नमस्कार मित्रांनो, एकदा देवी लक्ष्मी भगवान विष्णु ला भेटायला जाते आणि म्हणते, प्रभू मी तुला भेटायला येत होते, तेव्हा माझी नजर मृत्यूच्या जगावर पडली. ( पौराणिक कथा ) तिथे मी पाहिले की, परस्पर मैत्रिणी असलेल्या तीन स्त्रियांपैकी दोन स्त्रिया विधवा होत्या आणि दुःखी जीवन जगत होत्या, तर एक स्त्री विवाहित होती आणि तिच्या पतीसोबत आनंदी जीवन जगत होती. परमेश्वरा मला हे समजले नाही. म्हणून माझ्या मनत प्रश्न निर्माण होऊ लागले. आता तुम्ही कृपया माझ्या तिन्ही प्रश्नांची उत्तरे देऊन, माझे समाधान करावे. अशी माझी इच्छा आहे. मित्रांनो देवी लक्ष्मी चे ऐकून भगवान विष्णू सांगतात.

हे लक्ष्मी मला तुझे तीन कष्ट सांग, मी तुमच्या प्रश्नांची उत्तरे देऊन तुमचे पूर्ण समाधान करण्याचा प्रयत्न करेन. आता देवी लक्ष्मी म्हणते प्रभू माझा पहिला प्रश्न आहे की, कोणतीही स्त्री अकाली विधवा होते, माझा दुसरा प्रश्न आहे कोणत्या स्त्रीला आयुष्यात कधीच आनंद मिळत नाही. आणि माझा तिसरा प्रश्न असा आहे की, अशी कोणती गोष्ट आहे, जी नवऱ्याने मागूनही बायको देत नाही. मित्रांनो देवी लक्ष्मी चे प्रश्न ऐकून, भगवान विष्णू म्हणू लागले, तुम्ही ज्या महिलांबद्दल बोलत आहात त्यापैकी दोन महिला विधवा म्हणून दुःखी ची जगत आहेत. आणि एक स्त्री विवाहित आहे.
पौराणिक कथा
आणि तिच्या पतीसोबत आनंदी जीवन जगता आहे. हे असे का आहे हे तुम्हाला जाणून घ्यायचे आहे तर मी तुम्हाला एक छोटीशी पौराणिक कथा सांगतो. ही कथा फार लक्षपूर्वक ऐकावी, जे अर्धवट कथा ऐकतात त्यांना अर्धवट ज्ञान मिळते. जे आयुष्यात कधीही उपयोगी नसते. कारण तुमच्या तीन प्रश्नांची उत्तरे एका छोट्या कथेत आहेत. जर तुम्ही ही कथा लक्षपूर्वक ऐकाल, तर तुम्हाला तुमच्या तीनही प्रश्नांची उत्तरे नक्कीच मिळतील. आणि तुम्हाला समाधान ही मिळेल. मित्रांनो माता लक्ष्मी म्हणते, प्रभू मी तुझ्याशी सहमत आहे.
तुम्ही कथा सुरु करा, मी मनापासून कथा ऐकेन आणि तुम्ही कथा सांगेपर्यंत माझे मन कुठेही जाणार नाही. तर मित्रांनो कथा सुरू करण्यापूर्वी मी तुम्हा सर्वांना विनंती करतो की, तुम्हीं आमच्या स्वामींचे बोल, या यूट्यूब चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा. आणि कथा संपेपर्यंत सोबत राहा, कारण आजची गोष्ट तुमच्यासाठी खूप महत्त्वाची असणार आहे. भगवान विष्णु म्हणतात हे लक्ष्मी, सर्वप्रथम मी तुम्हाला एका महिलेची गोष्ट सांगतो, जी एक विवाहित स्त्री म्हणून आनंदी जीवन जगत आहे.
