मित्रांनो, आजच्या मराठी गोष्टी मध्ये आपण पाहणार आहोत की, अशा कोणत्या तीन स्त्रिया आहेत? ज्या स्त्रियांसोबत चुकूनही लग्न करू नये. जर तुम्ही अशा तीन स्त्रियांसोबत लग्न केल. तर मग तुम्हाला पूर्ण आयुष्य पश्चाताप करत राहावे लागणार आहे. मित्रांनो, ही मराठी कथा खूपच ज्ञानवर्धक आणि माहितीपूर्वक आहे.

माझी तुम्हा सर्वांना नम्र विनंती आहे की, तुम्ही ही बोधकथा पूर्ण वाचा. ही कथा पूर्ण पाहिल्यानंतर तुम्हाला नक्कीच कळेल की, अशा कोणत्या तीन स्त्रिया आहेत. ज्यांच्यासोबत चुकूनही लग्न करू नये.
लग्न हा आपल्या आयुष्यातील सर्वात मोठा निर्णय आहे. मग अशावेळी आपल्याला आपला जोडीदार निवडताना, खूप काळजी घ्यावी लागते. जर जोडीदार चांगला असेल, तर आपल आयुष्य अगदी सुखपूर्वक व्यतीत होत असतं. परंतु जर जोडीदार तसा नसेल, तर मात्र जीवनातील कटकटी संपत नाही.
मराठी गोष्टी | मराठी कथा
मित्रांनो, एका गावामध्ये एक ब्राह्मण राहत होता. तो ब्राह्मण खूपच विद्वान आणि सदाचारी होता. त्याचबरोबर त्या ब्राह्मणाची बायकोसुद्धा खूपच सुशील आणि पतिव्रता स्त्री होती. ति घरातील कामकाजामध्ये खूपच चतुर होती. ब्राह्मण आणि ब्राह्मणीला दोन मुलं होती. एक मुलगा आणि एक मुलगी. आई वडील दोन्ही मुलांवर खूप प्रेम करायचे. आणि त्यांना सद्गुणी आणि सदाचारी बनवण्याचा प्रयत्न करत होते.
मुलगा मोठा होता, आणि मुलगी छोटी होती. ब्राह्मणाची मुलगी खूपच संस्कारी होती. आणि आई वडिलांच तिच्यावर विशेष प्रेमसुद्धा होत. हळूहळू दिवस पुढे सरकत होते. आणि बघता बघता मुलगी मोठी झाली. आणि विवाह योग्य सुद्धा झाली. आई वडिलांना समजले सुद्धा नाही की, त्यांची मुलगी विवाहयोग्य कधी झाली? त्यांनी कधी विचारसुद्धा केला नव्हता की, आता आपल्याला आपल्या मुलीसाठी वर शोधावा लागेल.
एके दिवशी जेव्हा मुलगी आईसोबत स्वयंपाक गृहात काम करत होती. तेव्हा आईला समजलं की, माझी मुलगी आता विवाह योग्य झाली आहे. व तिच्यासाठी आता योग्य वर शोधावा लागेल. त्याच दिवशी संध्याकाळी ब्राह्मणीने तिच्या नवर्याला सांगितलं. आपली मुलगी विवाह योग्य झाली आहे. आता आपल्याला हिच्या विवाहची काळजी करायला पाहिजे. तेव्हा ब्राह्मण म्हणाला, तू अगदी योग्यच म्हणत आहेस.
आता आपण लवकरात लवकर आपल्या मुलीचे योग्य वर बघून लग्न करायला हवे. ब्राह्मण मुलीच्या लग्नाच्या काळजीमध्ये राहू लागला. तो ब्राह्मण असल्या कारणाने त्याने मुलीची कुंडली पाहिली. त्याला पाहायचं होतं की, मुलीचा विवाह कधी केल्यामुळे तिचा विवाह सफल ठरेल. पंचांग पाहिल्यानंतर ब्राह्मणाला समजलं की, मुलीचा विवाह याच महिन्यामध्ये करायला हवा.
पुढे तीन वर्षापर्यंत मुलीच्या विवाहाचा योग नाही. हा सर्व प्रकार पाहून ब्राह्मणाला खूप जास्त भीती वाटली. ब्राह्मनिने जेव्हा ब्राह्मणाला विचारलं, तुम्ही इतके का घाबरले आहात. तेव्हा ब्राह्मणाने सांगितलं, आपल्या कन्येचा विवाह याच महिन्यामध्ये आपण केला पाहिजे. पुढे तीन वर्षांपर्यंत तिच्या विवाहाचा योग बनत नाही. आणि या महिन्यामध्ये सुद्धा फक्त एकच दिवस आहे.
