लग्न झाल्यानंतर अनेक सरकारी कामांसाठी विवाह प्रमाणपत्र (Marriage Certificate) लागते. जसे की. बँकेत जॉइंट अकाउंट उघडताना, व्हिसा काढताना, पॅन कार्ड जोडणी करताना किंवा काही सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी विवाह प्रमाणपत्र आवश्यक असते. परंतु आता हे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी सरकारी कार्यालयात लाईन लावायची गरज नाही. कारण आता तुम्ही घरबसल्या ऑनलाइन विवाह प्रमाणपत्र अर्ज करून विवाह प्रमाणपत्र काढू शकता.

महाराष्ट्र सरकारने ‘आपले सरकार सेवा पोर्टल’ आणि ‘IGR महाराष्ट्र’ या अधिकृत वेबसाईट्सवरून ऑनलाइन अर्जाची सोय उपलब्ध करून दिली आहे. तुम्ही या पोर्टलवर जाऊन विवाह नोंदणीसाठी अर्ज करू शकता.
ऑनलाइन विवाह प्रमाणपत्र अर्ज कसा करावा
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी सर्वात आधी तुम्हाला आपले सरकार सेवा पोर्टल वर जाऊन. या वेबसाइटवर लॉगिन करावं लागेल. जर तुमचं लॉगिन नसेल, तर नवीन खाते तयार करावं लागते. त्यानंतर “विवाह नोंदणी सेवा” निवडून अर्ज सुरू करता येतो. अर्ज ओपन झाल्यानंतर आपली वैयक्तिक माहिती त्या अर्जामध्ये भरावी.
अर्ज करताना काही आवश्यक कागदपत्रं लागतात. नवरा आणि नववधू यांचे आधार कार्ड, फोटो, विवाह निमंत्रण पत्रिका, पत्ता पुरावा आणि वयाचा दाखला. ही सर्व कागदपत्रं स्कॅन करून अपलोड करावी लागतात.
अर्ज भरल्यानंतर तुम्हाला एक अर्ज क्रमांक (Application ID) मिळतो. हा क्रमांक जपून ठेवा. नंतर काही दिवसात स्थानिक महानगरपालिका, ग्रामपंचायत किंवा तलाठी कार्यालयात जाऊन मूळ कागदपत्रांची पडताळणी करून घ्यावी लागते. ही प्रक्रिया पूर्ण झाली की, तुमचं विवाह प्रमाणपत्र अधिकृतरित्या मंजूर केले जाते.
नवीन ट्रॅक्टर अनुदान योजना सुरू! अर्ज करा आणि मिळवा ट्रॅक्टरवर थेट सरकारी मदत
प्रमाणपत्र मंजूर झाल्यानंतर, ते तुम्हाला PDF फॉर्ममध्ये ईमेलने मिळतं किंवा पोर्टलवर लॉगिन करून डाउनलोड करता येतं. हे प्रमाणपत्र कायम वैध असतं आणि सरकारी कामासाठी, बँकींग, किंवा परदेशी कामकाजात वापरता येतं.
संपूर्ण प्रक्रिया सहज, पारदर्शक आणि वेळ वाचवणारी आहे. अर्ज करण्यासाठी कोणत्याही एजंट किंवा दलालांची गरज नाही. तुमच्याकडे मोबाईल किंवा लॅपटॉप असल्यास, तुम्ही हे घरबसल्या स्वतः अर्ज करू शकता.
तुम्ही किंवा तुमच्या नातेवाईकांनी नुकतंच लग्न केलं असेल, तर ऑनलाइन अर्ज करून लगेच विवाह प्रमाणपत्र काढायला सांगा. यामुळे त्यांचे पुढचे प्रत्येक काम अधिक सोपं आणि अधिक जलद होईल.
जर कुणाला अर्ज करताना अडचण आली, तर CSC केंद्र, ग्रामसेवक, तलाठी कार्यालय किंवा नगरपालिकेत जाऊन मदत घेऊ शकता. काही ठिकाणी मॅरेज सर्टिफिकेट 20 ते 30 रुपये घेऊन काढून दिले जाते.
आजच्या डिजिटल युगात सरकारी कामे सोपी झाली आहेत. तुम्हीही घरबसल्या ऑनलाइन विवाह प्रमाणपत्र अर्ज करू शकता हे मी तुम्हाला सांगितले आहे. स्वतः अर्ज केल्याने आपला वेळ वाचून लवकरात लवकर अर्ज करून आपले विवाह नोंदणी प्रमाणपत्र काढून घेऊ शकतो.