पोलिस दंड नियम – वाहन चालकांसाठी एक मोठ्या निर्णयाची घोषणा आज सरकारने केली आहे. कारण आता पोलीस स्वतःच्या मोबाईल ने फोटो काढून कोणालाही दंड मागू शकणार नाहीत. जर ते असं करत असतील किंवा एखादा पोलीस असे कृत्य करताना आढळला, तर शासनाने त्याला तात्काळ निलंबित करण्याचे आदेश दिले आहेत.

गेल्या काही दिवसांमध्ये अनेक वाहन चालकांनी तक्रारी केल्या होत्या की, काही पोलीस अधिकारी कुठेही रस्त्यावर उभे राहून वाहनाचा फोटो स्वतःच्या मोबाईल मध्ये घेतात, आणि नंतर दंडाची नोटीस त्यांना पाठवतात. त्यामुळे वाहन चालकांना विनाकारण दंड भरावा लागत होता. म्हणून बऱ्याच नागरिकांमध्ये पोलिसांबद्दल अस्वस्थता वाढली होती.
पोलिस दंड नियम कायदा – पोलिस मोबाईलने दंड करू शकत नाहीत
राज्य शासनाने नागरिकांच्या या तक्रारी खूपच गांभीर्याने घेतल्या आहेत. आणि आता वाहतुकीचे नवीन पोलिस दंड नियम लागू केले आहेत. जर पोलिसांना एखाद्या वाहनावर दंड करायचा असेल, तर त्यासाठी शासनाने बनवलेल्या अधिकृत यंत्रणेचाच वापर करावा लागेल. जसे की, सरकारी कॅमेरे, वाहतूक नियंत्रण कक्ष किंवा सरकारच्या अधिकृत ॲप द्वारेच पोलिस दंड पाठवू शकतात. कोणताही पोलीस अधिकारी स्वतःच्या मोबाईलचा वापर करून, त्यात फोटो काढून दंड करत असेल, तर ते नियमाविरोधात आहे.
नवीन कर्जमाफी अपडेट महाराष्ट्र 2025: सरकारची मोठी घोषणा – संपूर्ण माहिती वाचा
प्रशासनाने स्पष्ट सांगितले आहे की, जर एखादा पोलिसाला स्वतःच्या मोबाईल मध्ये फोटो काढून दंड पाठवताना दिसला, तर त्याच्यावर तुम्ही तक्रार नोंदवू शकता पुढील अधिकारी त्याच्यावर योग्य ती कारवाई करतील व त्याला निलंबित केलं जाईल. त्यामुळे पोलीस कर्मचाऱ्यांनी त्यांच्या अधिकाराचा कधीही गैरवापर करू नये. व नागरिकांना त्रास होईल असे वर्तन ही करून नये अशा सूचना पोलीस अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
या नवीन पोलिस दंड नियम कायद्यामुळे वाहन चालकांना थोडाफार दिलासा मिळाला आहे. कारण अनेक वेळा चुकीच्या पद्धतीने पोलीस अधिकारी दंड लावत होते. व नागरिकांना त्यांच्या विषयी तक्रारी करायला मार्गच नव्हता. आता शासनाने पोलिसांना त्यांची जबाबदारी ठरवून दिली आहे. आता ते नियम पाळूनच दंड लावू शकतात.
प्रशासनाने पोलीस अधिकाऱ्यांनाही सांगितलं आहे की, नागरिकांशी सौम्य पद्धतीने वागावे, आणि कायदेशीरपणे त्यांच्यावर कारवाई करावी. कारण जर वाहन चालक नियम मोडत असेल, तर त्याला दंड व्हायलाच पाहिजे. चालकांनी सर्व नियम पाळलेले असतानाही, पोलिसांनी दंड लावणं बरोबर नाही. त्यामुळे आता पोलीस कर्मचाऱ्यांनी ही त्यांच्या कर्तव्याची योग्य जाणीव धरावी.
या नव्या ट्राफिक नियमामुळे नागरिकांना आपले हक्क बजावता येतात, आणि पोलिसांनाही त्यांच्या अधिकाराचा योग्य तो वापर करता येतो. शासनाने घेतलेला हा निर्णय सामान्य नागरिक आणि पोलीस यांच्यातील संबंध चांगले करण्यासाठी खूपच महत्त्वाचा ठरणार आहे.
जर एखाद्या चालकाला असं वाटत असेल की, त्याला चुकीच्या पद्धतीने दंड लावला गेला आहे आणि पोलिसांनी तो फोटो खाजगी मोबाईल मधून काढलेला होता, तर तुम्ही आता रीतसर तक्रार नोंदवू शकता. त्या तक्रारीवर त्वरित ॲक्शन घेतली जाईल. आणि दोषी पोलीस अधिकाऱ्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल.
महत्त्वाचं म्हणजे चालकांनी व नागरिकांनीही वाहतुकीचे नवीन नियम पाळले पाहिजेत. पोलीस कर्मचाऱ्यांनी ही योग्य पद्धतीने काम करावे. यामुळे आपला भाग, शहर, गाव अधिक सुरक्षित आणि शिस्तबद्ध राहील.