Pm Kisan sanman nidhi 20 va hafta 2025: नवीन यादी जाहीर

Pm Kisan sanman nidhi 20 va hafta पी एम किसान सन्मान निधी योजनेचा विसावा हप्ता कधी येईल आणि तुमचं नाव लाभार्थी यादीत आहे की नाही हा प्रश्न सर्व शेतकऱ्यांच्या मनात आहे.

Pm Kisan sanman nidhi 20 va hafta

गेल्या महिन्याच्या सुरुवातीला म्हणजे पहिल्या आठवड्यात येण्याची अपेक्षा होती पण पी एम किसान योजनेची विसावी इन्स्टॉलमेंट आलेली नाही आता जुलै च्या पहिल्या ते दुसऱ्या आठवड्यात येईल अशी अजूनही अधिकृत घोषणा सरकार मार्फत केलेली नाही.

Pm Kisan sanman nidhi 20 va hafta

काही न्यूज माध्यमांनी 20 जून 2025 रोजी पीएम किसान ची विसावी इंस्टॉलमेंट येईल म्हणून असा अंदाज सांगितला होता. परंतु त्यांनी दिलेली माहिती खोटी ठरलेली आहे कारण अजूनही पैसे लाभार्थ्याच्या अकाउंट वर आलेले नाहीत. यानंतर जुलैमध्ये 18 जुलै रोजी मोतीहारी बिहार येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्या दिवशी थेट रक्कम प्रत्येक लाभार्थ्याच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे.

लाडक्या बहिणींना जूनचा हप्ता कधी मिळणार?

सरकारची प्रक्रिया किंवा त्याचे टप्पे पूर्ण झाल्यानंतरच ही रक्कम लाभार्थ्यांसाठी वितरित केली जाते. त्यासाठी सर्व लाभार्थ्यांनी किंवा शेतकऱ्यांनी आपल्या खात्याची ई-केवायसी, बायोमेट्रिक फेस ऑथेंटीकेशन करणे आवश्यक आहे. इ केवायसी करण्यासाठी आपल्याला पी एम किसान च्या अधिकृत On website वर जाऊन E KYC करून घ्यायची आहे. KYC पूर्ण करणे गरजेचे असते. तुमचे नाव, जन्मतारीख, IFSC Code आणि मोबाईल नंबर मध्ये तफावत असल्यास तुमच्या खात्यात पैसे येणार नाहीत. त्यामुळे तुम्ही या सर्व माहितीची तपासणी आपल्या जवळच्या बँकेत जाऊन करून घ्यावी.

पी एम किसान सन्मान निधी विसावा हप्ता

आपण पीएम किसान सन्मान निधी 2025 च्या यादीत आहात का याची माहिती मिळवण्यासाठी पीएम किसान ची अधिकृत वेबसाईट व्हिजिट करा. त्यांच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन फार्मर कॉर्नर मधील बेनिफिश्री स्टेटस किंवा बेनिफिशर लिस्ट ऑप्शन वर क्लिक करून आधार नोंदणीने किंवा मोबाईल नंबर द्वारे आपण लॉगिन करून आपली सर्व माहिती तपासून शकता.

आपले नाव यादीत नसेल तर आपल्याला त्याच वेबसाईटवर आपली सुधारणा करून सर्व माहिती अपडेट करायची आहे. जसे की सातबाराच्या नोंदी जमिनीची माहिती आणि सरकारी नोंदी अपडेट ठेवणे गरजेचे असते तरच आपल्या खात्यावर पीएम किसान चे पैसे येतात.

पी एम किसान सन्मान निधीचा हा हप्ता म्हणजे विसावी इन्स्टॉलमेंट देणे सरकारचं काम आहे आणि ते काम प्रत्येक वेळी काटेकोरपणे करतात गेल्या काही हप्त्यांची माहिती बघितली तर प्रत्येक वेळी वेळेवरच सरकारने लाभार्थ्यांचे पैसे महाडीबीटी द्वारे खात्यामध्ये वितरित केलेले आहेत. परंतु यावेळी थोडा विलंब लागण्याची शक्यता आहे विलंब लागण्याचे कारण म्हणजे लाभार्थ्यांची ई-केवायसी आधार कार्ड बँक ला लिंक नसणे किंवा लाभार्थ्याचे नाव यादीत विसंगतीचे असणे ही कारणे असू शकतात म्हणून आपल्याला या सर्व गोष्टी अगोदरच तपासून घ्यायच्या आहेत.

जुलै 2025 च्या मध्यात म्हणजेच 13 ते 14 जुलै नंतर पीएम किसान सन्मान निधी वितरणाची तारीख असू शकते कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 18 जुलै रोजी बिहारमध्ये मोतीहारी या ठिकाणी दौरा आहे आणि त्या दिवशी अधिकृतपणे आपल्या देशाचे पीएम नरेंद्र मोदी पीएम किसान सन्मान निधीचा दोन हजाराचा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ट्रान्सफर करतील अशी माहिती मिळालेली आहे.

सांगायचं झालं तर शेतकऱ्यांनी ही केवायसी आधार बँक लिंकिंग यादीतील नाव आणि सर्व गोष्टीवर लक्ष देऊन ही प्रक्रिया पूर्ण करावी या सर्व प्रक्रियेनंतरच विसावा हप्ता जूनच्या अखेरी किंवा जुलैमध्ये दुसऱ्या आठवड्यात आपल्या खात्यात जमा होण्याची जास्त शक्यता आहे त्यामुळे आपली माहिती तातडीने तपासून घ्यावी तरच आपल्याला पी एम किसान सन्माननिधीचा 20 वा हप्ता रक्कम 2000 मिळवून त्या रकमेचा फायदा सहज घेता येऊ शकतो.

  • पीएम किसान हेल्पलाइन:- 1800-115-5525
  • इतर हेल्पलाईन क्रमांक:- 155261 / 011- 24300606

Kishor Gaikwad-Patil


नमस्कार! मी किशोर गायकवाड-पाटील.
गेल्या 6 वर्षांपासून ब्लॉगिंग करत आहे. 2019 पासून मी सरकारी योजना या विषयावर ब्लॉग लिहायला सुरुवात केली, आणि आजपर्यंत अनेक लोकांपर्यंत योजनांची योग्य माहिती पोहोचवली आहे.
लोकांना योजना समजावून सांगणं, अर्ज कसा करायचा ते सांगणं, आणि योग्य माहिती देणं हे माझं मुख्य काम आहे.
आमचं एकच ध्येय आहे – सर्वसामान्य माणसाला कोणती योजना आहे, तिचा फायदा कसा घ्यायचा, आणि अर्ज कसा करायचा हे नीट समजलं पाहिजे.

Leave a Comment