जो दिवस तिचा विवाह करणे योग्य आहे. आणि तो आहे शुक्ल पक्षातील पंचमी. ब्राह्मणाच्या तोंडून हे सर्व ऐकल्यानंतर ब्राह्मणी सुद्धा खूप बेचैन झाली. परंतु थोडा वेळ विचार केल्यानंतर ती म्हणाली. अजून तर शुक्ल पक्षातील पंचमीला 15 दिवस बाकी आहेत. जर आपण योग्य प्रकारे प्रयत्न केले, तर आपल्या मुलीसाठी योग्य वर आपण शोधू शकतो. आणि अशा प्रकारे आपण आपल्या मुलीचा, याच महिन्यामध्ये शुक्ल पक्षातील पंचमीला विवाह लावून देऊ शकतो.
जर आपण 3 वर्ष थांबलो, तर आपली मुलगी खूप जास्त मोठी होईल. त्यामुळे आपल्याला लवकरात लवकर या 15 दिवसामध्येच आपल्या मुलीसाठी योग्य वराचा शोध घ्यावा लागणार आहे. ब्राह्मण विचार करू लागला, बायको ठीकच म्हणत आहे. तीन वर्षे थांबणे शक्य नाही, तेव्हा ब्राह्मणाने लगेचच लग्न जमणार्या एका महिलेला बोलावले. आणि तिला स्पष्टपणे सांगितलं, की माझ्या मुलीसाठी योग्य वर शोधायचा आहे. आणि तिचा विवाह याच महिन्याच्या शुक्ल पक्षातील पंचमीला करायचा आहे. कारण जर तिचा विवाह या महिन्यामध्ये झाला नाही.
तर पुढची 3 वर्ष तिच्या विवाहासाठी योग्य मुहूर्त नाही. त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर माझ्या मुलीसाठी योग्य वर शोधा. असे ब्राह्मण लग्न जमावणार्या महिलेला म्हणाला. तेव्हा ती महिलासुद्धा ठीक आहे असे म्हणून तिथून निघून गेली. त्यानंतर ती एका गावामध्ये पोहोचली. तिथे गेल्या नंतर दिला. एक सुशिक्षित आणि सुयोग्य असा ब्राह्मण युवक मिळाला. त्या महिलेने त्या युवकाला योग्य वर समजून त्याच्यासोबत ब्राह्मणाच्या मुलीचा विवाह पक्का केला.
आणि विवाह साठी शुक्ल पक्षातील पंचमीचा दिवस निश्चित केला. आणि ती पुन्हा परत आली. इकडे लग्न जमवणारी ती महिला घरातून गेल्यानंतर, लगेचच ब्राह्मणाच्या मनामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे विचार येऊ लागले. तो विचार करू लागला. ही तर लग्न जमवणारी महिला आहे. माहित नाही माझ्या सुशील आणि गुणवती कन्या साठी ही कशा प्रकारे वर पाहिल? लग्न जमवणे तर हीच कामच आहे. त्यामुळे ही माझ्या मुलीकडे विशेष लक्ष देणार नाही. आणि घाईगडबडीने कुठल्याही मुलासोबत माझ्या कन्येचा विवाह पक्का करेल.
परंतु अस होता कामा नये. वेळ कमी आहे. परंतु जर आता चूक झाली, तर मग ती सुधारता येणार नाही. त्याचबरोबर विवाह संबंध एक पवित्र संबंध आहे. वर आणि वधू यांचा हा स्थायी संबंध आहे. दोन जीवांचा शेवटपर्यंत साथ निभावण्याचा हा संबंध आहे. मग असा संबंध असे नाते ठरवताना जर घाई गडबड केली. काही विचार न करता हे नातं पक्कं केलं. तर हे माझ्या मुलीच्या भविष्या सोबत एक प्रकारचा खेळ केल्यासारखेच असणार आहे.
मी त्या महिलेला माझ्या मुलीसाठी मुलगा शोधायला सांगून खूप मोठी चूक केली आहे. ज्या मुलीला मी इतक्या लाडा प्रेमाने वाढवले आहे. मग तिच्यासाठी मी थोडासा सुद्धा त्याग करू शकत नाही का? नाही नाही, मी असं मुळीच करणार नाही. माझ्या मुलीसाठी मी स्वतः मुलगा शोधेल. माझ्या मुलीचं लग्न तीन वर्षानंतर झालं तरीसुद्धा चालेल. परंतु मला माझ्या मनासारखा वर, जो पर्यंत मिळत नाही तेव्हा पर्यंत मी माझ्या मुलीचा विवाह करणार नाही.
