेसाठी अर्ज करू शकता. सरकार आता कृषी आणि त्याच्या संबंधित छोट्या व्यवसायांनाही किसान क्रेडिट कार्ड देत आहे.
या योजनेसाठी तुम्हाला अर्ज करायचा असेल, तर तुम्ही जवळच्या बँकेत जाऊन अर्ज करू शकता. अनेक बँका आता ऑनलाईन ही KCC चा अर्ज स्वीकारत आहेत. जसे की, बँक ऑफ महाराष्ट्रा किसान क्रेडिट कार्ड अर्ज करण्यासाठी तुमच्याकडे कोणते कागदपत्र आवश्यक आहेत. तर मित्रांनो, अर्ज करण्यासाठी तुम्हाला आधार कार्ड, पत्त्याचा पुरावा, सातबारा उतारा किंवा जमीन भाड्याने असल्याचं पत्र, बँक पासबुक आणि दोन फोटो असणे आवश्यक आहे.
बँकेत अर्ज सादर केल्यानंतर बँक तुमच्या कागदपत्राची तपासणी करते. आणि 8 ते 10 दिवसात तुमचं किसान क्रेडिट कार्ड मंजूर झालं तर तुम्हाला Credit Card देते. या कार्डचा वापर तुम्ही ATM मशीन किंवा ऑनलाईन व्यवहारासाठी करू शकता. म्हणजे बाजारात काहीही घेण्यासाठी हे कार्ड तुम्हाला वापरता येते.
किसान क्रेडिट कार्ड योजनेचे फायदे
किसान क्रेडिट कार्ड योजनेचा आणखी एक महत्त्वाचा फायदा असा आहे की, हे कर्ज फिरते कर्ज असते. म्हणजे तुम्ही घेतलेले कर्ज परतफेड केल्यावर पुन्हा डबल तुम्ही कर्ज घेऊ शकता. यासाठी तुम्हाला परत अर्ज करण्याची गरज नाही. हे कार्ड पाच वर्षासाठी चालू राहतं आणि दरवर्षी त्याचे नूतनीकरण करता येतं.
चालू वर्षांमध्ये सरकारने ही योजना अजून सक्तीने राबवली आहे. कारण आता अनेक बँका शेतकऱ्यांना PM Kisan योजनेशी लिंक करून KCC मंजूर करून देत आहेत. म्हणजे ज्यांचे पीएम किसान योजनेमध्ये नाव आहे. त्यांना कार्ड लवकर मिळण्याची शक्यता असते. त्यासाठी तुमचा मोबाईल नंबर आणि आधार कार्ड एकमेकांशी लिंक केलेलं असणं गरजेचं आहे.
किसान क्रेडिट कार्ड ही शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची योजना आहे. ती शेतकऱ्यांना आर्थिक मदत देते, आणि कोणत्याही ठिकाणी कोणत्याही परिस्थितीत शेतकरी मित्रांना आधार मिळत असतो. जर तुमच्याकडे अजून Kisan Credit Card Yojana चे कार्ड नसेल तर वेळ न घालवता, तुम्ही आपल्या जवळील बँकेत जाऊन आजच अर्ज करा. आणि सरकारच्या या मदतीचा आर्थिक लाभ घ्या.