सावत्र आई आणि मुलाची मराठी कथा – मराठी स्टोरी | मराठी बोधकथा 

नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, आजच्या पोस्ट मध्ये, मी तुम्हाला एक मराठी कथा सांगणार आहे. मी संदीप, मी माझ्या आई वडिलांचा एकुलता एक मुलगा. माझ्या जन्मानंतर माझी आई काहीच वर्षे माझ्यासोबत राहिली होती. माझ्या आई वडिलांचे अरेंज मॅरेज झाले होते. माझ्या आईने बाबांसोबत खूप बिकट दिवस काढले होते. त्यांच्या लग्नाच्या तीन चार वर्षांनंतर त्यांची परिस्थिती सुधारली होती.

मराठी कथा

माझी आई मला सांगायची की, मी तिला तिच्या लग्नाच्या पाच सहा वर्षानंतर झालोय. माझ्या आईच्या लग्नाला सहा वर्ष झाली होती. पण आईला काही मुल होत नव्हते. एक दिवस बाबा माझ्या आईला काहीही न सांगताच, तिच्यासमोरच एका २२ वर्षाच्या मुलीसोबत लग्न करून घरी आले. त्यांनी जेव्हा दुसरे लग्न केले. तेव्हा आईला मी झालो नव्हतो. पणं झाले असे की, त्याच्या दुसर्या लग्नानंतरच १५ दिवसांनी आईला मी राहिलो.

सावत्र आई आणि मुलाची मराठी कथा

माझी आई त्या दुसर्या बाई सोबत अगदी बहिणी सारखीच वागायची. तीचे नाव सीमा होते. आई म्हणायची की, त्या दुसर्या बाईने आईच्या गरोदरपणात खूप काळजी घेतली होती. माझा जन्म झाला. सर्व छान चालल होते. मला जेव्हा पासून समजायला लागले. तेव्हा पासून मी त्या दुसर्या बाईला म्हणजे, त्या सीमाला अजिबात आई म्हणायचो नाही. मला तर ती अजिबात आवडायची नाही. कारण ती सारखी माझ्या बाबांच्या मागे पुढे असायची.

आणि मला वाटायचे माझे बाबा माझ्या आईपेक्षा त्या बाईसोबत जास्त असायचे. ती सतत बाबासोबत बाहेर फिरत असायची. आणि माझी बिचारी आई घरात सर्व आवरत असायची. माझी आई मला म्हणायची की, तू तिलाही आई बोल. तीही तुझी आईच आहे. आईने मला खूप आग्रह केला. माझ्या आईच्या हट्टामुळे मी तिलाही आई बोलू लागलो. तसे ती मला जीव तर लावायची. माझे लाड ही ती पुरवायची.

सीमा आईला ही दोन मुले झाली. एक मुलगा आणि एक मुलगी. पण ती तिच्या मुलामध्ये व माझ्यामध्ये काही भेदभाव करत नव्हती. काही वर्षांनी माझी आई खूप आजारी पडली. बाबांनी तिला हॉस्पिटलमध्ये नेले. तिचा सर्व खर्च ही केला, पण मला दिसत होते की, बाबाचे आई प्रती प्रेम कमी झाले होते. त्या आजार पणामुळे काही दिवसातच माझी आई मरण पावली. आईला जाऊन काहीच दिवस झाले होते. मी नेहमी माझ्या आईच्या आठवणीत रडत असायचो. सीमा, आई व बाबा कुठे ना कुठे बाहेर फिरायला जायचे. मला तर वाटायचे की, यांना कसा फरक पडला नाहीये.

माझ्या आईच्या जाण्याने. असेच दिवस निघून गेले. आता मी २३ वर्षाचा झालो होतो. आणि माझी दुसरी बहिण १८ वर्षाची झाली होती. भाऊ १६ वर्षाचा. आमचे तिघांचे छान जमायचे. सीमा आई तर अजून पण छान दिसायची. मी कधी कधी तिच्यासमोरच तिचे कौतुक करायचो. एक दिवस मी मार्केट मध्ये गेलो होतो. तिथून घरी येत असताना मला माझ्या वडिलांचा मित्र भेटला. त्याची आणि बाबाची काही कारणास्तव मैत्री तुटली होती.