तुम्ही ज्या विवाहित स्त्री बद्दल बोलत आहात, ती एका राजाच्या नोकराची पत्नी आहे. आणि ज्या नोकराची ती पत्नी आहे, त्याला आपल्या पत्नी वर पूर्ण विश्वास आहे की, ती त्याच्याशी विश्वासू आहे. ज्याची तो त्याच्या सहकार्यांमध्ये पुन्हा पुन्हा प्रशंसा करत असतो. आता बघा, एके दिवशी राजाच्या सेवकाने आपल्या पत्नीची इतकी स्तुती केली की, ही बातमी हळूहळू राजाच्या दरबारात पसरली. तेव्हा राजाने आपल्या सेवकाला बोलावून त्या नोकराला सांगितले की, तुझी पत्नी तुझ्याशी खूप प्रामाणिक आहे हे सर्वांना सांगत आहेस.
तुझी पत्नी खरोखरच एकनिष्ठ आहे का? तुला पूर्ण आत्मविश्वास आहे का?. अशाप्रकारे राजाचे म्हणणे ऐकून तो सेवक म्हणाला, महाराज माझी पत्नी पूर्णपणे एकनिष्ठ आहे, यावर माझा पूर्ण विश्वास आहे. आता त्याच वेळी राजाचा एक मंत्री म्हणू लागतो, जर मि तुझ्या बायकोचे पावित्र्य भंग केले तर तुला काय शिक्षा द्यावी. तेव्हा सेवक म्हणाला, महाराज जर तुम्ही माझ्या पत्नीच्या पावित्र्याचा भंग केला, तर मला फाशी द्या.
आता राजाचा सेवक मंत्र्याला विचारतो, माझ्या बायकोचे पावित्र्य तुम्ही मोडू शकला नाही, तर तुम्हाला काय शिक्षा द्यावी. तर राजा म्हणाला की, मंत्र्याला ही फाशीची शिक्षा दिली जाईल. तेव्हा भगवान विष्णू म्हणतात, लक्ष्मी मंत्र्याने ते स्वीकारले आणि सेवकाला विचारले की, मी कोणती वस्तू आणावी, ज्याने मी तुझ्या पत्नीचा पतिव्रता धर्म मोडण्यात यशस्वी झालो आहे. असे तू मानसील. तर नोकर म्हणाला, मंत्री महोदय. तुम्ही माझ्या घरी गेला तर माझ्या लग्नाच्या वेळी मला एक रुमाल आणि कटार मिळाली होती. माझ्या बायकोने ती खूप जपून ठेवली आहे.
जर तुम्ही रुमाल आणि कटार आणून मला दाखवले, तर मी मान्य करीन की तू माझ्या पत्नीचा पतिव्रता धर्म पूर्णपणे नष्ट केला आहेस. आता अट मान्य झाल्यानंतर मंत्री शहरात जाऊन एका दासीला भेटतात. मग मंत्री स्वतःच्या स्वार्थासाठी त्या दासीला म्हणतात की, हे बघ या नावाची एक व्यक्ती आहे. त्याच्याशी माझी पैज आहे आणि मग त्या मंत्र्याने तिला त्या पैजेच्या बद्दल सर्व काही सांगितले. मग त्याने त्या दासीला विचारले की, तुम्ही मला त्या बाईच्या संपर्कात कसे आणू शकता. तुला पाहिजे तेवढे पैसे मी देईल.
मंत्र्यांचे म्हणणे ऐकून ती दासी म्हणू लागली, मंत्रीजी त्या स्त्री बद्दल बोलू नका. ती स्त्री आपल्या पतीशी पूर्णपणे एक निष्ठा आहे. ती दुसऱ्या पुरुषावर थुंकत ही नाही. ती तुमच्या चेहऱ्याकडे ही पाहणार नाही. आणि तिचे कुटुंबीय खूप भयंकर आहेत. तेव्हा मंत्री म्हणाले ठीक आहे, जर तुम्ही माझा तिच्याशी संपर्क साधू शकत नसाल तर एक काम करा, तिच्या घरी जाऊन रुमाल आणि कटार चोरून आना, त्या स्त्रीच्या गुप्तांगावर काही चिन्ह असेल तर ते मला सांगा. मग तू मागितलेले बक्षीस मी तुला देईन. दासीला हे समजले आणि म्हणाली ठिक आहे, मी तुमचे हे काम नक्की करेल. नोकर शहरात राहत होता, दासी नोकराच्या घरी जाऊन त्याच्या बायकोला म्हणते. मुली मी तुझ्या नवऱ्याची ची मावशी आहे.