हाच विचार करून ब्राह्मण ताबडतोब उठला आणि ब्राह्मणीला त्याच्या मनातील सर्व विचार सांगून, वर शोधण्यासाठी निघून गेला. एका गावामध्ये गेल्यानंतर ब्राह्मणाला असा वर सापडला. जसा तो वर शोधत होता. त्याने ताबडतोब त्या मुलासोबत त्याच्या मुलीचा विवाह पक्का केला. आणि विवाहाची तिथी सांगून तो घरी परत आला. इकडे ब्राह्मण घरातून गेल्यानंतर ब्राह्मणीला खूपच काळजी वाटू लागली. ती विचार करू लागली.
लग्न जमवणारी ती महिला तर निर्बुद्ध आहे. ती माझ्या मुलीसाठी वर शोधताना फारशी काळजी घेणार नाही. जशी स्वतःची आई तिच्या मुलीसाठी वर शोधताना काळजी घेत असते. त्या महिलेला काय माहीत की, आमचं घर किती प्रतिष्ठित आहे? माझी मुलगी तर गुलाबाच्या फुलाप्रमाणे आहे. एखाद्या घरामध्ये जर ती गेली, तर घराला उजळून टाकेल. जर त्या महिलेने एखाद्या निर्धन किंवा कुरूप युवकासोबत. माझ्या मुलीचा विवाह पक्का केला. तर माझी मुलगी आयुष्यभर आम्हाला दोष देत राहील.
आणि त्याचबरोबर मलासुद्धा आयुष्यभर ही खंत राहील की, देवा मी घाई का केली? माझ्या नवर्याने हे खूप वाईट केलं. जे त्या लग्न जमवणार्या महिलेला मुलीसाठी योग्य वर शोधण्यासाठी पाठवले. आता त्यांना त्यांची चूक कळली आहे. आणि आता ते स्वतः वर शोधण्यासाठी गेले आहेत. परंतु यामुळे सुद्धा काहीच होणार नाही. कारण ते सुद्धा मुलीसाठी योग्य वर शोधतील असं मला वाटत नाही. ते फार तर फार काय बघतील की, मुलगा शिकलेला असावा, तंदुरुस्त असावा. मग त्याच्या घरामध्ये धन संपत्ती असो अगर नसो. त्यांना काय माहिती की, एका स्त्रीला काय काय हवं असतं?
मला तर असा मुलगा पाहिजे. जो सुंदर स्वस्थ धनवान, उदार मनाचा आणि चांगले चरित्राचा असेल. वेळ खूप कमी आहे. आणि घाईगडबडी मध्ये चुकी होण्याची संभावना खूप जास्त आहे. आणि म्हणूनच मी माझ्या मुलीसाठी स्वतःवर शोधेन. माझा नवरा माझे सर्व म्हणने ऐकतो. त्यामुळे तो माझं हे म्हणणं सुद्धा नक्कीच ऐकेल. आणि जर नाही ऐकले तर, मी जबरदस्तीने त्याच्याकडून मी ऐकवून घेईल. माझ्या मुलीवर माझा सुद्धा अधिकार आहे. मी त्या लग्न जमवणार्या महिलेचं काहीच ऐकणार नाही.
किंवा माझ्या नवर्याचसुद्धा ऐकणार नाही. शेवटी माझ्या मुलीच्या आयुष्य भराचा विषय आहे. त्यानंतर ब्राह्मणीसुद्धा मुलीसाठी योग्य वर शोधण्यासाठी निघाली. जाताना तिने मुलाला सर्व हकीकत सांगितली. व ती तिथून निघून गेली. त्यानंतर ब्राह्मणी चालत चालत एका आशा गावात पोहोचली. जिथे तिला तिच्या मनाप्रमाणे मुलगा सापडला. मग तिने तिच्या मुलीचं लग्न त्या मुलासोबत पक्कं केल. आणि तिथी सांगून ती घरी परत आली.
दुसरीकडे ब्राह्मणी घरातून गेल्यानंतर मुलीचा भाऊ विचार करू लागला. लग्न जमवणारी ती महिला तर तिचं काम करत आहे. कशाही प्रकारे ती तिचं काम पूर्ण करेल. तिला वर शोधण्यासाठी सांगितल आहे. मग ती वर शोधेल, मग तो कसाही असला तरीसुद्धा चालेल. वर शोधल्यानंतर तिचे काम संपेल. परंतु नंतर सर्व काही आम्हालाच भोगावे लागणार आहे. आई वडिलांवर काही जबाबदारी नक्कीच आहे. परंतु माझ्या पेक्षा जास्त नाही, ते त्यांच्या मनाप्रमाणे वर शोधतील.
