पंतप्रधान आवास योजना ही गरिबांसाठी, विशेषतः ग्रामीण भागातील गरजू व गरीब कुटुंबांसाठी केंद्र सरकारची घर बांधणीसाठी दिली जाणारी मदतीची योजना आहे. या योजने मधुन घर मिळवण्यासाठी तुम्ही अर्ज केला असेल, तर आता तुमच्या पंतप्रधान आवास योजना अर्ज पडताळणी ला सुरुवात झाली आहे. म्हणजेच सरकार तुमच्या माहितीची आणि कागदपत्रांची तपासणी करत आहे.

पडताळणी म्हणजे, तुमच्या अर्जात दिलेली माहिती खरी आहे का खोटी, ते तपासलं जातं. उदा. तुमचं नाव, आधार कार्ड, बँक तपशील, जमीन आहे का नाही?, उत्पन्न किती आहे, घर आहे की नाही, अशा गोष्टी तपासल्या जातात. जर माहिती बरोबर नसेल, कागदपत्रं चुकीची असतील किंवा काही माहिती अपूर्ण असेल, तर तुमचा अर्ज रद्द होऊ शकतो. त्यामुळे सरकारने आता सगळ्या अर्जदारांना सांगितलं आहे की, त्यांनी लवकरात लवकर आपली माहिती तपासून Verification पूर्ण करावं.
पंतप्रधान आवास योजना अर्ज पडताळणी कशी करावी
तुम्ही Verification मोबाईलवरून किंवा जवळील ई सेवा केंद्र (CSC) मधून करू शकता. मोबाइलवर पडताळणी करण्यासाठी पंतप्रधान आवास योजना या अधिकृत वेबसाइटवर जाऊन तुमचा अर्ज क्रमांक टाकून बघता येतो की, तुमचं नाव यादीत आहे की नाही. जर “Pending for Verification” असं दाखवत असेल, तर तुम्ही तात्काळ तुमचं आधार कार्ड, बँक पासबुक, जमीन कागदपत्रं आणि फोटो यांसारखी माहिती सादर करून, पडताळणी पूर्ण करू शकता.
हे ही वाचा – तुकडे बंदी कायदा शिथील शासन निर्णय 2025 – आता जमीन घेणं झालं सोपं
Verification केल्यानंतर तुमचा अर्ज पुढील टप्प्यात जातो. जर सगळी माहिती बरोबर असेल, तर तुम्हाला योजनेअंतर्गत घर बांधण्यासाठी पैसे दिले जातात. ही मदत तीन टप्प्यांत दिली जाते. पहिल्या टप्प्यात घराचा पाया तयार करण्यासाठी, दुसऱ्या टप्प्यात बांधकामाच्या वेळी आणि तिसऱ्या टप्प्यात घर बांधून पूर्ण झाल्यावर अंतिम हप्ता दिला जातो.
काही लोकांकडून अर्ज भरताना चुका झालेल्या असतात, जसं की नावात स्पेलिंगची चूक असणे, आधार कार्ड मोबाईलशी लिंक नसणे, किंवा जुनी माहिती दिलेली असणे. अशा चुका वेळेत सुधारल्या नाही, तर अर्ज Rejecte केला जाऊ शकतो. त्यामुळे Verification ही फार महत्त्वाची प्रक्रिया आहे.
जर तुमचं नाव लिस्ट मध्ये असेल, पण पडताळणी बाकी आहे, तर तुम्ही गरज असल्यास तुमच्या गावातील ग्रामसेवक, तलाठी, यांच्या कडे सुद्धा मदत मागू शकता. सरकारी कर्मचारी या कामा साठी तयार आहेत.
सरकारचं ध्येय आहे की, प्रत्येक गरीब कुटुंबाला स्वतःचं घर मिळावं. त्यामुळे ही योजना संपूर्णपणे पारदर्शक आहे. आणि यात फसवणुकीला थारा नाही. त्यामुळे कोणत्याही दलालाकडे, एजंट कडे न जाता, स्वतः अर्ज करा आणि स्वतः Verification पूर्ण करा.
जर तुम्ही पंतप्रधान आवास योजनेसाठी पात्र असाल, आणि तुमचं घर या आधी बांधलेले नसल्याचं पुराव्यानिशी दाखवू शकत असाल, तर सरकार तुमचं स्वतःचं हक्काचं घर बांधून देईल. त्यामुळे वेळ न घालवता Verification process complete करा आणि तुमचं नाव मंजूर यादीत आणा.