राज्यातील प्रत्येक कुटुंब लखपती करण्याच्या उद्देशाने अनेक योजना राबवल्या जातात. त्याच प्रमाणे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना ही सुद्धा राबवली जाते. बघायचा गेले तर आधी तुम्हाला सिंचन विहिरीचे काम दिले जात होते, तुम्हाला हे काम वैयक्तिकेत दिले जाते. आता या वैयक्तिक विहिरीमध्ये जास्तीत जास्त शेतकरी पात्र करण्यासाठी या वैयक्तिक विहिरीच्या निकषा मध्ये काही बदल करण्यात आलेले आहेत.

विहीर अनुदान योजना माहिती
यामध्ये कोण कोणते बदल करण्यात आलेले आहेत हे बघू. जास्तीत जास्त शेतकरी यामध्ये पात्र होत आहेत. याची A To Z माहिती आपण या पोस्टच्या माध्यमातून बघणार आहोत. तर मित्रांनो, ही पोस्ट तुम्ही शेवटपर्यंत वाचा आणि आमच्या WhatsApp Group ला join व्हा. म्हणजे तुम्हाला सर्व माहिती WhatsApp Group वर मेळेल.
ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लीक करा
WhatsApp Group Join
मागेल त्याला विहीर योजना
मित्रांनो, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत प्रत्येक कुटुंब हे लखपती करण्याच्या उद्देशाने वैयक्तिक सिंचन विहिरी दिल्या जात आहेत. आता मागेल त्याला विहीर योजने मध्ये काही निकषा मध्ये बदल करण्यात आले आहेत. पूर्वीचे निकष जर बघितले तर पूर्वी तुम्हाला विहिरीसाठी 4 लाख अनुदान होते. हेच अनुदान आता वाढविण्यात आले आहे.
विहिरीसाठी पाच लाख रुपये अनुदान
म्हणजे प्रत्येक शेतकऱ्याला वैयक्तिक विहिरीसाठी 5 लाख रुपये अनुदान महाराष्ट्र शासनामार्फत दिले जाते. आता यामध्ये बदल काय करण्यात आले आहेत. 8 जानेवारी रोजी एक शासन निर्णय आला आहे. आणि या शासन निर्णयामध्ये सांगितलं आहे की, इंद्रा आवास योजनेलाच आता प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये विलीन करण्यात आले आहे. म्हणजे एकच योजना ही राबवले जाते ती म्हणजे प्रधानमंत्री आवास योजना.
दुसरं म्हणजे वर्ग दोनचे जे भोगवट दर असतील किंवा जे भूधारक असतील त्यांना सुद्धा आता वैयक्तिक सिंचन विहिरीसाठी पात्र करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने ठोस पावले उचलली आहेत. म्हणजेच काय, जे प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत जे शेतकरी असतील आणि ते पात्रता निकष धारण करत असतील म्हणजेच काय तर त्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये विहीर नसायला पाहिजे. जर असे असेल तर ते शेतकरी पात्र होतात. त्यांना सुद्धा वैयक्तिक सिंचन विहिरीचा लाभ दिल्या जाईल.
वैयक्तिक सिंचन विहिर शासन निर्णय
अशा प्रकारे नवीन शासन निर्णया मध्ये सांगण्यात आले आहे. दुसरं म्हणजे, भोगवटदार दोनच्या ज्या जमिनी आहेत त्या जमिनीचे जे भूधारक आहेत जे शेतकरी आहेत ते सुद्धा या ठिकाणी पात्र केले जातील फक्त त्यासाठी एक अट टाकण्यात आली आहे. म्हणजेच काय तर ते शेतकरी सर्व निकषा मध्ये पात्र असले पाहिजेत.
वैयक्तिक सिंचन विहीर पात्रता
आता सर्वात महत्त्वाची पात्रता काय? बेसिक पात्रता म्हणजे काय? तर त्या शेतकऱ्यांकडे अगोदर पासून विहीर नकोय. म्हणजेच तुमच्या सातबारा उताऱ्यावर विहिरीची नोंद असेल तर ते शेतकरी या ठिकाणी पात्र होत नाहीत. सर्वात महत्वाचा निकष हा आहे की, त्या शेतकऱ्याच्या सात बाऱ्या वरती विहीर नसायला पाहिजे.
दुसरी महत्त्वपूर्ण बाब म्हणजे शासन निर्णयामध्ये जीआर मध्ये एक गोष्ट नमूद करण्यात आलेली आहे की, प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत चे लाभार्थी आणि वर्ग दोनचे जे भूधारक शेतकरी असतील ते सुद्धा या ठिकाणी पात्र करण्यात आले आहेत. मित्रांनो, अत्यंत महत्त्वपूर्ण असा नवीन जीआर आलेला आहे.