MahaDBT ठिबक सिंचन, पाईपलाइन अनुदान योजना – मोबाईलवरून अर्ज कसा करावा

MahaDBT ठिबक सिंचन, पाईपलाइन अनुदान योजना. शेतकऱ्यांना शेतीसाठी उपयोगात येणाऱ्या साधनांसाठी सरकार अनेक योजना आणत असते. त्या योजनांमध्ये ठिबक सिंचन, पाईप लाईन, शेततळे, फवारणी यंत्र. अशा अनेक घटकांसाठी सरकार शेतकऱ्यांना अनुदान देते. आणि या योजनेचा लाभ घेण्यासाठी आपण काय केले पाहिजे, याची सर्व माहिती किंवा अर्ज करण्याची प्रक्रिया मी तुम्हाला सांगणार आहे. आणि तुम्ही घरबसल्या आपल्या मोबाईल वरूनच अर्ज करू शकता. त्यासाठी महाराष्ट्र सरकारने MahaDBT पोर्टल सुरू केलेले आहे.

MahaDBT ठिबक सिंचन, पाईपलाइन अनुदान योजना

शेतकऱ्यांना सरकारच्या महाडीबीटी पोर्टल वर लॉगिन करून, अर्ज भरायचा आहे. जर तुमच्याकडे शेतकरी आयडी म्हणजेच Farmer ID नसेल, तर तो तुम्ही जवळच्या CSC केंद्रावरून किंवा महाडीबीटी पोर्टलवरून स्वतः तयार करून घेऊ शकता. हा ID तयार करण्यासाठी आधार कार्ड, सातबारा, बँक पासबुक आणि मोबाईल नंबर लागतो.

महाडीबीटी मध्ये लॉगिन केल्यावर तुम्ही तुमचं स्वतःचं प्रोफाईल भरून घ्यावी. त्यामध्ये शेताची माहिती, शेतातील पीक, शेतीचे एकूण क्षेत्र, निवासाचा पत्ता, बँक खात्याचे तपशील भरावे लागतात. ही सर्व माहिती भरून पूर्ण झाल्यावर तुम्ही ठिबक सिंचन योजना, पाईपलाईन योजना किंवा इतर कोणत्याही योजनांसाठी अर्ज करू शकता.

MahaDBT ठिबक सिंचन, पाईपलाइन अनुदान योजना अर्ज प्रक्रिया

तुम्हाला तुमच्या स्वतःच्या मोबाईलवरून अर्ज करणे खूपच सोपे आहे. मी इथे दिलेल्या MahaDBT च्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन महाडीबीटी मध्ये लॉगिन करा. किंवा Google Chrome मध्ये MahaDBT टाकून तुम्ही थेट सर्च करून त्यांचे पोर्टल उघडू शकता. लॉगिन करण्यासाठी आधार नंबर आणि मोबाईल नंबर लागतो. तो टाकून झाल्यावर सेंड OTP या बटणावर क्लिक करा. लॉगिन प्रक्रिया पूर्ण झाल्यावर अर्ज करा या ऑप्शन वर क्लिक करा. तुम्हाला ज्या योजनेसाठी अर्ज करायचा आहे, ती योजना निवडा आणि पुढील माहिती भरा.

ठिबक सिंचन किंवा पाईपलाईन साठी अर्ज करायचा असेल, तर तुम्हाला खालील कागदपत्रे लागतील. सातबारा उतारा, पिकाची माहिती, जमिनीचा 8 अ उतारा, पंपाचे वीज बिल, बँक पुस्तक, ओळखपत्र आणि विकत घेतलेल्या साहित्याचे दुकान विक्रेत्याकडून मिळालेले कोटेशन पावती. ही सगळी कागदपत्र स्कॅन करून मोबाईल मधूनच अपलोड करा. तो फॉर्म भरल्यानंतर सबमिट बटनावर क्लिक करा.

हे ही वाचा – PM Fasal Bima Yojana 2025 – फक्त २% भरून मिळवा पिकासाठी पूर्ण विमा संरक्षण अर्ज प्रक्रिया पहा

एवढी प्रक्रिया केल्यानंतर तुमचा अर्ज पुढील विभागाकडून तपासला जातो. काही दिवसांनी तुम्हाला एक मेसेज किंवा पोर्टलवरून माहिती मिळते की, तुमचा अर्ज मंजूर झाला आहे का नाही. जर मंजूर झाला असेल, तर तुम्हाला आपल्या भागातील विक्रेत्याकडून साहित्य घ्यावे लागते. आणि त्या साहित्याची पावती पोर्टलवर पुन्हा अपलोड करावी लागते. ही सर्व प्रोसेस झाल्यानंतर अनुदानाची रक्कम थेट तुमच्या बँक खात्यात जमा होते.

या सर्व ऑनलाईन प्रक्रियेमुळे शेतकऱ्याचा पैसा आणि वेळ वाचतो. तसेच सरकारच्या कामातली पारदर्शकता दिसून येते.

सरकारकडून दिली जाणारी MahaDBT ठिबक सिंचन, पाईपलाइन अनुदान योजना पूर्णपणे मोफत आहे. त्यामुळे कुठल्याही एजंट कडे पैसे देऊन अर्ज करणे टाळा व फॉर्म वरील अचूक माहिती योग्य कागदपत्रे व वेळेतच अर्ज केल्यास तुम्हाला सहज या योजनेचा लाभ मिळू शकतो.

तर मित्रांनो, तुम्ही जर MahaDBT ठिबक सिंचन, पाईपलाइन अनुदान योजनाचा. लाभ घेण्याचा विचार करत असाल, तर आजच MahaDBT वेबसाईटवर जाऊन अर्ज करा. महत्त्वाचे म्हणजे, मोबाईल वरून अर्ज करणेही आपल्या सोईच आणि फायद्याचे आहे.

Kishor Gaikwad-Patil


नमस्कार! मी किशोर गायकवाड-पाटील.
गेल्या 6 वर्षांपासून ब्लॉगिंग करत आहे. 2019 पासून मी सरकारी योजना या विषयावर ब्लॉग लिहायला सुरुवात केली, आणि आजपर्यंत अनेक लोकांपर्यंत योजनांची योग्य माहिती पोहोचवली आहे.
लोकांना योजना समजावून सांगणं, अर्ज कसा करायचा ते सांगणं, आणि योग्य माहिती देणं हे माझं मुख्य काम आहे.
आमचं एकच ध्येय आहे – सर्वसामान्य माणसाला कोणती योजना आहे, तिचा फायदा कसा घ्यायचा, आणि अर्ज कसा करायचा हे नीट समजलं पाहिजे.

Leave a Comment