बाबा हेच पाहतील की, मुलगा शिकलेला असावा. आई हे पाहिल की मुलगा सुंदर आणि धनवान असावा. परंतु इतके पुरेसे नाही, आई वडील तर काही दिवसा नंतर स्वर्गवासी होती. परंतु आमचे होणारे जावई आणि त्यांच्या परिवारातील लोक यांच्या सोबत माझा संबंध जास्त येईल. मला असं वाटत आहे की, माझ्या बहिणीसाठी जो वर शोधला जावा,तो स्वभावाने चांगला, मिळून मिसळून राहणारा, त्याचबरोबर त्याच्या परिवारातील लोक सभ्य आणि चांगल्या स्वभावाचे असावेत.
ज्यामुळे माझी बहिण सासरी गेल्यानंतर आनंदाने राहील. तिला कोणत्याही प्रकारचे दुःख होणार नाही. आणि ती जर आनंदी असेल, तर मी सुद्धा आनंदीच राहीन. मुलगा शिकलेला असेल, सुंदर असेल आणि धनवान असेल. परंतु जर तो सभ्य आणि समजूतदार नसेल. मग घरामध्ये सारखी भांडण होत राहतील. आणि त्यामुळे माझ्या बहिणीला आयुष्यभर त्रास सहन करावा लागेल. आणि म्हणूनच मी माझ्या मनासारखा वर माझ्या बहिणीसाठी शोधेल. आई वडील नाराज झाले तरी सुद्धा चालेल.
आणखी मराठी गोष्टी वाचा…
- सावत्र आई आणि मुलाची मराठी कथा
- कोणती गोष्ट बायको नवऱ्याला मागून पण देत नाही
- देवाने स्त्रीला बनवताना तिच्यात कोणती कमतरता सोडली
- पालकांनी या तीन चुका केल्या नाही, तर त्यांची मुलगी बिघडणार नाही
परंतु माझ्या बहिणीसाठी वर मी माझ्या प्रमाणेच शोधेन. हाच विचार करून मुलीचा भाऊ उठला, आणि घराची जबाबदारी नोकरांच्या हवाली सोपवून. तो त्याच्या बहिणी साठी वर शोधण्यासाठी निघून गेला. तो सुद्धा एका दुसर्या गावाला गेला व तिथे त्याच्या मनासारखा वर त्याला सापडला. तिथे जाऊन त्याने त्याच्या बहिणीचं नातं पक्कं केलं. आणि लग्नाची तिथी सुद्धा पक्की केली. व त्यानंतर तो घरी परत आला. अशाप्रकारे लग्न जमवणारी ती महिला ब्राह्मण, ब्राह्मनी आणि मुलीचा भाऊ या चौघांनी चार गावांमध्ये जाऊन, चार ठिकाणी मुलीचं लग्न पक्के केले होते.
लग्न जमवणारी महिला ब्राह्मण, ब्राह्मनी, आणि मुलगा चौघेही जेव्हा घरी आले. तेव्हा आपापसात बोलल्यानंतर त्यांना समजलं की, चौघांनीही चार गावांमध्ये जाऊन वेगवेगळ्या चार वरांची निवड केली आहे. आणि त्यानंतर सर्वांना लग्नासाठी एकच तिथी सांगितली आहे. ती म्हणजे शुक्ल पक्षातील पंचमी तिथी. जेव्हा ही गोष्ट ब्राह्मणाला समजली तेव्हा, ब्राह्मणाला खूप जास्त काळजी वाटू लागली. त्याने लगेचच लग्न जमावनार्या महिलेला सांगितलं की, तू त्या तीनही गावामध्ये जा.
जिथे ब्राह्मनीणे आणि माझ्या मुलाने नात पक्क केले आहे. तिथे जाऊन लग्न होऊ शकत नाही, असं सांगून ये. हे ब्राह्मणाच्या तोंडून हे बोलणे ऐकल्यानंतर लग्न जमवणारि ती महिला खूपच टेन्शनमध्ये आली. काय बोलावं तिला काहीच कळत नव्हतं. जर त्या महिलेने आज एक नात पक्क केला आहे. आणि उद्या जाऊन जर तिने ते नाते तोडलं. तर यामुळे तिचे नाव खराब होईल व त्यामुळे समाजामध्ये तिची काहीच इज्जत राहणार नाही.