बोधकथा
खूप वर्षांनी आली आहे, तेव्हा ती म्हणाली मावशी मी तुला पूर्वी कधी पाहिले नव्हते, म्हणून मी तुला ओळखू शकले नाही. आणि अशाप्रकारे त्या सेवकाच्या त्या पतिव्रता पत्नीने त्या दाशिला खूप आदर दिला. पण ती तिला फसवायला आली होती, हे त्या पतिव्रता स्त्री ला माहीत नव्हते. आता भगवान विष्णू म्हणतात लक्ष्मी अशा प्रकारे दासी त्या स्त्रीकडे दोन दिवस राहिली. ती पतिव्रता आंघोळ करू लागल्यावर दासी उठली आणि त्या स्त्रीची कंबर चोळू लागली.
त्या स्त्रीने खूप नकार दिला तरीही मान्य झाली नाही. आणि म्हणाली मी तुझ्यावर माझ्या मुली पेक्षा जास्त प्रेम करते म्हणून मला नकार देऊ नकोस. खूप दिवसांनी मी तुला पहिल्यांदा भेटले आता. असे म्हणत ती तिच्या चेहऱ्यावर हात फिरवू लागली. त्यानंतर डोळे धुण्याच्या बहाण्याने या दासीने त्या स्त्री च्या डोळ्यात पाणी टाकले आणि तिचे डोळे मिटले.
अशाप्रकारे त्या स्त्रीच्या गुप्तांगा जवळ मांडीवर एक तीळ होता. जो दासीने पाहिला आणि आता तिचे काम झाले होते. आंघोळ करून ती महिला स्वयंपाकासाठी स्वयंपाक घरात गेली असता, संधी साधून दासीने नोकराच्या घरातील रुमाल आणि कटार चोरून तेथून पळ काढला व रुमाल आणि कटार मंत्र्याला दिले. आणि त्या पतिव्रता स्त्री च्या मांडीवर असलेल्या तिच्या खुनाबद्दल ही सांगितले. मग मंत्री रुमाल आणि कटार घेऊन थेट राजाच्या दरबारात गेला. तो राजाकडे गेला आणि म्हणाला, महाराज मी सेवकाच्या पत्नीसोबत दोन दिवस घालवले आणि तिच्या घरातून हा रुमाल आणि कटार घेऊन आलो आहे.
हे हि वाचा… मागेल त्याला विहीर योजना
मग राजाने दरबार आयोजित करून सेवकाला बोलावून घेतले आणि मंत्र्याला सभेत सेवकाला रुमाल आणि कटार दाखवण्यास सांगितले. मग राजाची परवानगी मिळाल्यावर मंत्र्याने नोकराला रुमाल आणि कटार दाखवली आणि पत्नीच्या मांडीवर तीळ असल्याचे सांगितले. त्यामुळे सेवकाने मान्य केले की आज माझ्या पत्नीने तिच्या पती प्रति असलेले कर्तव्य पूर्णपणे मोडले आहे. भगवान विष्णू म्हणतात, लक्ष्मी मग राजाने फाशीचा दिवस पंधरा दिवसांनी पुढे ठरवलाआणि सांगितले की, सेवकाला पंधरा दिवसांनी फाशी दिली जाईल.
आणि अशा रीतीने नोकराला त्याची शेवटची इच्छा विचारली तेव्हा नोकर म्हणाला, मला माझ्या पत्नीला शेवटचे भेटायचे आहे. अशाप्रकारे राजाने नोकराला सांगितले की ठीक आहे, तू तुझ्या पत्नीला भेटू शकतोस. मग तो नोकर आपल्या घरी गेला आणि पत्नीला म्हणाला, तू माझा खूप मोठा विश्वासघात केला आहे. तुझ्या भरोशावर मी मंत्र्याला राजाच्या दरबारात राजासमोर म्हटले होते की, जर कोणी माझ्या पत्नीचा पवित्र धर्म नष्ट करेल तर मला फाशी द्या. आता मला पंधरा दिवसांनी फाशी देण्यात येईल.
