ladki bahin jun installment update 2025 – लाडक्या बहिणींना जूनचा हप्ता कधी मिळणार?

ladki bahin jun installment लाडक्या बहिणींना जूनचा हप्ता कधी मिळणार? या प्रश्नाचं उत्तर आता मिळाले आहे. महाराष्ट्र सरकार ने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सर्व पात्र महिलांना दर महिना 1500 रुपये चा हप्ता देण्यात येतो.

ladki bahin jun installment

जून महिन्याच्या हप्त्याला थोडा वेळ लागला होता, परंतु आता महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे ने जुलै 4 रोजी एक्स वर Tweet करत सांगितले की, जून महिन्याचा राहिलेला सन्मान निधी 5 जुलै पासून पात्र महिलांच्या खात्यात जमा करायला सुरू करण्यात आली आहे. आणि 6 जुलै पासून पात्र महीलांच्या आधार शी लिंक बँक खात्यात हा निधी जमा होणार आहे.

ladki bahin jun installment update

या घोषणेनुसार, 5 जुलै पासून पैसे थेट खात्यात जमा होतील. काही स्थानिक न्यूज नेटवर्क म्हणतात की, 5 ते 7 जुलै पर्यंत हे पैसे प्रत्येक लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होतील.

बँकिंग प्रणालीच्या स्लो सर्वरमुळे पैसे जमा व्हायला, दोन ते तीन दिवसाचा वेळ लागू शकतो. परंतु या पुढील दोन दिवसात सर्वांच्या खात्यावर पैसे येतील.

बुधवारी मा. उप. मुख्या. अजित पवार यांनी सांगितले की, सरकारने जवळपास 3,600 कोटी रुपये महा डीबीटीद्वारे सर्वांच्या खात्यात जमा करावयाचे आदेश दिले आहेत, उद्या पासून सर्वांच्या खात्यावर पैसे जमा होतील. अशी अपेक्षा सर्वांना आहे.

जून महिन्याचा पैसा देण्यासाठी खूप वेळ लागला म्हणून, सरकारने 410 कोटींचा अतिरिक्त निधी मंजूर करून, अनुसूचित जाती च्या लाभार्थ्यांनासाठी ह्या निधीचा फायदा होऊ शकतो.

या निधीच्या मदतीने अनुसूचित जातीच्या लोकांना त्यांच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यास मदत मिळू शकते म्हणून त्यांच्यात खूप आनंदाचे वातावरण आहे.

Ladaki bahin money लाडकी बहिण सरकारचा मोठा निर्णय

पैसे बँक खात्यात जमा झाले का नाही हे बघण्यासाठी तुम्ही तुमच्या आदर्श लिंक असलेल्या बँक खात्यात नेट बँकिंग किंवा मोबाईल ॲप द्वारे पैसे चेक करू शकता.

काही लाभार्थ्यांचे बँक खाते बंद असेल किंवा आधारशी लिंक केलेले नसेल त्यांच्या शंकेचे निरसन सात ते आठ जुलै रोजी करण्यात येईल अशी माहिती देखील देण्यात आलेली आहे म्हणून सर्वांनी आपले बँक खात्याशी आधार कार्ड लिंक करून घ्यावे.

माझी लाडकी बहीण योजनेने गेल्या काही महिन्यात लाखो करोडो महिलांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा केलेली आहे परंतु जून आणि जुलै च्या हप्त्याला वेळ लागल्यामुळे काही महिलांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी आत्ताच केलेल्या घोषणेमुळे पैसे थेट लाभार्थ्याच्या बँक खात्यात जमा होईल झालेली आहे.

म्हणून महिलांच्या आर्थिक अडचणी सुधारतील अशी अपेक्षा सर्वांनाच आहे. माझी लाडकी बहीण योजनेचा दीड हजार रुपयांचा निधी महिलांच्या घर खर्चात मुलांच्या शिक्षणात किंवा त्यांच्या आरोग्यावर खर्च करण्यास मदत मिळू शकते.

सर्वसामान्य म्हणून विचार केला तर हा निधी केवळ सरकारतर्फे आर्थिक मदत नसून महिलांच्या निर्णय क्षमतेची शक्ती वाढवणारा आहे. अनुसूचित जातीतील महिलांना निर्भरतेच्या दिशेने एक पाऊल टाकता येईल तसेच कोविड नंतरच्या काळात महिलांना आर्थिक गरज देणे महत्त्वाचे होते आणि ते माझी लाडकी बहीण योजनेने सिद्ध करून दाखवले आहे.

जर तुमचे नाव ladki bahin jun installment 2025 यादीमध्ये नसेल किंवा तुमच्या खात्यात अजूनही पैसे जमा झाले नसतील तर तुम्ही तुमचे बेणे पण फ्री स्टेटस तपासून बघू शकता. यामध्ये तुम्ही तुमचे आधार कार्ड बँक सी संलग्न केलेले आहे का हेही तपासा आणि सर्व गोष्टी कम्प्लीट असतील तर सात ते आठ दिवस थांबून पैसे येतात का याची वाट बघा. सर्व गोष्टी करूनही तुमचे पैसे खात्यात जमा झाले नसतील तर तुम्ही जिल्हा कार्यालयाशी संपर्क साधून तुमचे समस्या त्यांना सांगू शकता.

महाराष्ट्र सरकार येत्या काही महिन्यात लाडक्या बहिणीचे पैसे वेळापत्रक ठरवून देण्याचा प्रयत्न करत आहे मागील काही महिने बघता मायक्रो फायनान्स आणि महिला बचत गटांसाठी कर्ज पतसंस्था सुविधा अशा अनेक गोष्टीचा समावेश करण्याचा सरकार प्रयत्न करत आहे.

या सर्व गोष्टींमुळे राज्यातील लाडक्या बहिणींना सन्मानाने साहाय्य मिळत आहे त्यामुळे प्रत्येक महिलेला ladki bahin jun installment ही योजना आधारस्तंभ सारखी साथ देत आहे. प्रत्येक महिन्याच्या सुरुवातीपासूनच पैसे लाभार्थ्याच्या खात्यात जमा होतील याची ग्वाही सरकारकडून देण्यात आलेली आहे यामुळे तुमचा आर्थिक समतोल राखता येईल.

Kishor Gaikwad-Patil


नमस्कार! मी किशोर गायकवाड-पाटील.
गेल्या 6 वर्षांपासून ब्लॉगिंग करत आहे. 2019 पासून मी सरकारी योजना या विषयावर ब्लॉग लिहायला सुरुवात केली, आणि आजपर्यंत अनेक लोकांपर्यंत योजनांची योग्य माहिती पोहोचवली आहे.
लोकांना योजना समजावून सांगणं, अर्ज कसा करायचा ते सांगणं, आणि योग्य माहिती देणं हे माझं मुख्य काम आहे.
आमचं एकच ध्येय आहे – सर्वसामान्य माणसाला कोणती योजना आहे, तिचा फायदा कसा घ्यायचा, आणि अर्ज कसा करायचा हे नीट समजलं पाहिजे.

Leave a Comment