त्यामुळे तिने विचार केला की, मी ठरवलेले नातं तोडनार नाही. मी ब्राह्मण, ब्राह्मणी आणि मुलांनी ठरवलेले नाते तोडेन, अशा प्रकारे लग्न जमवणार्या त्या महिलेने तेच केलं. ति तिन्ही ठिकाणावर गेली. आणि ब्राह्मणाने जो संदेश दिला होता तो त्या तिघांनाही सांगितला. परंतु त्या तिन्ही मुलांच्या घरच्यानी लग्न जमवणार्या. महिलेच काही एक ऐकलं नाही. आणि ते लग्नाची तयारी आणखी जोरात करू लागले, ते विचार करू लागले. नात तर तोच तोडू शकतो ज्याने नातं पक्कं केलं आहे.
ही महिला कोणीतरी मुलीकडच्यांची विरोधी दिसत आहे. त्यामुळे ती अस लग्न तोडण्यासाठी आली आहे. त्यामुळे मुलाकडच्यांनी त्या महिलेचे काहीच ऐकलं नाही. व लग्नाची तयारी चालू ठेवली. शुक्ल पंचमीचा दिवस उजाडला. ब्राह्मणाने लग्नाची सर्व तयारी केली होती. परंतु जेव्हा दुपारी पाहिलं तेव्हा दरवाजावर चार वराती आल्या होत्या. ब्राह्मण विचार करू लागला. मी त्या महिलेला सांगितलं होतं की, नातं तोडून टाक.
मग तरीसुद्धा ही लोकं वरात घेऊन माझ्या द्वारावर का आले आहेत. माझी एकच मुलगी आणि तिच्यासोबत लग्न करण्यासाठी चार मुले आली आहेत. आता मी काय करू माझी इज्जत मी कशी वाचवू. माझ्या समोर मारण्या शिवाय दुसरा कोणताही पर्याय नाही. असा ब्राह्मण विचार करू लागला. त्यानंतर विचार करत ब्राह्मण लगेचच घरातून निघाला. आणि एका नदी किनारी गेला. समाजात इज्जत जाऊ नये. यामुळे ब्राह्मणाला आत्महत्या करणे हाच योग्य पर्याय वाटला. तो जेव्हा नदीकिनारी आला व आत्महत्या करणार होता, तेव्हा तिथून एक साधू चालला होता. तेव्हा साधूने त्याला थांबवलं आणि विचारलं. तू या निर्जन जंगलामध्ये या नदीकाठी येऊन काय करत आहेस? ब्राह्मणाने साधूला सर्व हकीकत सांगितली.
की कशा प्रकारे माझ्या एका मुलीसोबत लग्न करण्यासाठी चार वर आले आहेत. व आता समाजात माझी इज्जत जाईल. मी लोकांना माझं तोंड दाखवू शकत नाही. त्यामुळे आत्महत्या करणे हाच योग्य पर्याय आहे असं मला वाटत आहे. तेव्हा ते साधू म्हणाले, आत्महत्या केल्यामुळे काहीच लाभ होणार नाही. तू माझ्यासोबत चल मी तुझी ही अडचण लगेचच दूर करेल. तेव्हा ब्राह्मण लगेचच त्या साधूसोबत निघाला. रस्त्यात जात असताना त्यांना एक कुत्री दिसली.
जिने आता तीन पिल्लांना जन्म दिला होता. तेव्हा साधूने एका कुत्रीच्या पिल्लांकडे इशारा करत, ब्राह्मणाला सांगितलं त्या कुत्रिनीचे पिल्लू उचल आणि तुझ्या झोळीमध्ये टाक. साधूने सांगितल्या प्रमाणे ब्राह्मणाने कुत्रीचे ते छोटे पिल्लू उचलले आणि त्याच्या झोळी मध्ये टाकलं. त्यानंतर ते दोघेही पुढे चालू लागले. पुढे गेल्यानंतर त्यांनी पाहिलं की, एका डुकरिणीने पिल्लांना जन्म दिला आहे.
साधूनि त्यातील एका पिल्लाकडे इशारा करून, ब्राह्मणाला त्यातील एक पिल्लू त्याच्या झोळी मध्ये टाकण्यासाठी सांगितलं. ब्राह्मणानें साधूने जसे सांगितलं तसं केलं. त्यानंतर ते आणखी पुढे गेले. तेव्हा एका गाढविणीने पिल्लांना जन्म दिला होता. पुन्हा साधून एका पिल्लाकडे बोट करत ब्राह्मणाला त्यातील एक पिल्लू त्याच्या झोळीमध्ये टाकण्यासाठी सांगितलं. ब्राह्मणाने साधूने जसं सांगितल तस केले.
