सौर कृषी पंप दुरुस्ती कशी करता येते? महाराष्ट्रातील अनेक शेतकरी शेतीसाठी सौर कृषी पंपाचा उपयोग करतात. सौर ऊर्जा वापरून पाणी उपसा करणे खर्चिक नसते, त्यामुळे याचा वापर मोठ्या प्रमाणात होतो. मात्र, सौर पंप काही महिन्यांनंतर किंवा वर्षांनंतर बिघडण्याची शक्यता असते. अशा वेळी पंप दुरुस्त करून घेणं आवश्यक असतं. पण बऱ्याच शेतकऱ्यांना माहितीच नसते की, दुरुस्तीसाठी अर्ज कसा करावा आणि त्यासाठी मदत कुठून मिळते.

असे बरेच प्रश्न प्रत्येक शेतकऱ्याच्या मनात असतात परंतु त्यांना अर्ज कुठे करावा कसा करावा याची माहिती नसते म्हणून मी तुम्हाला याची सर्व माहिती या पोस्टमध्ये दिलेली आहे.
सौर कृषी पंप दुरुस्ती साठी ऑनलाइन अर्ज कसा करायचा?
सौर कृषी पंप दुरुस्तीसाठी MSEDCL किंवा Mahaurja च्या Website वर अर्ज करावा. महावितरणच्या अधिकृत पोर्टलवर “Solar Pump Maintenance” किंवा “Complaint / Repair” नावाचा पर्याय असतो. तिथून तुम्ही तुमचा पंप बिघडल्याची माहिती नोंदवू शकता.
फक्त 5 टक्के रकमेचा भरणा करून नवीन सोलार पंप मिळवा
तसेच तुमचा पंप ज्या कंपनीमार्फत बसवण्यात आला आहे, त्या कंपनी कडे तक्रार करता येते. तुम्ही निवडलेल्या सौर पंप कंपनीचा Helpline Number किंवा solar Website ची माहिती असेल तर तुम्ही पंप दुरुस्तीची मागणी करू शकता.
अर्ज करताना कोणती माहिती लागते?
शेतकऱ्याला पंप दुरुस्ती अर्ज करताना काही महत्त्वाची माहिती भरावी लागते. example, शेतकऱ्याचं पूर्ण नाव, मोबाइल नंबर, पंप कुठे बसवलेला आहे याचा पत्ता, सौर पंपाचा क्रमांक, पंपाचा पुरवठादार कोण होता, आणि बिघाडाचं स्वरूप काय आहे. ही सर्व माहिती भरावी लागते. याशिवाय, काही वेळा पंपाच्या बिघाडाचे फोटो सुद्धा अपलोड करावे लागतात.
अर्ज केल्यानंतर पुढची प्रक्रिया काय असते?
अर्ज सबमिट केल्यावर संबंधित अधिकारी किंवा कंपनीचे Representative पंपाची पाहणी करतात. पाहणीदरम्यान पंप बिघाडाचं खरे कारण शोधलं जातं. काही वेळा समस्या तिथेच दूर केली जाते, तर काही वेळा काही भाग बदलण्याची गरज असते. पाहणीनंतर खूप मोठा बिघाड असेल तर पंप दुरुस्त करण्यासाठी पुढील Action घेतली जाते.
दुरुस्ती पूर्ण होण्यासाठी किती वेळ लागतो?
सौर कृषी पंप दुरुस्तीसाठी 7 ते 15 दिवसांचा कालावधी लागतो. काही वेळा बिघाड गंभीर असेल किंवा बदलायचे पार्ट शिल्लक नसतील, तर वेळ थोडा अधिक लागू शकतो. पण लहान बिघाडासाठी 3 ते 4 दिवसांत Repair होण्याची शक्यता असते. अर्जाची स्थिती ऑनलाइन पोर्टलवर पाहता येते किंवा संबंधित ऑफिसमध्ये चौकशी करता येते.
काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात घ्या
पंप दुरुस्तीसाठी अर्ज करताना नेहमी बरोबर माहिती द्या. जर पंपाची माहिती चुकीची असेल, तर कामात अडथळा येतो. पंपाचा नंबर किंवा कोणती कंपनी होती हे आधीच तपासून ठेवावं. बिघाडाचे फोटो शक्य असल्यास आधीच काढून ठेवल्याने काम लवकर होते. काही वेळा पुरवठादार किंवा Service Agency ची जबाबदारी असते, त्यामुळे त्यांचा मोबाईल नंबर तुमच्याकडे ठेवा.
निष्कर्ष
सौर कृषी पंप वापरताना वेळोवेळी देखभाल आणि दुरुस्ती करणे आवश्यक आहे. जर सौर कृषी पंप बंद पडला असेल, आवाज करत असेल, किंवा पंप पाणी फेकत नसेल, तर दुरुस्ती करणे गरजेचे आहे. यासाठी तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता. अर्जानंतर पाहणी होते, आणि काही दिवसांतच दुरुस्ती केली जाते. त्यामुळे कोणतीही अडचण आल्यास त्वरित कारवाई करणे आणि योग्य पद्धतीने माहिती भरणे हे महत्त्वाचे आहे.