धार्मिक कथा | मराठी गोष्टी | मराठी नैतिक कथा – सहा कामे कधीच आपल्या मुलांसमोर करू नयेत

मित्रांनो, पती पत्नीने, ही सहा कामे कधीच आपल्या मुलांसमोर करू नयेत. याने तुमची मुलं कधीच बिघडणार नाहीत. कोणती सहा कामे करू नयेत. ते आपण एका धार्मिक कथा मार्फत समजून घेणार आहोत. त्यामुळे ही धार्मिक मराठी कथा शेवट पर्यंत नक्की ऐका…

धार्मिक कथा

धार्मिक कथा

मित्रांनो, एकदा एक माणूस त्याच्या म्हाताऱ्या गाईला जंगलामध्ये सोडून निघून गेला. बिचारी गाय खूपच म्हातारी झाली होती. तिला व्यवस्थित चालायला सुद्धा जमत नव्हतं. थकून ती एका झाडाखाली बसली. त्याच झाडावर एक माकड बसलेले होते. गाईला रडताना पाहून माकडाने विचारलं. हे गोमाता तुला कोणते दुःख आहे, तू या झाडाखाली बसून का रडत आहेस. कृपया तुला जो काही त्रास आहे. तुझी जी काही अडचण आहे, ती मला सांग.

जर माझ्याकडे तुझ्या या समस्येवर काही समाधान असेल, तर मी नक्कीच तुझी मदत करेन. माकडाने विचारल्यावर गाय म्हणाली, हे माकड भावा. तू माझी काय मदत करशील. या धर्तीवर समस्थ योनीमध्ये, श्रेष्ठ मानला जाणारा मनुष्य प्राणी जेव्हा माझे दुःख दूर करू शकला नाही. मग तू काय माझी मदत करू शकशील.

हा मनुष्य माझ्या म्हातारपणात माझा आधार बनू शकला नाही. मी या गोष्टीचा कधीच विचार केला नव्हता की, ज्याच्या घरात राहून माझं दूध पाजून, मी ज्या मनुष्याला बालकापासून तरुण बनवलं. तो मनुष्य आज मी वृद्ध झाल्यामुळे मला दोन वेळचा चारा पाणी सुद्धा देऊ शकत नाही. त्याच्या घरात राहून मी माझं पूर्ण आयुष्य व्यतीत केलं. मी त्यांच्याकडे चारा पाण्या व्यतिरिक्त दुसरे काहीच मागितले नाही. मिठाया खाण्यासाठी मनुष्याची जीभ नेहमी पाणवलेली असते. त्या मिठाया त्यांनी माझ्या दुधापासूनच तयार केले आहेत.

मला तर कधी मिठाई खाण्याची सुद्धा लालसा उत्पन्न झाली नाही. लहान बाळांपासून वृद्धांपर्यंत सर्वांचे पालन पोषण माझ्या दुधामुळे झाला आहे. आणि आज तोच निर्दयी मनुष्य मला उपाशी मरण्यासाठी जंगलामध्ये सोडून गेला आहे. जास्तीत जास्त एक ते दोन वर्ष मी आणखी जगले असते. एक-दोन वर्षांमध्ये मी त्यांचे इतकं काय खाल्लं असतं. मी माझ्या पूर्ण आयुष्या मध्ये जेवढे दूध त्यांना दिले आहे. त्याच्या एक टक्के सुद्धा मी त्यांचं खाल्लं नाही.

परंतु ती लालची मनुष्य मला तेवढे सुद्धा खायला देऊ शकले नाहीत. आणि आज ते मला मरण्यासाठी या जंगलामध्ये सोडून निघून गेले आहेत. या जंगलामध्ये एखादा जंगली हिंसक प्राणी माझ्या म्हाताऱ्या शरीराची दुर्गती करून निघून जाईल. किती मतलबी आहे माणूस. जेव्हा पर्यंत दूध देत होती, तेव्हा पर्यंत मला खायला प्यायला दिलं. आणि जेव्हा मी म्हातारी झाले. तेव्हा मला मरण्यासाठी सोडून निघून गेला. आणि हाच विचार करत मी इथे बसले आहे.