त्यांनी माझी विचारपूस केली की, कसा आहेस म्हणून. तेव्हा ते म्हणाले की, तुझ्या आईच्या जाण्याची बातमी मला समजली होती. पण तुझ्या वडीलांमुळे मी येऊ शकलो नाही. तुझी जी दुसरी आई आहे तीच व तुझ्या बाबाच अफेअर होत. तुझ्या आईशी लग्न झालेले असतानाही, तुझ्या बाबांनी बाहेर त्या मुली सोबत नातर ठेवले होते. मी त्याला त्याच्या बाहेरच्या नात्याबद्दल बोललो होतो. त्याच मुलीमुळे आमची लहानपणीची मैत्री तुटली. ती बाई अजिबात चांगली नाहीये.

ती दाखवायला काही वेगळ दाखवते. आणि तिचा खरा चेहरा काही वेगळाच आहे. जसे की, खायचे दात वेगळे आणि दाखवायचे वेगळे, तश्यातली ती आहे. मला तर वाटते तुझ्या आईलाही तिनेच काहीतरी केले असावे, म्हणून तुझी आई येवढ्या लवकर वारली. त्या काकाच बोलण ऐकून तर मला धक्काच बसला होता. माझ्या आईला वाटल होत की, तिला मुल होत नाही, म्हणून बाबांनी दुसरे लग्न केले असावे. माझ्या भोळ्या भाबड्या आईचा त्या दोघांनीही खूप फायदा उचलला होता.

त्या विचारातच मी घरी आलो. मला तर त्या बाई सोबत बोलायची इच्छाही होत नव्हती. त्या दिवशी मी तिच्या हातचे जेवण ही केले नव्हते. आज पर्यंत मी सीमा आईच्या वागण्यावर लक्ष दिले नव्हते. पण आता मला दिसत होते की, ती माझ्यासोबत थोडी वेगळीच वागते ते. आता माझे शिक्षण पूर्ण झाले होते, मला आजुन एक कोर्स करायचा होता. माझे सर्व मित्रही यासाठी बाहेरगावी जाणार होते. पण त्या कोर्ससाठी ५ लाख रुपये लागणार होते.

तसे आमच्याकडे पैश्याची कमी नव्हती. मला माहित होते की, माझे बाबा मला नाही बोलणार नाही म्हणून. त्या दिवशी मी बाबांना सांगितल की, मला एक कोर्स करायचा आहे. त्यासाठी मला ५ लाख रुपये लागणार आहेत. तेव्हा बाबा मला हो म्हणाले. त्यावेळी तिथे सीमा आई ही होती. पण तीही काही बोलली नाही. दुसर्या दिवशी बाबा मला म्हणाले की, मी तुला येवढे पैसे देऊ शकत नाही. आता तू समजदार झाला आहेस.

आणखी धार्मिक कथा, मराठी गोष्टी वाचा

कुठे तरी जॉब बघ, आणि तुला काय करायचे ते तू तुझ्या पैश्यामधून कर. बाबांचे बोलने ऐकून तर मला कळत नव्हते की, बाबा असे अचानक का बोलताय ते. कारण काल तर बाबांनी मला होकार दिला होता, मग आज अचानक असे काय झाले की, ते नाही बोलतायत. आज तर सीमा आईचा चेहरा चांगला हसरा दिसत होता. नक्कीच तिनेच बाबांना भडकवल असेल. बाबा मला असे बोलून त्यांच्या रूममध्ये निघून गेले.

थोड्या वेळाने मी बाबासोबत बोलायला म्हणून त्यांच्या रूम मध्ये जात होतो. मी त्याच्या रूम बाहेर आलो तेव्हा, मला त्याच्या रूममधून सीमा आईचा बोलण्याचा आवाज आला. ती बाबांना बोलत होती की, तुम्ही बरोबरच केले. आता त्यालाही त्याचे कमवायला शिकले पाहिजे. त्याच्या आईमुळे ही तुम्हाला खूप त्रास झाला आहे. आणि आता हा आहे त्रास द्यायला. सीमा आईचे असे बोलताच बाबा तिला ओरडले की, असे अजिबात बोलू नकोस.

माझ्यासाठी कोणीच त्रास नाहीये. मग तेव्हा मी त्याच्या रूममधे काही गेलो नाही. मी तिथून निघून गेलो. मला समजले होते की, ही बाई तोंडावर वेगळे वागते व पाठीमागून काहीतरी वेगळच. एक दिवस दुपारी मी नुकताच माझ्या मित्राच्या घरून आलो होतो. तेव्हा घरात कोणीच नव्हते. माझे भाऊ बहिण ही बाहेर गेले होते. आणि बाबा कामावर गेले होते. पण सीमा आई तर सकाळी मी जेव्हा बाहेर गेलो, तेव्हा पासून घरीच होती. पण आता घरात ती दिसत नव्हती.

