PM Fasal Bima Yojana शेती करताना व शेतात पिके घेताना सगळं काही आपल्या हातात नसतं. कधीकधी पावसाचे अति प्रमाण, तर कधी दुष्काळ, कधी गारपीट तर कधी किडीचा प्रकोप. असं काही झालं की, शेतकऱ्याचं लाखो रुपयांच नुकसान होतं. अशावेळी मदतीला येते ती फक्त प्रधानमंत्री फसल बीमा योजना. ही योजना म्हणजे शेतकऱ्यांच्या पिकाला सरकारकडून दिले जाणार विमा कवच.

या योजनेचा मुख्य उद्देश असा आहे की, जर तुमच्या शेतातील पिकाचे नुकसान झालं. तर तुम्हाला सरकारकडून आर्थिक मदत दिली जाते. म्हणजे, तुम्ही तुमच्या पिकावर केलेला खर्च वाया जाणार नाही. म्हणून केंद्र सरकार ही योजना राबवते. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी या योजनेत लाभ घेतला पाहिजे.
PM Fasal Bima Yojana 2025 – अर्ज प्रक्रिया पहा
हे ही वाचा – नवीन E Peek Pahani अॅप कसे वापरावे?
या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी फक्त थोडेच पैसे भरायचे आहेत. खरीप हंगामासाठी 2 % रक्कम. तर रब्बी हंगामासाठी 1.5% रक्कम. आणि फळबागेसाठी किंवा व्यापारी पिकांकरिता 5% रकमेचा भरणा शेतकऱ्याला करावा लागतो. बाकीचे पैसे राज्य सरकार व केंद्र सरकार मिळून भारतात. म्हणून कमी पैशात मोठ नुकसान झेलण्याची ताकद शेतकऱ्यांना मिळते.
प्रधानमंत्री फसल बीमा योजना मध्ये अर्ज करण्याची प्रक्रिया ही खूप सोपी आणि साधी आहे. Official website समोरील वेबसाईट अधिकृत आहे. या वेबसाईटवर जाऊन तुम्ही आपल्या मोबाईल वरून ही अर्ज करू शकता.
या साईटला भेट दिल्यानंतर, आपल्याला समोरच फार्मर कॉर्नर अशा नावाचे ऑप्शन दिसेल. त्यावर क्लिक करून तिथेच अप्लाय फॉर क्रॉप इन्शुरन्स हा पर्याय निवडायचा आहे. पुढे दिसणारी सर्व माहिती भरून घ्यावी. जसे की, नाव, आधार नंबर, पिकाचा प्रकार, शेतीची माहिती, सातबारा उतारा, बँक माहिती इत्यादी माहिती भरून अर्ज सबमिट करावा लागतो.
ज्या शेतकऱ्यांकडे अँड्रॉइड मोबाईल किंवा स्मार्टफोन नसेल, तर त्यांनी आपल्या जवळील CSC केंद्र किंवा जवळ असणाऱ्या बँकेतून सुद्धा अर्ज भरता येऊ शकतो. समजा जर तुम्ही याच्या अगोदरच बँकेकडून पीक कर्ज घेतलं असेल. तर तुमच्या पिकाचे विमा संरक्षण आपोआपच बँकेमार्फत केले जाते. अशा कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांनी अर्ज नाही केला तरी जमते.
या योजनेमुळे शेतकऱ्यांचा खूप मोठा फायदा होतो. म्हणजे ही योजना पेरणी पासून ते काढणीपर्यंत तुमच्या पिकाला विमा कव्हर प्रदान करते. जरी पावसामुळे पेरणीच झाली नाही. तरीही तुम्हाला विमा कंपनी नुकसान भरपाई देते. पेरणी झाल्यानंतर काही दिवसांनी वादळ आले, पाऊस जास्त झाला किंवा गारपीट झाली किंवा इतर काही कारणे असतील, तर त्या गोष्टीलाही विमा कंपनी तुम्हाला विम्याचे पैसे देते.
शेतात आपल्या पिकाचे नुकसान झाले असेल, तर तुम्ही 72 तासाच्या आत, जवळच्या कृषी कार्यालय किंवा crop insurance या mobile app वर जाऊन तक्रार नोंदवावी लागते. पुढच्या 72 तासात विमा कंपनीकडून तुमच्या पिकांचा पंचनामा होतो. आणि जर तुमचे खरंच नुकसान झाले असेल, तर तुम्हाला नुकसान भरपाईची रक्कम थेट तुमच्या बँक खात्यात जमा केली जाते.
आजच्या डिजिटल युगात सरकारने या प्रक्रियेला अजून सोपं करण्यासाठी ड्रोन, सॅटॅलाइट इमेज, आणि मोबाईल ॲप्स वापरायला सुरुवात केली आहे. त्यामुळे तुमचे पंचनामे आता वेळेवर होतात आणि शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळतो.
प्रधानमंत्री फसल विमा योजना ही शेतकऱ्यांसाठी आधार देणारी योजना आहे. कमी पैशात शेतकऱ्यांच्या पिकाला विमा कव्हर मिळते. नुकसान झाल्यास तातडीने नुकसान भरपाई मिळते. तुम्ही अजूनही प्रधानमंत्री फसल बीमा योजनेचा अर्ज भरला नसेल, तर उशीर न करता आजच अर्ज करा. कारण ही योजना तुमच्या पिकाचे संरक्षण करण्यास कायम तत्पर असते.