तुकडे बंदी कायदा शिथील शासन निर्णय 2025 – आता जमीन घेणं झालं सोपं

राज्य सरकारने छोट्या जमीन धारकांसाठी एक मोठा निर्णय घेतला आहे. म्हणजेच तुकडे बंदी कायदा शिथील केला असून, यानुसार आता लहान तुकड्यातील जमिनी प्रत्येक शेतकऱ्याला खरेदी विक्री करता येणार आहे. पूर्वी जमिनीचे छोटे तुकडे म्हणजे एक गुंठा किंवा त्याहून कमी क्षेत्रफळ असलेली जमीन, खरेदी विक्री करता येत नव्हती. पण आता ही तुकडे बंदी स्थगित करण्यात आलेले आहेत.

तुकडे बंदी कायदा शिथील

या निर्णयामुळे हजारो शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे. कारण अनेक ठिकाणी अशा लहान जमिनी अडकून पडलेल्या आहेत. त्याची खरेदी विक्री होत नव्हती. खरेदी विक्री ऑफिसमध्ये नोंद होत नसल्यामुळे, त्या न विकता तशाच पडून होत्या ना शेतकऱ्यांना वापरता येत होत्या. पण आता त्या जमिनी तुम्ही अधिकृतपणे नोंदणी करून खरेदी आणि विक्री करू शकतात.

तुकडे बंदी कायदा शिथील आता जमीन घेणं झालं सोपं

सरकारचे म्हणणे असे आहे की, 1 जानेवारी 2025 पर्यंतच्या ज्या जमिनी तुकड्यांमध्ये विभागल्या आहेत. त्या सर्व जमिनी खरेदी विक्रीसाठी वैध मानल्या जातील. म्हणजेच जुन्या जमिनींच्या तुकड्यांना कायदेशीर मान्यता मिळालेली आहे. आणि जे लोक नवीन तुकडे करत असतील, त्यांना पुढील तीन महिन्याच्या आत परवानगी घ्यावी लागेल. तुकडे बंदी शासन निर्णय इथे पाहा.

हा कायदा महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायत आणि गावठाण सीमांच्या आजूबाजूच्या भागांमध्ये लागू होईल. या कायद्यामुळे शहर आणि गावाच्या लगतच्या भागांमध्येही आता लहान तुकड्यांचे व्यवहार करणे शक्य होणार आहे.

सरकारच्या या नवीन नियमामुळे लोकांना लहान जागेवर घर बांधता येईल. शेतामध्ये गार्डन, फार्म हाऊस, छोटे उद्योग सुरू करता येतील. तसेच बँकेतून कर्ज काढता ना ही तुम्हाला अडचण येणार नाही. जमीन मालकाचे कागदपत्रे तयार होतील व ती तुम्ही कायदेशीरपणे वापरू शकता.

या निर्णयानंतर सरकार एक SOP म्हणजे मार्गदर्शक नियमावली तयार करणार आहे. जी पुढील येणाऱ्या पंधरा दिवसात तयार होईल. त्यामध्ये सांगितलं जाईल की, कोणती कागदपत्रे लागतील, किती क्षेत्राचा व्यवहार करता येईल व त्याचे काय नियम असतील, याची सर्व माहिती त्या नियमावली मध्ये दिली जाईल.

शेतकऱ्यांसाठी ही खूपच मोठी संधी आहे. कारण आता तुम्ही तुमच्या लहान जागेचाही व्यवहार करून, खरेदी विक्री करू शकता व त्या जागेची नोंद ही करू शकता.

हे ही वाचा – MahaDBT ठिबक सिंचन, पाईपलाइन अनुदान योजना – मोबाईलवरून अर्ज कसा करावा

यापूर्वी अशा लहान जमिनी विकत घेतल्यावर त्या घेणाऱ्या व्यक्तीचा हक्क नसायचा. पण आता त्या जमिनीची नोंद करून बँकेकडून कर्जही घेऊ शकता. यामुळे प्रत्येकासाठी जमिनीचा व्यवहार करणे सोपे झाले आहे. आणि त्यात आर्थिक पारदर्शकता ही आलेली आहे.

तुकडे बंदी कायदा शिथील केल्यामुळे लहान जागेवर मालकी घेणे, त्यावर घर बांधणे किंवा व्यवसाय सुरू करणे अधिक सोपे आणि कायदेशीर झाले आहे. आता आवश्यकता आहे ती योग्य माहिती घेण्याची व आलेल्या संधीचा लाभ घेण्याची.

Kishor Gaikwad-Patil


नमस्कार! मी किशोर गायकवाड-पाटील.
गेल्या 6 वर्षांपासून ब्लॉगिंग करत आहे. 2019 पासून मी सरकारी योजना या विषयावर ब्लॉग लिहायला सुरुवात केली, आणि आजपर्यंत अनेक लोकांपर्यंत योजनांची योग्य माहिती पोहोचवली आहे.
लोकांना योजना समजावून सांगणं, अर्ज कसा करायचा ते सांगणं, आणि योग्य माहिती देणं हे माझं मुख्य काम आहे.
आमचं एकच ध्येय आहे – सर्वसामान्य माणसाला कोणती योजना आहे, तिचा फायदा कसा घ्यायचा, आणि अर्ज कसा करायचा हे नीट समजलं पाहिजे.

Leave a Comment