मी तिला शोधत शोधत आमच्या टेरेसवर आलो. तेव्हा तिथे मी पाहिले की, ती तिच्या बहिणीसोबत बोलत होती. ती म्हणत होती की, येवढे वर्ष मी त्या बाईला सहन केले. तिच्यासोबत तर मी गोड गोड बोलून तिला बरोबर माझ्या रस्त्यातून हटवली. आणि कोणाला काही समजलही नाही, आता तिचा मुलगा संदीप आहे. आता फक्त हाच माझ्या रस्त्यातील काटा आहे. त्यालाही मी लवकरच हटवेल.

तीच हे बोलण ऐकून तर मला धक्काच बसला होता. तेव्हाच मी तिच्या समोर गेलो व तिला म्हणालो, तू असे कसे करू शकतेस? मला माहित पडले होते की, तूच माझ्या आईला मारले म्हणून. पण मी तुला काहीच बोललो नव्हतो. आता मी तुला सोडणार नाही. तुझ सत्य मी सर्वांसमोर आणेल. मी आताच बाबांना तुझ्याबद्दल सर्व खर सांगणार आहे. तेव्हा मी रागातच टेरेस वरून खाली उतरलो. मी खाली येताच बाबा घरी आले.

माझ्या मागे मागे ती सीमा ही आली. मी बाबांना काही बोलणार तोच ती बाबांना म्हणाली की, मला तुमच्यासोबत काहीतरी बोलायचे आहे. असे म्हणून ती बाबांना घेऊन तिथून निघून गेली. रात्री जेवणाच्या वेळेत मला भूक नाहीये, असे मी म्हणालो. पण बाबा मला आग्रह करू लागले की, थोड फार खाऊन घे. पण मी नाहीच बोलत होतो. तेव्हा बाबा म्हणाले की, निदान दूध तरी पी. तेव्हा ती सीमा माझ्यासाठी दूध घेऊन आली.

मला बाबांसमोर बळच ते प्यावे लागले. त्या रात्री मला कधी झोप आली मला कळलंच नाही. सकाळी उठल्यावर माझ डोकं जरा जड झाले होते. त्यादिवशी मला उठायला ही वेळ झाला होता. मी माझ्या रूम मधून बाहेर आलो. तेव्हा बाबा नाश्ता करत बसले होते. ती सीमाही त्यांच्या जवळच होती. आता मला राहवत नव्हते. मी तेव्हाच बाबा जवळ गेलो व बाबांना म्हणालो, बाबा मला तुमच्यासोबत थोड बोलायचे आहे.

बाबा म्हणाले बोल, ते माझ्या सोबत बाजूला येऊन बोलायला तयार नव्हते. ते माझी गोष्ट सिरीयसली घेतच नव्हते. आता माझ्या सहन शक्तीचा बांध तूटला होता. बाबा ही बाई खूप वाईट आहे, हिनेच माझ्या आईला मारले आहे. आणि ही मलाही आता संपवायच्या मागे आहे. ही तुमच्यासोबत फक्त पैश्यासाठी आहे. माझ हे बोलण ऐकताच बाबा माझ्यावर ओरडले व म्हणाले, तुला समजतय का तू काय बोलतोय ते? मी काही बोलणार तोच, ती सीमा जोरजोरात रड्डु लागली.

ती बाबांना तिच्या मोबाईल मधून काही तरी दाखवू लागली. ते बघताच बाबांनी माझ्या कानशिलात लावली. त्यावेळी तिने मधे येऊन बाबांना थांबवले. ती म्हणू लागली की, याची माझ्यावर वाईट नजर आहे. याने खूप वेळा माझ्यासोबत जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला होता. येवढंच नाही तर, त्याची माझ्या मुलीवरही घाण नजर आहे. तुमचे बाप लेकाच नात खराब होईल, म्हणून मी तुम्हाला कधी सांगितले नाही.

पण आता तर याने धोक्याने माझे हे असे त्याच्या सोबतचे फोटो काढलेत. तो हे फोटो पाठून मला ब्लॅकमेल करतोय, त्याच्या सोबत संबंध ठेवण्यासाठी. कसले फोटो मला तर काहीच कळत नव्हते. तेव्हा मला बाबांनी ते फोटो दाखवले. नक्कीच त्या सीमाने मला खाण्यात काही तरी मिसळून माझ्यासोबत ते फोटो काढले असणार. स्वतःच्या स्वार्थासाठी त्या बाईने माझ्यावर नको नको ते आरोप लावले होते. त्यादिवशी बाबांनी माझे काहीही ऐकून घेतले नाही.