आता साधू आणि ब्राह्मण दोघेही घरी पोहोचली. साधू म्हणाले, तु तूझ्या झोळीत जी तीन पिल्ले आणली आहेस. त्या पिल्लांना एका खोलीमध्ये बंद कर. आणि तुझ्या मुलीला सुद्धा त्याच खोलीमध्ये बंद कर. जेव्हापर्यंत मी म्हणत नाही तेव्हापर्यंत खोलीचा दरवाजा उघडू नकोस. साधूने जसं सांगितलं तसं ब्राह्मणाने केलं. आणि चौघांनाही एका खोलीमध्ये बंद केलं. त्यानंतर साधू म्हणाले, एक एक करून चारही वरांना बोलावं. ब्राह्मणाने पहिले एका वराला बोलावलं.
त्यानंतर साधूने खोलीचा दरवाजा उघडला. परंतु आतील प्रकार पाहून सर्वजण हैराण झाले. कारण आतमध्ये एकाच रंगाच्या, एकाच रूपाच्या, एकाच वयाच्या चार कन्या बसल्या होत्या. त्यामधील एका कन्येला बाहेर काढण्यात आले. आणि तिचा विवाह विधीपूर्वक तिथे उपस्थित असलेल्या वरासोबत करण्यात आला.
अशाच प्रकारे एक एक करून, चारही मुलींचे लग्न चार वारांसोबत करण्यात आले. ब्राह्मणाने चार ही मुलाकडच्यांची खूप चांगल्या प्रकारे खातिरदारी केली. आणि संध्याकाळी त्याने चारही मुलींचा निरोप घेतला. चारही मुले खुश होती. चौघांच्या ही मुखावर विजयाची भावना झळकत होती. प्रत्येकाला असंच वाटत होतं की, ब्राह्मणाच्या कन्येसोबत माझा विवाह झाला आहे. आणि वरात घेऊन आलेले तीन वर निराश होऊन परत गेले आहेत. त्यांना हे माहित होतं की, ब्राह्मणाला एकच मुलगी आहे.
परंतु तीन वराती चुकून आल्या आहेत. चारही मुली त्यांच्या सासरी गेल्या. हळूहळू दिवस पुढे सरकत होते. एके दिवशी ब्राह्मणाच्या मनात विचार आला की, माझ्या चारही मुलीच्या सासरी जाऊन मी पाहतो की, माझ्या मुली कशा प्रकारे राहत आहेत? त्याचप्रकारे तो प्रथम त्या मुलीजवळ गेला. जी मुलगी एका कुत्र्याच्या पिल्लापासून झाली होती.
मुलीच्या घरी गेल्यानंतर सोयर्यानी ब्राह्मणाचा खूप चांगल्या प्रकारे आदर सत्कार केला. त्यानंतर ते म्हणू लागले, आम्ही तुमचे खूप आभारी आहोत. तुम्ही तिथे आलेल्या तीन वरांना परत पाठवून, तुमच्या मुलीचे लग्न आमच्या मुलासोबत लावून दिले. यामुळे आम्हाला खूपच अभिमान वाटत आहे. तुमची मुलगी खूप सुंदर आहे. घरातील सर्व काम खूप चांगल्या प्रकारे करते.
मराठी मराठी गोष्टी चा विडिओ पहा
परंतु तिच्यामध्ये एक वाईट गुण आहे. ती काही ही कारण नसताना उगाचच भांडण करत असते. घरामध्ये सर्व गोष्टी असताना सुद्धा शेजारी मागायला जात असते. सकाळ झाल्यानंतर आजूबाजूच्या दहा घरा जवळ बसायला गेल्या शिवाय तिला चैन पडत नाही. आम्ही तिला खूपवेळा समजावून सांगितलं. कि तू अस इतरांच्या घराजवळ बसायला जात जाऊ नको, परंतु तीची सवय जातच नाही. सोयर्यांच हे बोलणे ऐकल्यानंतर ब्राह्मणाने एक दीर्घ श्वास घेतला आणि तो मनातल्या मनात म्हणाला, ही तर असेच वागणार.