माझा विश्वास घात करून तु ठीक केले नाहीस. त्या पतिव्रता स्त्रीने सर्व हकीकत आपल्या पतीला सांगितली, पण त्याचा विश्वास बसला नाही आणि तो राजाच्या दरबारात पोहोचला. तो नोकर राजाच्या दरबारात पोहोचला तेव्हा त्याला कैद करण्यात आले. आता दुसरीकडे नोकराच्या पतिव्रता पत्नीने आपला वेश बदलला आणि राजाच्या दरबारात जाऊन तिचे नृत्य दाखवण्यासाठी राजाची परवानगी मागू लागली.
धार्मिक कथा
कारण ती स्त्री खूप सुंदर होती, म्हणून राजाने आदेश दिला की, सर्व मंत्री वगैरे यांनी हजर राहून या सुंदर स्त्रीच्या नृत्याची पूर्ण व्यवस्था करावी. भगवान विष्णू म्हणतात, लक्ष्मी तेव्हा सर्व मंत्री राजा वगैरे दरबारात उपस्थित होतात, आणि मग जेव्हा त्या सेवकांची पत्नी नाचू लागली. तेव्हा राजाला त्या स्त्रीचे नृत्य खूप सुंदर वाटले, आणि राजा म्हणाला, तुला काय हव आहे तू जे मागशील ते मी तुला देईन. तेव्हा त्या सेवकाची पत्नी म्हणाली, महाराज तुमच्या दरबारात एक चोर आहे. ज्याने माझे पैसे घेतले होते, पण ते आजपर्यंत परत केले नाही.
त्याला फाशीची शिक्षा द्या. आता राजा म्हणाला ठीक आहे. मला सांग माझ्या दरबारात तुझा चोर कोण आहे. त्याचे नाव काय आहे मी त्याला नक्कीच फाशीची शिक्षा देईन. भगवान विष्णू म्हणतात, तेव्हा त्या सेवकाची पत्नी म्हणाली, महाराज तुमचा मंत्री माझा चोर आहे. तुम्ही त्यांना फाशीची शिक्षा द्यावी. आताही सुंदर स्त्री मला चोर म्हणत आहे, हे मंत्र्याच्या कानावर येताच, तो म्हणू लागला महाराज मी शपथ घेतो की, मी ह्या स्त्रीची काही ही चोरी केली नाही. मी हिला आज पर्यंत कधी पाहिलेही नाही.
पौराणिक कथा पाहण्यासाठी विडिओ पहा
तिचा चेहरा मी आज पर्यंत पहिला नाही, मग मी चोरी कशी करू शकतो. आता भगवान विष्णु म्हणतात, लक्ष्मी मंत्र्याने सांगितले की, मी आजपर्यंत या सुंदर स्त्रीला कधी पाहिले नाही. तेव्हा ती स्त्री म्हणू लागली, महाराज हा मंत्री मला ओळखत नाही, मग तुम्ही त्याला विचारा की, त्याने हा रुमाल आणि कटार कुठून आणली आहे. मी तुमच्या इथे काम करणाऱ्या नोकरा ची पत्नी आहे, आणि तुम्ही माझ्या निर्दोष नवऱ्याला फाशी देणार आहात.
आता मी तुम्हाला संपूर्ण गोष्ट सांगते. तुमच्या या मंत्र्याने त्यांच्याच एका दासीला माझ्याकडे पाठवले, आणि हा रुमाल आणि कटार चोरून ह्या मंत्र्याला दिली. आणि माझ्या मांडीवर असलेला तीळ मंत्र्याला सांगितला. दासी माझ्या घरी आली तेव्हा तिने, मला सांगितले कि, ती माझ्या नवऱ्याची मावशी आहे आणि ती पहिल्यांदाच घरी आली, म्हणूनच मी तिला ओळखू शकले नाही. मी तिला खूप आदर दिला आणि माझ्या घरी तिची राहण्याची व्यवस्था केली.
