Ladaki Bahin Yojana discontinued? – योजना बंद होणार का: 2025

मित्रांनो नमस्कार, लाडकी बहीण योजना महाराष्ट्रातील महिलांसाठी एक महत्त्वाची योजना आहे. राज्य सरकारने अनेक महिलांना या योजनेचा लाभ दिला. पण अलीकडेच, Ladaki Bahin Yojana discontinued होण्याच्या मार्गावर आहे. राज्य सरकारच्या पडताळणीत सुमारे पाच लाख महिलांना अपात्र ठरवण्यात आलं आहे.

Ladaki Bahin Yojana discontinued

त्यामुळे अनेक महिलांमध्ये चिंता आहे की, त्यांच्याकडून पैसे परत घेतले जातील का? किंवा त्यांच्यावर कोणतीही कायदेशीर कारवाई होणार का? यावर महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी महत्त्वाचं स्पष्टीकरण दिलं आहे. चला, Ladaki Bahin Yojana discontinued या अपडेटबद्दल सविस्तर माहिती घेऊया.

लाडकी बहिण अपात्र महिलांची यादी

राज्य सरकारने लाडकी बहीण योजनेसाठी पात्र आणि अपात्र महिलांची तपासणी केली. या तपासणीत अनेक महिलांना अपात्र करण्यात आले आहे. पाहूयात कोणत्या कारणांमुळे Ladaki Bahin Yojana discontinued होणार होती मात्र त्यात बदल करून काही महिलांना अपात्र करण्यात आले आहे

1. संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेत असलेल्या महिला – 2,30,000
2. 65 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या महिला – 1,10,000
3. कुटुंबातील सदस्याच्या नावावर चार चाकी गाडी असलेल्या महिला
4. नमोशक्ती योजनेच्या लाभार्थी असलेल्या महिला
5. स्वेच्छेने या योजनेतून नाव मागे घेणाऱ्या महिला – 1,60,000

लाडकी बहिण योजने चे पैसे परत करावे लागणार का?

काही दिवसांपूर्वी महिलांमध्ये मोठी चर्चा होती की, Ladaki Bahin Yojana discontinued झाल्यावर किंवा अपात्र ठरलेल्या महिलांना योजनेअंतर्गत मिळालेले 1500/- रुपये परत करावे लागणार का? या प्रश्नाचं उत्तर स्वतः महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिलं आहे.

  • त्यांच्या म्हणण्यानुसार लाडकी बहीण योजनेत मिळालेला सन्मान निधी महिलांकडून परत घेतला जाणार नाही.
  • फक्त फेब्रुवारी 2025 पासून या अपात्र महिलांना पुढील हप्ते मिळणार नाहीत.
  • 2024 डिसेंबरपर्यंत दिलेल्या निधीवर कोणताही परिणाम होणार नाही.

महिला व बाल विकास मंत्र्यांचं स्पष्टीकरण

आदिती तटकरे यांनी Twitter (x) वर पोस्ट करत सांगितलं की, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा दिलेला लाभ परत घेतला जाणार नाही. पण पुढील हप्ते मिळणार नाहीत. यामुळे लाभ घेतलेल्या महिलांना दिलासा मिळाला आहे.

हे हि वाचा –

महिलांवर कायदेशीर कारवाई होणार का?

काही महिलांना चिंता होती की, अपात्र ठरल्यामुळे त्यांच्यावर काहीतरी कारवाई होईल का? पण आदिती तटकरे यांनी स्पष्ट केले आहे. महिलांवर कोणतीही कायदेशीर कारवाई केली जाणार नाही. त्यांना कुठल्याही नोटिसा पाठवल्या जाणार नाहीत.फक्त नवीन हप्ते बंद करण्यात येणार आहेत.

Ladaki Bahin Yojana discontinued – सरकारचं पुढील पाऊल

राज्य सरकारने योजनेतील पारदर्शकता वाढवण्यासाठी नवीन उपाययोजना केल्या आहेत. यामध्ये काय आहे ते पाहू.

  • नवीन पात्रता निकष लवकरच जाहीर केले जातील.
  • योजना सुरू ठेवण्यासाठी डिजिटल पडताळणी वाढवण्यात येईल.
  • अपात्र महिलांना इतर योजनांचा लाभ मिळण्यासाठी दुसरा पर्याय शोधला जाईल.

तुम्हाला काय करायला हवं?

मित्रांनो, जर तुम्ही लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी असाल, तर पुढील गोष्टी लक्षात ठेवा.

  1. पैसे परत करावे लागणार नाहीत.
  2. फक्त फेब्रुवारी 2025 पासून नवीन हप्ते मिळणार नाहीत.
  3. तुमचं नाव पात्र यादीत आहे की नाही, हे तपासा.
  4. सरकारच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन अपडेट मिळवत राहा.
  5. जर अपात्र ठरलात, तरी सरकारच्या इतर योजनांचा फायदा घ्या.

Ladaki Bahin Yojana discontinued होणार का तर तसे नसून त्यात मोठे बदल करण्यात आले आहेत. 5 लाख महिला अपात्र ठरवल्या आहेत. परंतु सरकार त्यांच्याकडून पैसे परत घेणार नाही, हे आज स्पष्ट केले आहे. त्यामुळे योजनेचा लाभ घेतलेल्या महिलांना दिलासा मिळाला आहे. जर तुम्ही यापुढेही सरकारी योजनांची माहिती मिळवू इच्छित असाल, तर आमच्या WhatsApp Group ला जॉईन होऊ शकता. आणि ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.

Leave a Comment