प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना : PM Vishwakarma Yojana 2025 in Marathi

प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना : PM Vishwakarma Yojana 2025 आपल्या देशातील पारंपारिक कामगार, कारागीर आर्थिक दृष्ट्या मागासले आहेत. तर त्या लोकांना आर्थिक दृष्ट्या पाठबळ देण्यासाठी भारत सरकारने एक योजना सुरू केलेली आहे. त्या योजनेचे नाव म्हणजे प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना.

PM Vishwakarma Yojana 2025

प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना : PM Vishwakarma Yojana 2025 आपल्या देशातील पारंपारिक कारागिरांना आर्थिक मदत मिळावी, म्हणून पीएम विश्वकर्मा योजना सुरू केली आहे. या योजनेतून त्यांना केंद्र सरकार काही पैसे देऊन त्यांना आर्थिक दृष्ट्या मदत करण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु आजच्या या पळापळीच्या युगामध्ये खूप सारे कारागीर मागासलेले आहेत. अशा लोकांना सक्षम आणि आत्मनिर्भर होण्यासाठी सरकारने प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना चालू केली होती.

PM Vishwakarma Yojana 2025 : प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना

ही योजना 17 सप्टेंबर 2023 रोजी देशाचे pm नरेंद्र मोदी यांनी चालू केली. केंद्र सरकार या योजनेच्या माध्यमातून सुतार, लोहार, कुंभार, मूर्तिकार, शिंपी, कलाकार इत्यादी लोकांन आर्थिक मदत आणि मोफत कौशल्य विकास प्रशिक्षण देणार आहे.

हे हि वाचा –

प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेच्या माध्यमातून फक्त पारंपारिक कारागिरांना आर्थिक मदत करणे एवढाच उद्देश नसून, त्यांची काम करण्याची क्षमता वाढवणे हा आहे. आणि त्यांना आत्मनिर्भर करणे हा एक या योजने मागचा उद्देश आहे. या योजनेच्या माध्यमातून त्या नागरिकांना अनेक प्रकारचे फायदे दिले जातात.

प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेचे फायदे : Benefits of Pradhan Mantri Vishwakarma Yojana

पीएम विश्वकर्मा योजनेच्या मदतीने लाभार्थ्यांना तीन लाख रुपयांचे पर्यंत चे कर्ज मिळवून दिले जाते. या योजनेत दोन टप्प्यांमध्ये कर्ज वाटप केले जाते. पहिल्या टप्प्यात त्या व्यक्तीला एक लाख रुपयांचे कर्ज मिळते. तर दुसऱ्या टप्प्यात त्यांच्या व्यवसायात वाढ होण्यासाठी दोन लाख रुपयांचे कर्ज मिळते. या लाभार्थ्यांना हे कर्ज खूपच कमी व्याज दरात मिळते. म्हणजे या कर्जावर फक्त 5 % व्याज लावला जातो. अशा लाभार्थ्यांना केंद्र सरकार कौशल्य विकास प्रशिक्षण ही मोफत देत असते. त्यामुळे त्यांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यास मदत होऊ शकते, आणि त्यांचा व्यवसाय वाढू शकतो.

या योजनेमध्ये लाभार्थ्यांना मोफत प्रशिक्षण सरकारतर्फे दिले जाते. आणि प्रशिक्षण कालावधीमध्ये त्यांना 500 रुपये प्रति दीन वेतन ही दिले जाते.

प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर लाभार्थ्यांना PM विश्वकर्मा प्रमाणपत्र आणि ID ही मिळतो, त्याचबरोबर लाभार्थ्याला 15000/- रुपये Toolkit म्हणून मोफत दिले जाते.

डिजिटल इंडिया स्वप्नपूर्ती साठी किंवा त्यांच्या व्यवसायाला प्राधान्य देण्यासाठी केंद्र सरकार लाभार्थ्यांना दर महिन्याला Incentive ही देते.

तर मित्रांनो, अशा प्रकारे PM Vishwakarma Yojana 2025 : प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना भारत सरकारने राबवली आहे. तुम्हीही पीएम विश्वकर्मा योजनेचा लाभ घेऊन आपला व्यवसाय वाढवू शकता.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top