Ration Card E-Kyc Marathi Update 2025 राज्य सरकारने एक निर्णय घेतला आहे. जो प्रत्येक रेशन कार्ड धारकांसाठी खूपच महत्त्वाचा आहे. मित्रांनो, जर तुमचं किंवा तुमच्या कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीची ई-केवायसी झाली नसेल, तर तुमचं रेशन कार्ड मधून नाव वगळलं जाऊ शकतं. आणि तुम्हाला रेशन ही मिळणं बंद होऊ शकते. त्यासाठी तुम्हाला E KYC ची प्रोसेस लवकरात लवकर करून घेणे गरजेचे आहे.

रेशन कार्ड च्या माध्यमातून गरीब व गरजू कुटुंबातील व्यक्तींना दर महिन्याला सरकारी दराने धान्य मिळते. त्यात गहू, तांदूळ, डाळी इत्यादी असते. पण सरकारने आता असे ठरवले आहे की, हे सगळं फक्त त्याच व्यक्तींना मिळणार, ज्यांची ई-केवायसी कम्प्लीट झालेली आहे. जर तुम्हीही अजून पर्यंत ई-केवायसी केली नसेल, तर तुमचं नाव रेशन कार्ड मधून काढले जाऊ शकते व रेशनच्या दुकानात तुम्हाला धान्यही मिळणार नाही.
ई-केवायसी रेशन कार्ड मराठी | Ration Card E-Kyc Marathi Update
मित्रांनो ई केवायसी म्हणजे काय? बऱ्याच लोकांना e-KYC म्हणजे काय ते माहित नसते. तर मित्रांनो, ई-केवायसी म्हणजे तुमचं रेशन कार्ड आधार कार्डशी लिंक करणे, आणि त्याची तपासणी करणे यालाच ई केवायसी म्हणतात. ई-केवायसी च्या प्रक्रियेमुळे सरकार त्या व्यक्तीची खात्री करू शकत की, रेशन खरंच तोच व्यक्ती घेऊन जात आहे की, दुसरं कोणी घेऊन जात आहे. कारण आता अनेक डुबलीकेट रेशन कार्ड आणि बनावट नावे झालेली आहेत. त्यामुळे सरकारचं खूप मोठं नुकसान होतं. म्हणून ही प्रक्रिया सरकारने चालू केली आहे.
ई केवायसी झाली आहे का नाही हे कसं चेक करायचं? त्यासाठी तुम्ही तुमच्या जवळच्या रेशनच्या दुकानात जाऊ शकता किंवा मोबाईल वरूनच त्यांचे ऑफिशियल ॲप्स वापरून. त्यामध्ये आधार नंबर टाकून तुम्ही चेक करू शकता. आधार नंबर टाकल्यानंतर तुमच्या मोबाईलवर एक OTP पाठवला जातो. तो ओटीपी आपल्याला त्या ॲपवर टाकून त्या ॲपवर लॉगिन करायचे आहे. लॉगिन कम्प्लीट झाल्यावर तुम्हाला पुढे दाखवले जाईल की, तुमची केवायसी कम्प्लीट झाली आहे की नाही.
Ayushman Bharat Yojana Marathi 2025 – 5 लाख रुपयांचे मोफत उपचार
सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, कुटुंबातील एका व्यक्तीची ई-केवायसी झाली म्हणजे सर्वांची झाली असे नाही. तर त्या कुटुंबातील सर्व सदस्यांनी प्रत्येकाची वेगवेगळी KYC करून घ्यावी लागते. कारण सरकार प्रत्येक व्यक्तीच्या आधार कार्ड वरची माहिती जुळवून खात्री करते की, तो व्यक्ती खरा आहे की खोटा आहे.
ज्या राज्यांमध्ये ही योजना लागू केलेली आहे. तेथील लाखो लोकांची नावे रेशन कार्ड च्या यादीतून काढून टाकण्यात आलेली आहे. कारण त्यांनी वेळेवर केवायसी केली नव्हती. त्यामुळे जर तुम्हाला ही रेशन कार्डचा व सरकारच्या इतर अनेक योजनांचा फायदा घ्यायचा असेल. तर तुम्हाला आजच जाऊन तुमची ई-केवायसी अपडेट करून घ्यायची आहे. तुम्ही जर खूप उशीर केला, तर काही दिवसांनी तुमचं नाव यादीतून काढले जाईल आणि पुन्हा नोंदणी करण्यासाठी तुम्हाला खूप अडचणी येऊ शकतात.
e-KYC शेवटची तारीख महाराष्ट्र
महाराष्ट्र राज्यात देखील ई-केवायसी ची प्रोसेस सुरू झालेली आहे. त्यामुळे सरकारने जाहीर केलं आहे की, ज्या लोकांनी 30 जून 2025 पर्यंत E KYC अपडेट केली नाही. त्यांचं नाव रेशन कार्ड वरून काढण्यात येईल. त्यामुळे आता अजूनही तुमच्याकडे वेळ आहे. आजच तुमच्या जवळील ग्राहक सेवा केंद्रात जाऊन किंवा तुमच्या मोबाईलवरून तुम्ही स्वतःच आपली ई केवायसी पूर्ण करू शकता. तुम्हाला जर या सर्व गोष्टी खूप अवघड वाटत असतील, तर तुम्ही आपल्या जवळील रेशन दुकानात जाऊन ही आपल्या नावाची ई-केवायसी करू शकता.
तसेच तुम्हाला जर e-KYC बद्दल काही मदत हवी असेल, तर तुम्ही तुमच्या जवळच्या अंगणवाडी केंद्र, ग्राहक सेवा, तसेच रेशन दुकानात जाऊन तुमच्या समस्या विषयी चौकशी करू शकता. तेथील कर्मचारी तुम्हाला ई-केवायसी बद्दल सर्व माहिती देतील. काही ठिकाणी जसे की, ग्राहक सेवा केंद्रात 10 ते 15 रुपये केवायसी साठी घेतात. परंतु ही प्रक्रिया पूर्णपणे मोफत आहे. त्यामुळे अधिकृत ठिकाणावरूनच तुम्ही तुमची ई केवायसी पूर्ण करा.
सरकारी यंत्रना ही डिजिटल पद्धतीने काम करत आहे. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने आपली ओळख व पडताळणी आवश्यक करावी. हे केल्याने चुकीच्या व्यक्तींकडून सरकारची फसवणूक होणार नाही, आणि गरीब व गरजू लोकांपर्यंत त्यांचे धान्य योग्य रीतीने पोहोचले जाईल.
ऑनलाईन E-Kyc करण्यासाठी – National food security portal
मित्रांनो जर तुम्हाला तुमचं रेशन सुरू ठेवायचा असेल. तर तुम्ही E KYC लवकर पूर्ण करा. कारण सरकार योजना त्याच लोकांसाठी काढते, जे लोक त्या योजनेचे नियम वेळेवर पाळतात आणि पूर्ण करतात. त्यामुळे तुमचं कुटुंब ही सुरक्षित राहतं आणि योजनांचा फायदाही मिळतो. त्यामुळे ही लहानशी प्रक्रिया तुम्ही लवकरात लवकर करून घ्यावी.
