7/12 सातबारा – भूमी अभिलेखची नवीन वेबसाईट आली | सातबारा उतारा, 8अ, क – पत्रक, ई – मोजणी

मित्रांनो तुम्हाला 7/12 सातबारा उतारा काढायचा असेल किंवा 8अ उतारा काढायचा असेल, तर महाराष्ट्र सरकारने एक नवीन वेबसाईट सुरू केलेले आहे. अगोदरची जी भूमी अभिलेख ची वेबसाईट होती ती वेबसाईट काही कारणास्तव बंद करण्यात आलेली आहे. आणि आपल्या सेवेसाठी भूमी अभिलेख ने नवीन वेबसाईट सुरू केलेली आहे. त्या वेबसाईट विषयी मी तुम्हाला सविस्तर माहिती देणार आहे. ही पोस्ट तुम्ही शेवटपर्यंत वाचा.

सातबारा

भूमी अभिलेख ने एक नवीन वेबसाईट सुरू केली आहे. आणि ती सर्वांच्या वापरासाठी चालू आहे. भरपूर अशा लोकांना माहिती नाही की, भूमी अभिलेख ची नवीन वेबसाईट कोणती आहे? जर तुम्हाला सातबारा उतारा, 8 अ, मालमत्ता पत्रक (प्रॉपर्टी कार्ड), फेरफार उतारा, किंवा क – पत्रक काढायचे असेल तर तुम्ही हे सर्व ऑनलाईन काढू शकता.

मोफत सातबारा उतारा ऑनलाईन काढा

मित्रांनो, महाराष्ट्र सरकारने म्हणजेच भूमी अभिलेख या खात्याने त्यांच्या भरपूर अशा सेवा ऑनलाईन केल्या आहेत. त्यामध्ये सातबारा उतारा, 8अ उतारा, मालमत्ता पत्रक, मोजणीचे ई पत्रक, क पत्रक अशा सर्व सुविधा आपल्याला एकाच वेबसाईटवर उपलब्ध करून दिल्या आहेत.

यामध्येही दोन वेबसाईट सुरू केलेल्या आहेत. एक वेबसाईट सातबारा आणि आठ अ उतारा मोफत चेक करण्यासाठी आहे. या वेबसाईटवरील सातबारा उतारा 8 अ उतारा किंवा प्रॉपर्टी कार्ड तुम्ही फक्त बघण्यासाठीच वापरू शकता. यातील सातबारा किंवा आठ अ उतारा तुम्हाला कुठेही लीगली युज करता येणार नाही. ते फक्त विव ओन्ली प्रपोज साठी वापरात आणायचे आहे.

मोफत सातबारा उतारा कसा काढावा

मित्रांनो तुम्हाला जर मोफत सातबारा उतारा काढायचा असेल, तर या ठिकाणी त्यांची मी ऑफिशियल वेबसाईट ची लिंक देत आहे. त्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही 7/12 उतारा आठ अ उतारा मालमत्ता पत्रक क पत्रक अशा सर्व गोष्टी एका क्लिकवर ऑनलाईन बघू शकता.

चला तर आपण बघूया या सर्व गोष्टी ऑनलाइन आपण कशा बघू शकतो, ते तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगतो.

Step 1) – सर्वप्रथम आपण त्यांच्या वेबसाईटवर जायचे आहे, त्याची लिंक मी इथे दिलेली आहे.

ऑफिशियल वेबसाईट

Step 2) – वेबसाईट ओपन झाल्यानंतर आपल्याला जे कागदपत्र बघायच्या आहेत, त्याच्यावर क्लिक करायचे. उदाहरणार्थ – सातबारा उतारा, 8 A उतारा, मालमत्ता पत्रक, क – पत्र.

सातबारा काढण्यासाठी विडिओ पहा

Video Credit – Yojana Warta

आता बघूयात सातबारा उतारा कसा काढावा.

Step 1) – सातबारा काढण्यासाठी 7/12 उतारा इथे क्लिक करा.

Step 2) – सातबारा उतारा वर क्लिक केल्या नंतर पुढील माहिती भरून घ्या.

उदा. – तुमचा जिल्हा, तालुका, गाव, गट नंबर इतर सर्व माहिती भरून घ्या. त्यानंतर आपल्याला आपला मोबाईल नंबर आणि सांकेतिक कोड टाकायचा आहे.

हे हि वाचा – मागेल त्याला विहीर योजना 2025

Step 3) – या सर्व गोष्टी झाल्यानंतर आपण सातबारा पहा या बटनवर क्लिक करा.

Step 4) – अशा पद्धतीने तुम्हाला काहीच सेकंदात 7/12 तुमच्या मोबाईलवर डाऊनलोड करता येईल.

Step 5) – तुम्हाला अजून दुसरे कागदपत्र काढायचे असतील, तर तुम्ही दुसऱ्या बटन वर क्लिक करून काढू शकता.

आठ अ उतारा काढण्यासाठी, मालमत्ता पत्रक काढण्यासाठी, क पत्रक काढण्यासाठी तुम्हाला ही सर्व प्रोसेस करावी लागेल.

मित्रांनो, अशा पद्धतीने आपण सातबारा उतारा काढू शकता. किंवा तुम्हाला अजून दुसरे कोणते कागदपत्र लागत असतील, तर तेही काढू शकता. तुम्हाला ही माहिती कशी वाटली, हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि आपल्या WhatsApp ग्रुपला जॉईन व्हायला विसरू नका.

Leave a Comment