SBI पशुपालन कर्ज योजना – शेतकरी बांधव आणि पशुपालन करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. SBI म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया ने 2025 साठी एक नवीन योजना सुरू केली आहे. पशुपालन कर्ज योजना. या योजनेअंतर्गत तुम्ही गाय, म्हैस, शेळ्या, कोंबड्या, किंवा मत्स्यपालनासारखा व्यवसाय सुरू करण्यासाठी 1 लाख ते 10 लाखांपर्यंत कर्ज (लोन) मिळवू शकता.

ही योजना खास करून अशा शेतकऱ्यांसाठी आहे, जे शेतीसोबत दूध, अंडी, मटण किंवा मासे यासारखे अतिरिक्त उत्पन्न कमावू इच्छितात. कारण आजच्या काळात शेती वर संसार चालवणं कठीण झालंय. त्यामुळे पशुपालन हा एक उत्तम पर्याय आहे. SBI बँकेने शेतकऱ्यांना पाठबळ देण्यासाठी ही योजना सुरू केली आहे.
SBI पशुपालन कर्ज योजना – शेतकऱ्यांसाठी मोठी संधी
जर तुम्ही लहान शेतकरी असाल आणि 2 लाखांपर्यंतचं कर्ज पाहिजे असेल, तर कोणत्याही जामीनदाराची गरज नाही. म्हणजे जमिनीचे कागदपत्र, गहाण प्रक्रिया ही करण्याची गरज नाही. तुम्हाला थेट बँकेमार्फत कर्ज मिळू शकतं. शेतकऱ्यांसाठी ही खूप मोठी गोष्ट आहे, कारण शेतकऱ्यांना नेहमी कागदपत्रांची अडचण असते.
घेतलेल्या कर्जाची परतफेड करण्यासाठी SBI ने 10 वर्षांपर्यंतचा कालावधी दिला आहे. शिवाय सुरुवातीचे 1 ते 2 वर्ष माफ असतात. म्हणजे त्या काळात तुम्हाला हप्ते भरावे लागत नाहीत. तुम्ही चालू केलेल्या व्यवसायातून कमाई सुरू झाल्यावर हप्ते भरायला सुरुवात करू शकता.
या योजनेत व्याज दरही कमी आहे. साधारणपणे 7% दराने कर्ज दिलं जातं. पण जर तुम्ही वेळेवर हप्ते भरले, तर सरकारकडून 3% व्याज सबसिडी मिळते. म्हणजे तुम्हाला फक्त 4% दराने व्याज भरावं लागतं. हाच या योजनेचा सगळ्यात मोठा फायदा आहे.
हे हि वाचा –
जर तुम्हाला हे कर्ज घ्यायचं असेल, तर काही कागदपत्रं लागतात. जसं की आधार कार्ड, बँक पासबुक, तुमचं फोटो, रहिवासी दाखला, व्यवसायाची माहिती उदा. किती जनावरे घेणार, कुठे खरेदी करणार, त्यातून उत्पादन किती अपेक्षित आहे इत्यादी. हे सगळं व्यवस्थित असेल तर SBI मधून तुम्हाला कर्ज लगेच मिळू शकतं.
कर्ज घेण्यासाठी तुम्ही तुमच्या गावातील किंवा तालुक्यातील SBI शाखेत जाऊ शकता. काही शाखांमध्ये हे अर्ज ऑनलाइनही घेतले जातात. SBI पशुपालन साठी बँक कर्ज बँकेत गेल्यावर बँक तुम्हाला अर्ज देते, तो भरून घ्यावा. अधिकारी तुमचे सर्व कागदपत्रे तपासतात आणि मंजुरी मिळाल्यावर कर्ज थेट तुमच्या बँक खात्यात जमा करतात. एक आठवड्यात पैसे मिळतात.
ही योजना शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाची आहे. कारण फक्त शेतीवर अवलंबून राहिलं, तर दरवर्षी नफा होईलच असं नाही कधी कधी तोटा पण होतो. पण जर तुम्ही त्यासोबतच गाय, म्हैस, शेळी, कोंबडी पालन करायला सुरुवात केली, तर आर्थिक उत्पादन वाढते. हाच या योजनेचा उद्देश आहे. शेतकऱ्याच्या घरात सातत्याने पैसे येत राहतात.
पशुपालनाचा व्यवसाय करताना योग्य माहिती असणंही महत्त्वाचं आहे. त्यामुळे तुम्ही ग्रामसेवक, कृषी अधिकारी, बँक अधिकारी यांच्याकडून माहिती घ्यावी. जर तुम्हाला या व्यवसायाबद्दल काहीच माहिती नसेल तर जो कोणी अगोदर हा व्यवसाय करत आहे त्या माणसाचा ही सल्ला घ्यावा.
या योजनेमुळे आज अनेक शेतकऱ्यांनी स्वतःचं डेअरी, पोल्ट्री किंवा गोट फार्म सुरू केलेले आहेत. थोडं धाडस आणि मेहनत केली, तर तुम्हीही चांगलं यातून चांगलं उत्पादन घेऊन पैसे मिळवू शकता. ग्रामीण भागात अशा व्यवसायांना चांगली संधी असते. त्यामुळे बाजारपेठेची चिंता न करता, फक्त चांगले नियोजन करा आणि आपला नवीन व्यवसाय वाढवा.
तुमच्या उत्पन्नात वाढ करायची असेल, शेतीला जोड व्यवसाय सुरू करायचा असेल, आणि आर्थिक परिस्थिती चांगली नसेल. तर SBI पशुपालन कर्ज योजना तुमच्यासाठी उत्तम संधी आहे. त्यामुळे आजच तुमच्या जवळच्या SBI बँकेच्या शाखेत जाऊन माहिती घ्या.