तेव्हा माकड म्हणाला, हे ताई. मला तुझे हे दुःख ऐकून खूप जास्त वाईट वाटत आहे. मी तुझे हे दुःख दूर तर करू शकत नाही. परंतु मी तुझं सांत्वन नक्कीच करू शकतो. ज्या मनुष्यांबद्दल तू बोलत आहेस. तो मनुष्य त्याच्या सख्ख्या माणसांचा सुद्धा झाला नाही. मग तुझा कसा होईल. मी तुला एक कथा सांगतो. ती लक्षपूर्वक ऐक. माणूस किती मतलबी आहे. तुला ही कथा ऐकल्यानंतर सर्व काही समजून जाईल. एका गावामध्ये एक शेतकरी व त्याची बायको राहत होते. त्यांचा एकुलता एक मुलगा होता. मेहनत मजुरी करून त्यांनी त्यांच्या मुलाला शिकवलं.

शिकल्यानंतर तो एका शहरांमध्ये जाऊन चांगली नोकरी करू लागला. तिथेच राहून त्याने एका सुंदर मुली सोबत विवाह केला. शेतकर्या च्या मुलाला पाच वर्षाचा एक मुलगा होता. शेतकऱ्याचा मुलगा त्याच्या बायको सोबत आणि मुलासोबत खूपच आनंदाने राहत होता. गावाकडून शहरात येऊन बरेच वर्ष झाले होते. गावाकडे त्याचे म्हातारे आई-वडील त्याची वाट पाहत होते. परंतु तो त्याच्या आईवडिलांना विसरला होता. परंतु त्या म्हाताऱ्या आई-वडिलांना त्यांच्या मुलाची नेहमी काळजी लागलेली असायची. एके दिवशी म्हाताऱ्या आई-वडिलांनी विचार केला की, मुलाला पाहून खूप वर्ष निघून गेली आहेत.

तो तर इकडे येत नाही. मग आपणच त्याच्या जवळ जाऊया. हाच विचार करून ते दोघे वृद्ध माता पिता मुलाला भेटण्यासाठी शहराच्या दिशेने निघाले. म्हातारपणामुळे ते खूपच कमजोर झाले होते. डोळ्यांनी व्यवस्थित दिसत नव्हते. हातापायांमध्ये आता पूर्वीसारखी शक्ती राहिली नव्हती. नेहमी जेवत असताना त्यांचे हात पाय थर थर कापायचे. मुलाला भेटण्याच्या आनंदाने त्यांच्या शरीरामध्ये एक वेगळी शक्ती संचारली होती. शहरात गेल्यानंतर म्हाताऱ्या आई-वडिलांनी, जेव्हा त्यांच्या मुलाला नातवंडाला आणि सुनबाईला पाहिलं.

तेव्हा त्यांना खूप आनंद झाला. दोघेही म्हातारे आई-वडील त्यांच्या मुलासोबत तिथेच राहू लागले. काही दिवसांपर्यंत मुलाचा आणि सुनबाई चा व्यवहार व्यवस्थित होता. परंतु जसे जसे काही दिवस व्यतीत झाले. तेव्हा सुनबाई त्यांच्यावर चिडू लागली. ते दोघेही सुनबाईला आता ओझं वाटू लागले होते. त्यांच्यासाठी जेवण शिजवणे, त्यांची उष्टी भांडी धुणे, कपडे धुणे हे तिला बिलकुल आवडायचं नाही. तिला सर्वात जास्त त्रास त्यामुळे वाटायचा की, जेव्हा ते म्हातारे आई-वडील जेवायचे. तेव्हा त्यांचे हात थर थरायचे, त्यामुळे काही ना काही लादीवर पडत असे. कधी दुध पडत असे, तर कधी भाजी.

ज्यामुळे लादी आणि टेबलावर घाण होत असे. त्यांच्या या वागणुकीमुळे मुलाला आणि सुनबाईला खूप जास्त राग यायचा. एके दिवशी सुनबाई शेतकऱ्याच्या मुलाला म्हणते. हे बघा, आता खूप झालं. एक तर मी तुमची पूर्ण सेवा करत असते. तुमची उष्टी भांडी धुवत असते. परंतु आता तर हद्द झाली आहे. तुमचे आई-वडील खूप जास्त घाण करत असतात. आणि माझ्याच्याने हे करणे शक्य होणार नाही. एक तर तुम्ही यांच्यासाठी काहीतरी दुसरी व्यवस्था करा. नाहीतर त्यांनी केलेली घाण मी अशीच ठेवीन. मी आता साफसफाई करणार नाही.

मला सारखी सफाई करायला कंटाळा येतो. तेव्हा नवरा म्हणाला, प्रिये, तू काळजी करू नकोस. मी आत्ताच त्यांची काहीतरी व्यवस्था करतो. इतकं म्हणून मुलगा शहरांमध्ये निघून गेला. आणि काही प्लास्टिकची भांडी घेