अंगणवाडी सेविका आणि मदतनीस भरतीसाठी अर्ज प्रक्रिया: संपूर्ण माहिती – Maharashtra Anganwadi Bharti 2025

Maharashtra Anganwadi Bharti 2025 – ज्या महिलांचे अंगणवाडी सेविका किंवा मदतनीस होण्याचं स्वप्न आहे, त्यांच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. महिला व बाल विकास विभागाच्या वतीने महाराष्ट्र राज्यात अंगणवाडी सेविका आणि मदतनीस पदांसाठी एक मोठी भरती सुरू होणार आहे. राज्यात एकूण 18882 पदे भरायची आहेत.

Maharashtra Anganwadi Bharti 2025

या पोस्टमध्ये, आम्ही तुम्हाला अंगणवाडी सेविका आणि मदतनीस पदासाठी अर्ज कसा करावा, पात्रता काय असावी, आवश्यक कागदपत्रे कोणती असावीत, आणि अर्ज प्रक्रिया कशी असेल याबाबत सविस्तर माहिती देणार आहोत.

18882 पदांची भरती

महिला व बाल विकास विभागाच्या मंत्री, A. Tatkare यांनी 18882 पदांची भरती होणार असल्याची माहिती दिली आहे. या भरतीसाठी योग्य उमेदवारांची निवड केली जाईल. यामध्ये 5639 अंगणवाडी सेविका आणि 13242 अंगणवाडी मदतनीस अशा 18882 पदांसाठी ही भारती चालू होणार आहे.

अंगणवाडी सेविका पात्रता

अंगणवाडी सेविका आणि मदतनीस नोकरी साठी काही महत्त्वाचे निकष ठरवलेले आहेत. खाली मी तुम्हाला सांगितले आहे त्यात तुम्ही पात्र असायला हवे .

अंगणवाडी सेविका नोकरी साठी किमान 10वी पास असावे. अंगणवाडी मदतनीस पदासाठी किमान 12वी शिक्षण झालेले असावे. याशिवाय कोणतीही उच्च शैक्षणिक पात्रता डिग्री किंवा पदवी असलेल्या महिलांनी प्रमाणपत्र जोडावे त्या महिलेला मराठी भाषेचे ज्ञान असणे गरजेचे आहे. या पदासाठी वय 18 वर्षे ते 35 वर्षे असावे. विधवा उमेदवारांसाठी वयोमर्यादा 40 वर्षे आहे. अर्जदार महिला गाव, वाडी, तांडा वस्ती येथील रहिवासी असावी. महिलेचा घरामध्ये दोनच अपत्य असावेत. जास्त मुले असलेले उमेदवार अपात्र ठरवले जातील.

Maharashtra Anganwadi Bharti 2025 साठी अर्ज कसा करावा

अर्ज ऑफलाइन घेतले जातात, परंतु काही ठिकाणी ऑनलाइन रजिस्ट्रेशन सुरू केले आहे. अर्ज पूर्ण भरलेला असावा. अपूर्ण अर्ज असेल तर रद्द होऊ शकतो. सर्व कागदपत्रावरू सही केलीली असावीत.

महत्त्वाची कागदपत्रे

महिला विवाहित किंवा विधवा असल्याचे प्रमाणपत्र असावे लागते. 12वी उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र, अधिक शैक्षणिक प्रमाणपत्र जोडावे. आधार कार्ड, लहान कुटुंब असल्याचे प्रमाणपत्र, आणि प्रवास प्रमाणपत्र.

महिला व बाल विकास विभागाचे महत्त्वाचे निर्णय

महिला व बाल विकास विभागाच्या सचिव, Dr. Anup Kumar Yadav आणि एकात्मिक बालविकास सेवा योजनेचे आयुक्त Mr. Kailas pagare यांनी विभागातील पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यासाठी बैठक घेतली होती. Minister. Aditi Tatkare यांच्या उपस्थितीत Maharashtra Anganwadi Bharti 2025 या निर्णयांची घोषणा करण्यात आली आहे.

अर्ज करण्याची शेवट ची तारीख

भरती प्रक्रिया 14 फेब्रुवारी ते पदे भरे पर्यंत आहे. अर्ज भरताना आणि कागदपत्रे सादर करताना सर्व कागदपत्रे जमा करावीत. कोणतेही कागदपत्र अर्ज केल्यानंतर स्वीकारली जाणार नाहीत. अर्जातील दिलेली माहिती अयोग्य असल्यास अर्ज बाद केला जाऊ शकतो.

अंगणवाडी सेविका आणि मदतनीस पदांसाठी मोठी भरती सुरू केली आहे. 18882 पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. महिलांसाठी ही एक मोठी आणि खास संधी आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख अजून जाहीर केलेली नाही.

हे हि वाचा –

जर तुम्हाला या Maharashtra Anganwadi Bharti 2025 साठी अर्ज भरायचा असेल, तर शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, रहिवासी प्रमाणपत्र आणि लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र असलेली कागदपत्रे लागतील. ही सर्व माहिती लक्षात ठेऊन, तुम्ही अर्ज करू शकता.

अधिक माहिती साठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या – Maharashtra Anganwadi Bharti 2025

अशाच महत्त्वपूर्ण माहितीचा फायदा तुमच्यापर्यंत पोहचवण्यासाठी आम्ही एक WhatsApp ग्रुप तयार केलेला आहे. तुम्ही त्यात जॉईन होऊ शकता.

Maharashtra Anganwadi Bharti 2025 साठी अर्ज करतांना कोणतीही शंका असेल तर, तुम्ही संबंधित विभागाशी संपर्क साधा किंवा या पोस्टच्या कमेंट मध्ये तो प्रश्न आम्हाला विचारू शकता.

Kishor Gaikwad-Patil


नमस्कार! मी किशोर गायकवाड-पाटील.
गेल्या 6 वर्षांपासून ब्लॉगिंग करत आहे. 2019 पासून मी सरकारी योजना या विषयावर ब्लॉग लिहायला सुरुवात केली, आणि आजपर्यंत अनेक लोकांपर्यंत योजनांची योग्य माहिती पोहोचवली आहे.
लोकांना योजना समजावून सांगणं, अर्ज कसा करायचा ते सांगणं, आणि योग्य माहिती देणं हे माझं मुख्य काम आहे.
आमचं एकच ध्येय आहे – सर्वसामान्य माणसाला कोणती योजना आहे, तिचा फायदा कसा घ्यायचा, आणि अर्ज कसा करायचा हे नीट समजलं पाहिजे.

Leave a Comment