त्यांनी मला त्या घरातून हाकलून दिले. त्यांनी माझ्यासोबत असलेलं नाते ही तोडले. ती सीमा तर बाबाच्या मागे उभी राहून माझ्यावर हसत होती. माझ्या बाबांमुळे मी त्या बाईला सोडून दिले. तिच्यावर मी कुठलीही कारवाई केली नाही. त्या दिवसानंतर मी थोडे दिवस माझ्या मित्राकडे राहिलो. त्यानंतर मी एका कंपनीत जॉबला लागलो. आज ते घर सोडून जवळ जवळ मला ६ महिने झाले होते. सहा महिन्यांनंतर मला एक गोष्ट माहित पडली की, माझ्या बाबांना लखवा मारला आहे.

Video Credit by – स्वामींचे बोल

तेव्हा मी त्यांना भेटायला म्हणून घरी गेलो होतो. पण त्या बाईने मला माझ्या वडिलांना भेटू दिले नाही. खिडकीच्या एका कोपर्यातून मी बाबांना पाहिले. ते माझ्याकडे पाहून काही तरी बोलण्याचा प्रयत्न करत होते. असे वाटत होते की, त्यांचे अर्धे शरीर काम करत नव्हते. तेव्हा मी तिथून निघून आलो. मला राहवत नव्हते म्हणून, थोड्या दिवसांनी मी माझे बाबा कसे आहेत. हे विचारायला आमच्या शेजारच्या घरी गेलो.

तेव्हा मला समजले की, ती सीमा माझ्या बाबाचे खूप हाल करते. ती त्यांची अजिबात काळजी घेत नाही. ती फक्त त्यांच्या पैश्यावर मज्जा मारतेय. हे सर्व समजूनही मी काहीच करू शकत नव्हतो. कारण बाबांनी वेळीच आपल कोण व आपल्यातील परक कोण हे ओळखले नव्हते. आता संपूर्ण घराची सत्ता तिच्याच हातात होती. मी जॉब करता करता मला जो कोर्स करायचा होता तो ही पूर्ण केला.

आता मी माझा स्वतःचा बिसनेस सुरू केला होता. काही महिन्यातच एक बातमी आली की सीमाचा accident झाला म्हणून. आणि आता ती जागेवरून ही उठू शकत नव्हती. वाईट कर्माच फळ हे वाईटच मिळत असते. तिने माझ्या सोबत व माझ्या परिवारासोबत जे काही केले होते, त्याचीच शिक्षा ती आता भोगत होती. ज्यामुळे तिने येवढं सगळ केलं होतं, तो पैसा तिचे ते माहेरची माणस कोणीच तिच्या जवळ नव्हते.

आता ती एका हॉस्पिटल मध्ये पडून आहे. माझे दोन्ही भाऊ बहिण ही तिच्या वागण्यामुळे तिच्या सोबत बोलत नाही. मी माझ्या बाबांची एका चांगल्या हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट केली. आता माझे बाबा हळू हळू पूर्ववत होत आहेत. माझ्या भावा बहिणींच्या शिक्षणाची जबाबदारीही मीच घेतली. माझ्या बाबांना समजले होते की, ती सीमा कशी आहे ते. बाबांच्या आजारपणात तिने बाबांना खूप त्रास दिला होता.

तिच्यामुळेच माझ्या बाबांनी माझ्यावर अविश्वास दाखवला होता. आणि माझी आई खूप लवकर माझ्यापासून दूर गेली होती. याच कर्माची फळे सीमा आज भोगत आहे.

तात्पर्य

मित्रांनो, हिशोब हा माणसाच्या पैश्याचा नाही तर त्याच्या कर्माचा होत असतो. म्हणून तुमचे कर्म चांगले ठेवा. नक्कीच त्याचे चांगले फळ मिळाल्याशिवाय राहणार नाही. मित्रांनो, आजची मराठी कथा तुम्हाला आवडली असेल, तर लाइक करायला विसरू नका. भेटू या पुढच्या अशाच एका नवीन मराठी कथेसह. तुम्हां सर्वांचे मनःपूर्वक आभार. श्री स्वामी समर्थ, जय श्री राम, जय श्री हनुमान, जय श्रीकृष्ण, जय माता लक्ष्मी…..

Leave a Comment