कारण ही तर एका कुत्रीची मुलगी आहे. त्यानंतर ब्राह्मण त्याच्या दुसर्या मुलीजवळ गेला. जी एका डुकरिणीच्या पीलापासून झाली होती. तिथे गेल्यानंतर सुद्धा सोयर्यांनी ब्राह्मणाचा खूप चांगल्या प्रकारे आदर सत्कार केला. व त्यानंतर ते म्हणाले, श्रीमान, तुम्ही अन्य तीन वरांना परत पाठवून तुमच्या कन्येचा विवाह आमच्या मुलासोबत लावून दिलात. यामुळे आम्ही खूप कृतज्ञ आहोत. तुमची कन्या खूपच चांगल्या स्वभावाची आहे. परंतु तिच्यामध्ये एक वाईट गुण आहे. ती खूपच घाणेरडी वागते. सुंदर सुंदर वस्त्र ती एका दिवसातच खराब करून टाकते.
तिला खाण्याची सुद्धा नीट पद्धत माहित नाही. चांदीच्या ताटामध्ये वेगवेगळ्या प्रकारची पक्वान्न वाढलेले असतात. परंतु तुमची मुलगी सर्व पक्वान्न एकत्र मिक्स करून, खूप घाण पद्धतीने खात असते. जेव्हा लागेल तेव्हा ही जेवायला बसत असते. घरामध्ये काही ही दिसलं तर ताबडतोब खायला सुरुवात करते. आम्ही तिला खूपवेळा समजावून सांगण्याचा प्रयत्न केला.
परंतु तुमची मुलगी काहीच ऐकत नाही. तेव्हां ब्राह्मणाने मनातल्या मनात विचार केला, कशी ऐकेल? शेवटी ही एका डुकरिणीची मुलगी आहे. त्यानंतर ब्राह्मण त्या मुलीजवळ गेला. जी मुलगी गाढविणीच्या पिल्लापासून झाली होती. तिथे गेल्यानंतरसुद्धा सोयर्यांनी ब्राह्मणाचे खूप चांगल्याप्रकारे स्वागत केले. ते म्हणाले, आम्ही तुमचे खूप आभारी आहोत.
तुम्ही आमच्या मुलासोबत तुमच्या मुलीचे लग्न लावून, आमची इज्जत वाचवली. तुम्ही अन्य तीन वराती परत पाठवल्या. त्यामुळे आमची मान गर्वाने वर झाली आहे. त्याचबरोबर तुमची कन्या सुद्धा खूप चांगल्या स्वभावाची आहे. तुमची कन्या खूप मेहनती आहे. बिचारी दिवसभर कामामध्ये लागलेली असते. कितीही अवघड जड काम असेल तरी सुद्धा ती, कोणत्याही कामाला नाही म्हणत नाही.
परंतु ही गोष्ट जरी खरी असली, तरी तुमची मुलगी काम खूपच हळूहळू करत असते. 10 मिनीटांच काम करण्यासाठी ही एक ते 2 तास लावत असते. आपण हीला जसं सांगू तसं फक्त काम करते. स्वतःचे डोकं बिलकुल वापरत नाही. कधी कधी काम करत असताना शेजार्यां सोबत गप्पा मारायला बसते. आणि दिलेलं काम ती विसरून जाते.
ही खूपच आळशी आहे, सांगितल्या शिवाय कोणतेही काम करत नाही. त्याचबरोबर अन्न शिजवता शिजवता सुद्धा झोपत असते. आम्ही कित्येक वेळा तिला समजावण्याचे प्रयत्न केले, परंतु तरी सुद्धा ती आमच काहीच बोलन ऐकत नाही. असं वाटत आहे की, हीला परमात्माने बुद्धी नावाची चीजच दिली नाही. एकच गोष्ट हजार वेळा समजावून सुद्धा हिला समजत नाही.
त्यामुळे माझा मुलगा रागामध्ये हीला, कधी गाढविणीची मुलगी सुद्धा म्हणत असतो. तेव्हां ब्राह्मणाने मनातल्या मनात विचार केला. मग ही माझी मुलगी कुठे आहे? गाढविणीचीच तर मुलगी आहे. शेवटी ब्राह्मण त्याच्या कन्येजवळ गेला. तिथे गेल्यानंतरसुद्धा सोयर्यानी ब्राह्मणाचलचे खूप चांगल्याप्रकारे स्वागत सत्कार केला. सोयर्यांनी ब्राह्मणाची आणि त्याच्या काण्येची खूप चांगल्या प्रकारे प्रशंसा केली. आणि म्हणाले, सोयर्यांनो तुमची मुलगी खूपच सुशील आणि सुलक्षणी आहे.
