पीठ गिरणी व तार कुंपण योजना अर्ज सुरू – आज अनेक शेतकरी स्वतःचं काहीतरी सुरू करून घरबसल्या कमाई करण्याचा विचार करत आहेत. काहींना पीठ गिरणी सुरू करायची आहे, तर काहींना शेतीभोवती तार कुंपण लावून ती सुरक्षित ठेवायची आहे. या दोन्ही गोष्टी करणे शक्य आहे. कारण सरकारी नवीन योजना सुरू झाली आहे.

तुम्हीही या योजनेचा लाभ घेऊ शकता फक्त खाली दिलेली माहिती लक्षपूर्वक वाचा आणि या सरकारी योजनेचा पुरेपूर लाभ घ्या.
पीठ गिरणी व तार कुंपण योजना
साधारणपणे गावाकडं गहू, ज्वारी, दाळ दळायला 8–10 किलोमीटर लांब जावं लागतं. अशावेळी जर तुमच्याकडे स्वतःची पीठ गिरणी असेल तर गावातच सेवा देता येते आणि त्यातून चांगली कमाईही होते. यासाठी सरकारने एक योजना सुरू केली आहे. ज्या मध्ये तुम्हाला पीठ गिरणी खरेदीसाठी अनुदान मिळू शकतं.
गिरणीचा खर्च 50,000/- रुपये असेल, तर योजनेअंतर्गत तुम्हाला 40,000/- पर्यंत सरकारी मदत मिळते आणि फक्त 10,000/- रुपये तुमच्याकडून लागतात. ही गिरणी वीजेवर किंवा सौरऊर्जेवर चालणारी असते.
➡️ 10 लाखांचं कर्ज घ्या आणि फक्त 7 लाख रुपयेच भरा
तार कुंपण योजना – शेतीचं संरक्षण
शेतीत पशु, डुक्कर, निलगाय यांसारख्या प्राण्यांमुळे नुकसान होणं सामान्य बाब आहे. ही अडचण सोडवण्यासाठी सरकारने तार कुंपण (Fencing) योजनेतून शेतकऱ्यांना कुंपण घालण्यासाठी अनुदान द्यायला सुरुवात केली आहे.
तुम्ही जेवढी शेती कुंपणाने बंद कराल, त्यानुसार तुम्हाला तार, खांब आणि बसवण्याचा खर्च यासाठी आर्थिक मदत दिली जाते. यात देखील तुम्हाला फक्त 5% – 10% हिस्सा भरावा लागतो, उरलेले पैसे शासन देते.
अर्ज कसा करायचा?
या दोन्ही योजनांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया अगदी सोपी आहे. सर्वप्रथम तुम्ही तुमच्या गावातील कृषी कार्यालय, CSC केंद्र किंवा ग्राहक सेवा केंद्रात जाऊ शकता. तिथे अर्जाचा फॉर्म मिळतो.
खालील कागदपत्रे तयार ठेवा
- 7/12 उतारा
- आधार कार्ड
- बँक पासबुक
- फोटो
- मोबाईल नंबर
हे कागदपत्र फॉर्मसोबत जोडून तुम्ही अर्ज करू शकता. काही जिल्ह्यांमध्ये ही प्रक्रिया Online पोर्टलवरून देखील सुरू आहे.
अर्ज करताना लक्षात ठेवा
काही वेळा लोक योजना सुरू झाली की, घाईघाईने एजंटकडे जातात. पण यामुळे फसवणुकीचा धोका असतो. म्हणून कोणत्याही एजंटकडे पैसे देऊ नका. फक्त अधिकृत सरकारी केंद्र, सेवा केंद्र किंवा कृषी सहाय्यक यांच्याकडे जाऊनच अर्ज करा.
जर अर्ज केल्यानंतर तुमचं नाव Waiting लिस्ट मध्ये आलं असेल, तर अधिकाऱ्यांशी वेळोवेळी संपर्क ठेवा आणि अर्जाची स्थिती विचारा.
या योजनेचे फायदे काय?
कमी खर्चात स्वतःचा व्यवसाय सुरू करता येतो. गावातच कमाईचा स्रोत तयार होतो. शेत सुरक्षित राहते, प्राण्यांपासून संरक्षण मिळतं. सरकारकडून मोठ्या प्रमाणात आर्थिक मदत ही मिळते. पीठ गिरणी व कुंपण दोन्ही टिकाऊ आहे.
महत्त्वाचे
शेतकऱ्यांसाठी आणि ग्रामीण भागातील तरुणांसाठी ही योजना खूप उपयोगाची आहे. तुम्ही पीठ गिरणी सुरू करून व्यवसाय करू शकता किंवा शेतीला सुरक्षित करण्यासाठी कुंपण लावू शकता. तेही अगदी कमी खर्चात.
सूचना
जर तुम्हाला या योजनांसाठी अर्ज करताना मदत हवी असेल, तर जवळच्या Agricultural Service Center ला संपर्क करा किंवा अधिकृत CSC center मध्ये चौकशी करा.