अशाप्रकारे त्या सेवकाच्या पत्नीचे म्हणणे ऐकून राजाने दासीला बोलावले. तेव्हा दासीने राजाला संपूर्ण हकीकत सांगितली. त्यामुळे राजाने सेवकाला सोडले आणि मंत्र्याला फाशी दिली. भगवान विष्णू म्हणतात हे लक्ष्मी अशाप्रकारे त्या सेवकाची पतिव्रता पत्नी शेवटी राजाला म्हणाली, महाराज माझे माझ्या पतीवर खूप प्रेम आहे. मी चारित्र्यवान स्त्रि आहे, मी माझ्या पतीचे नाव ही कधीही उच्चारत नाही. आता भगवान विष्णू लक्ष्मीला म्हणतात, माझी कथा पूर्ण झाली. आता तुम्ही तुमच्या तीन प्रश्नांची उत्तरे ऐका, तुमचा पहिला प्रश्न होता कोणती स्त्री अकाली विधवा होते.
तर पतीचे नाव घेणाऱ्या महिला अकाली विधवा होता, कारण पतीचे नाव घेतल्याने पतीचे आयुर्मान कमी होते. आणि पती वेळेपूर्वीच मरण पावतो. ज्या स्त्रिया आपल्या पतीचे नाव घेतात त्या अकाली विधवा होतात. आणि दुःखी जीवन जगतात. तुम्ही ज्या तीन मैत्रिणी बद्दल बोलत होता त्यापैकी दोन विधवा होत्या आणि एक सेवकाची पत्नी होती, जी एकनिष्ठ स्त्री होती. ही स्त्री कधीच आपल्या पतीचे नाव तोंडाने घेत नसेल आणि दुसरीकडे ज्या दोन स्त्रिया विधवा म्हणून दुःखी जीवन जगत होत्या त्या नेहमी आपल्या पतीचे नाव घेत होत्या त्यामुळे त्यांच्या पतीचे आयुर्मान कमी झाले.
आणि म्हणून त्या दोन्ही स्त्रिया काळापूर्वी विधवा झाल्या आणि आज त्या दुःखी जीवन जगत आहेत. म्हणूनच महिलांनी कधीही पतीचे नाव उच्चारू नये. आता तुमचा दुसरा प्रश्न होता कोणत्या स्त्रीला आयुष्यात कधीही सुख मिळत नाही. ज्या महिला पतीच्या परवानगी शिवाय कोणत्याही तीर्थस्थळी किंवा उत्सवाला जातात त्यांनी समजून घ्या त्यांच्या आयुष्यात कधीच आनंद येत नाही. अशा महिला आयुष्यभर दुःखी राहतात, आणि त्यांना पतीचे प्रेम कधीच मिळत नाही.
भगवान विष्णू म्हणतात लक्ष्मी तुझा तिसरा प्रश्न होता, अशी कोणती वस्तू आहे जी पत्नी पतीला मागून ही देत नाही, ती गोष्ट शिवी आहे, चारित्र्यवान स्त्री कधीही आपल्या पतीला शिवीगाळ करत नाही. आणि जी स्त्री असे काही करते ती कधीही चारित्र्यवान स्त्री नसते, आणि अशी स्त्री आयुष्यभर रडते तिच्या आयुष्यात कधीही सुख येत नाही.
आणि अशी स्त्री वेळेपूर्वी विधवा होते. मित्रांनो ही कथा ऐकल्यानंतर देवी लक्ष्मी तिच्या तीन प्रश्नांवर पूर्णपणे संतुष्ट झाली. आणि म्हणते, प्रभू खरेतर चारित्र्यवान असलेली स्त्री कधीही दुःखी जीवन जगत नाही, कारण अशा घरांमध्ये देवी लक्ष्मीचा वास नेहमीच असतो आणि ते घर नेहमी धनधान्याने भरलेले असते. अशा स्त्रिया नेहमी आपले घर स्वर्गात बदलतात.
तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर, कृपया आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक करा. आणि मित्रांनो कमेंटमध्ये भक्तीने लिहा. जय श्रीराम, श्री स्वामी समर्थ, जय श्री हनुमान. देवांचे देव हर हर महादेव तुमच्यावर सदैव आशीर्वादाचा वर्षाव करोत. प्रिय मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. जय श्रीराम.