ज्या दिवसापासून ती आमच्या घरामध्ये आली आहे. आमच्या घरातील दरिद्रता पूर्णपणे निघून गेली आहे. ती सकाळी लवकर उठते, घराची सर्व साफसफाई करते. नित्य नियमाने लवकर अंघोळ करून पूजापाठ करते. रिकाम्या वेळेमध्ये रामायण त्याचबरोबर चांगले चांगले ग्रंथ वाचत असते. शेजार्यांच्या घराजवळ जाऊन गप्पा मारणे, वेळ वाया घालवणे हे हीला बिलकूल आवडत नाही. सर्वांना खूप प्रेमाने जेवण वाढते. सासू सासर्यांची त्याचबरोबर तिच्या नवर्याची खूप चांगल्या प्रकारे ही सेवा करत असते.
हिचा इतरांसोबत वागण्याचा व्यवहार, बोलचाल खूप चांगली आहे. घरातील त्याचबरोबर बाहेरचे लोक सुद्धा त्याच्यामुळे खूप प्रसन्न राहतात. घरातील प्रत्येक गोष्ट व्यवस्थित सांभाळून ठेवत असते. कोणता ही वायफळ खर्च करत नाही. ज्या गोष्टीची गरज आहे, फक्त तीच गोष्ट बाजारातून आणायला सांगत असते. स्वतःसाठी कधी एका साडीची सुद्धा हीने मागणी केली नाही. जेव्हा आम्ही स्वतः हून साडी आणतो, तेव्हा ही म्हणते, मला याची काहीच गरज नव्हती.
माझ्याकडे अजून खूप साड्या आहेत. तिला कोणतेही आभूषण परिधान करण्याची आवड नाही. ती फक्त हेच म्हणत असते की, माझा नवरा हाच माझा सर्वात मोठ आभूषण आहे. सोयर्यांनो मी तुम्हाला सांगतो की, तुमची मुलगी खूप गुणी आहे. तेची मी शब्दांमध्ये प्रशंसा करू शकत नाही. ती तर साक्षात देवता स्वरूप आहे. सोयर्यां कडून हे असं बोलणं ऐकल्यानंतर, ब्राह्मण खूपच प्रसन्न झाला. मनातल्या मनात तो म्हणू लागला.
ही तर असच वागणार, कारण ही माझी म्हणजेच एका मनुष्याची मुलगी आहे. मित्रानो, अशाप्रकारे ब्राह्मण खूपच प्रसन्न होऊन, आनंदाने घरी निघून गेला. तर अशा प्रकारे आपण या कथे मार्फत जाणून घेतले आहे की, या कथेमध्ये ज्या तीन स्त्रिया आहेत. त्यातील पहिली स्त्री, जी एका कुत्र्याच्या पिल्लापासून जन्माला आली आहे. तिला सतत इतरांच्या घरासमोर जाऊन बसण्याची, वायफळ वेळ वाया घालवण्याची सवय आहे.
अशा मुलीसोबत चुकूनही लग्न करू नये. त्याचबरोबर दुसरी स्त्री जी एका डुकरिणीच्या पिल्लापासून जन्माला आली आहे. ती खूपच घाणेरडी वागत असते. तिला जेवणाची योग्य पद्धत माहित नाही. जेवण्याची योग्य वेळ माहित नाही. कसे वागावे हे सुध्दा माहीत नाही, अशा प्रकारच्या मुलींसोबत सुद्धा चुकूनही लग्न करू नये. त्याचबरोबर तिसरी स्त्री ती म्हणजे एका गाढविणीच्या पिल्लापासून झाली आहे. जी खूप सुस्त, सांग कामी आणि तिच्या संसारामध्ये स्वतःचे डोक न वापरणारी असते. अशा मुली सोबत सुद्धा कधीच लग्न करू नये.
लग्न तर अशा मुलीसोबत करावे. जी सुसंस्कारी घरातील सर्व सदस्यांची काळजी घेणारी. कमी खर्च करणारी, त्याचबरोबर सासरच्या घराला स्वतःचं घर समजणारी असावी. अशा मुलीसोबत तुम्ही लग्न करत असाल तर, तुमच्या घराची दिवसागणिक प्रगती होत राहील.
तात्पर्य
मित्रानो, ह्या मराठी गोष्टी मध्ये सांगितलेली कथा तुम्हाला आवडली असेल, आपल्या जवळच्या नातेवाईकांना ही मराठी कथा शेअर करायला विसरू नका. भेटूया पुढच्या अशाच एका ज्ञानवर्धक मराठी गोष्टी मध्ये, एका नवीन कथेसह. तोपर्यंत तुम्हां सर्वांचे मनःपूर्वक आभार. श्री स्वामी समर्थ, जय श्री राम, जय श्री हनुमान, जय श्रीकृष्ण, जय माता लक्ष्मी…..