Sukanya Samriddhi Yojana जर तुम्हाला मुलगी असेल व तिच्या पुढील शिक्षणासाठी किंवा उज्वल भविष्याच्या तयारीसाठी, तुम्हाला पैशाची बचत करायची असेल. तर सरकारने खूपच चांगली योजना आणलेली आहे. ती योजना म्हणजे सुकन्या समृद्धी योजना.

तुम्ही भरपूर ठिकाणी ऐकले असेल की, या योजनेतून तुम्हाला 3 लाख रुपये मिळतील, पण लक्षात ठेवा ही रक्कम तुमच्याच बचतीतून व्याजदरासह मिळणारी रक्कम असते. तुम्ही आज पैसे गुंतवले तरच पुढे जाऊन ती रक्कम खूप मोठी होते. हीच रक्कम तुम्हाला थेट योजनेच्या मार्फत मिळते. ही योजना एक सुरक्षित आणि फायदेशीर बचत योजनेसारखी योजना आहे.
Sukanya Samriddhi Yojana : मुलगी असेल तर मोफत मिळवा 3 लाख रुपये
Sukanya Samriddhi Yojana सरकारने मुलींसाठी सुरू केलेली योजना आहे. या योजनेमध्ये तुम्ही तुमच्या मुलीच्या नावाने बँकेत किंवा पोस्ट ऑफिस मध्ये खाते ओपन करू शकता. उघडलेले खाते मुलीच्या जन्म तारखेपासून 10 वर्षाच्या आत उघडावे लागते. प्रत्येक कुटुंबात दोन मुलींसाठी खाते उघडता येते.
या योजनेमध्ये तुम्ही वर्षाला कमीत कमी 250 रुपये आणि जास्तीत जास्त दीड लाख रुपये भरू शकता. या योजनेमध्ये 8.2% व्याजदर मिळतो. हा व्याजदर इतर दुसऱ्या योजनेच्या तुलनेने खूपच जास्त आहे. सर्वात चांगली गोष्ट म्हणजे, या योजनेवर मिळणार व्याज आणि सर्वात शेवटी मिळणारी रक्कम, ही पूर्णपणे टॅक्स फ्री असते. म्हणजे तुम्ही जेवढा पैसा यात गुंतवाल त्यावर सरकारमार्फत कसलाही कर लागणार नाही.
बँकेत खाते उघडल्यानंतर मुलीच्या पालकांना पंधरा वर्षापर्यंतच पैसे भरावे लागतात. आणि त्यानंतर ते खाते मुलीच्या 15 ते 21 वय होईपर्यंत बंद ठेवले जाते. मुलगी 18 वर्षाची झाल्यावर तिच्या शिक्षणासाठी काही पैसे तुम्हाला काढता येतात. आणि जर तिचं लग्न 18 वर्षानंतर लगेच करायचे असेल, तर तुम्हाला तिच्या नावाने संपूर्ण रक्कम काढता येते. त्यामुळे ही योजना फक्त पैशाची बचत करण्यासाठी नाही, तर मुलीच्या शिक्षण, लग्न आणि इतर कामासाठी वापरण्यासाठी उपयुक्त आहे.
तुम्हाला मी एक उदाहरण देतो. जर तुम्ही दरवर्षी कमीत कमी 50 हजार रुपये या योजनेत भरले तर मुलगी 21 वर्षांची झाल्यावर तुमच्या मुलीच्या खात्यात 15 लाखांपर्यंत रक्कम जमा होऊ शकते.
हे ही वाचा – अल्पभूधारक शेतकरी प्रमाणपत्र ऑनलाईन अर्ज प्रक्रिया आणि योजनांचा संपूर्ण लाभ
जर तुम्ही हीच रक्कम थोडी थोडी करून भरली उदाहरणार्थ, दर महिन्याला 1000 हजार रुपये भरत असाल. तर तुमच्याकडे मुलीच्या 21 वर्षानंतर 3 ते 5 लाख रुपये सहज होऊ शकतात. म्हणूनच सोशल मीडियावर अनेक ठिकाणी तीन लाख रुपये मिळतील, अशी माहिती सांगितली जाते. परंतु ती रक्कम सरकार मार्फत न मिळता तुमच्याच गुंतवणुकीची रक्कम असते.
सुकन्या समृद्धी योजने साठी अर्ज कसा करावा
तुम्हाला जर या योजनेसाठी अर्ज करायचा असेल, तर तुम्ही तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिस किंवा स्थानिक बँकेत जाऊन फॉर्म भरू शकता. अर्ज करण्यासाठी तुम्हाला मुलीचा जन्म दाखला, मुलीच्या पालकाचे आधार कार्ड आणि एक फोटो लागतो. आता काही बँका सुद्धा ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरून घेतात. (Sukanya Samriddhi Yojana Official website) त्यामुळे तुम्हाला घरबसल्या देखील अर्जाची प्रक्रिया पूर्ण करता येऊ शकते.
ही योजना मध्यमवर्गीय किंवा ग्रामीण भागातील लोकांसाठी खूपच महत्त्वाची आहे. कारण कमी पैशापासून तुम्हाला सुरुवात करून. मोठी रक्कम सहज साठवता येते. सांगायचं झालं तर ही योजना सरकारकडून असल्याने, या योजनेत सुरक्षाची कसलीही कमी केली जात नाही. शंभर टक्के सुरक्षित योजना आहे.
सुकन्या समृद्धी योजना म्हणजे, आपल्या मुलीच्या भविष्या ची आत्ताच आर्थिक तयारी करून ठेवणे. या योजनेमध्ये दरवर्षी थोडी थोडी रक्कम आपल्याला भरायची आहे. आणि मुलगी 18 वर्षाची झाल्यानंतर ती रक्कम मोठी होते. तुम्ही हीच रक्कम तुमच्या मुलीच्या कोणत्याही कामासाठी वापरू शकता. मुलीचे शिक्षण असो, लग्न असो किंवा आर्थिक कोणतीही अडचण असो, त्यासाठी तुम्हाला ही रक्कम वापरात आणता येते.
मित्रांनो, तुम्हीही अजून सुकन्या समृद्धी योजनेचा लाभ घेतला नसेल, तर आपल्या जवळील पोस्ट ऑफिस किंवा बँकेत जाऊन या योजनेविषयी अधिक माहिती घ्या. आणि आजच अर्ज करा, कारण ही योजना म्हणजे तुमच्या चिमुकलीच्या उज्वल भविष्याची तयारी ठरू शकते.