महाराष्ट्र राज्य सहकारी बँक भरती 2025: 10वी पाससाठी सरकारी नौकरी, अर्ज प्रक्रिया पहा

महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेमध्ये भरती 2025 साठी सुरू झाली आहे. जर तुम्ही 10वी पास, 12वी पास किंवा पदवीधर असाल, तर ही एक उत्तम संधी आहे. बँकेत नोकरी मिळवायची इच्छा असेल, तर ही संधी वाया जाऊ देऊ नका.

महाराष्ट्र राज्य सहकारी बँक भरती

महाराष्ट्र राज्य सहकारी बँक भरती 2025 यामध्ये प्रशिक्षणार्थी कनिष्ठ अधिकारी, प्रशिक्षणार्थी लिपिक, टंकलेखक, शिपाई, चालक अशा विविध पदांसाठी जागा आहेत.

महाराष्ट्र राज्य सहकारी बँक भरती अर्ज प्रक्रिया माहिती

भारती साठी अर्ज करण्याची Last तारीख 06 August 2025 आहे. अर्ज करण्याची प्रक्रिया पूर्णपणे Online आहे. तुम्ही अधिकृत वेबसाइट वर जाऊन अर्ज करू शकता –

Maharashtra Co-op Bank Bharti

या साईटवर ‘Careers’ विभागात Maharashtra Co-op Bank Bharti विषयी सविस्तर माहिती दिलेली आहे.

Gold Price Prediction In Marathi 2025: पुढील 6 महिन्यांत सोनं किती महाग होईल?

अर्ज करण्यासाठी काही महत्वाची पात्रता आहे. Trainee Junior Officer साठी किमान पदवी असावी आणि मराठी विषय 10वीला पास असावा. Trainee Clerk किंवा Typist पदासाठी देखील पदवी लागते. Peon आणि Driver साठी किमान 10वी पास असणं आवश्यक आहे. Driver साठी ड्रायव्हिंग लायसन्स देखील आवश्यक आहे.

वय मर्यादा पदानुसार वेगवेगळी आहे. Clerk आणि Typist साठी 21 ते 28 वर्ष, Junior Officer साठी 23 ते 32 वर्ष, आणि Peon किंवा Driver साठी 18 ते 30 वर्ष इतकी वयोमर्यादा आहे.

अर्ज करताना उमेदवारांना काही कागदपत्रं लागतात – जसं की ओळखपत्र, शैक्षणिक प्रमाणपत्रं, पासपोर्ट साईझ फोटो, सही आणि इतर माहिती. अर्ज फी पदानुसार ठरते. सामान्य उमेदवारांसाठी ₹1180 ते ₹1770 इतकी फी लागते, पण अनुसूचित जाती, महिलांसाठी फीमध्ये सूट आहे.

निवड प्रक्रिया ही Online Exam आणि Interview द्वारे होणार आहे. Clerk, Officer आणि Typist पदांसाठी परीक्षा होईल. Typist साठी टायपिंग चाचणी सुद्धा घेतली जाईल. जो उमेदवार पात्र ठरेल, त्याला पुढील टप्प्यात बोलावलं जाईल.

प्रशिक्षण कालावधीत उमेदवारांना ठराविक स्टायपेंड दिलं जाईल. नंतर काम सुरु झाल्यावर बँकेच्या नियमानुसार पगार आणि सुविधा मिळतील. उदाहरणार्थ, Junior Officer ला सुरुवातीला ₹30,000 पर्यंत स्टायपेंड आणि नंतर ₹50,000 पेक्षा जास्त पगार मिळतो. लिपिक, शिपाई व इतर पदांसाठी सुद्धा या बँकेत चांगला पगार दिला जातो.

ही सरकारी बँक असल्यामुळे नोकरीत स्थैर्य, नियमित पगार, आणि इतर फायदे मिळतात. त्यामुळे महाराष्ट्र राज्य सहकारी बँक भरती तुमचं भविष्य सुरक्षित करणारी ठरू शकते. तुम्ही जर MSC बँकेत काम करण्याची स्वप्न बघत असाल, तर ही संधी तुमच्यासाठीच आहे.

Kishor Gaikwad-Patil


नमस्कार! मी किशोर गायकवाड-पाटील.
गेल्या 6 वर्षांपासून ब्लॉगिंग करत आहे. 2019 पासून मी सरकारी योजना या विषयावर ब्लॉग लिहायला सुरुवात केली, आणि आजपर्यंत अनेक लोकांपर्यंत योजनांची योग्य माहिती पोहोचवली आहे.
लोकांना योजना समजावून सांगणं, अर्ज कसा करायचा ते सांगणं, आणि योग्य माहिती देणं हे माझं मुख्य काम आहे.
आमचं एकच ध्येय आहे – सर्वसामान्य माणसाला कोणती योजना आहे, तिचा फायदा कसा घ्यायचा, आणि अर्ज कसा करायचा हे नीट समजलं पाहिजे.

Leave a Comment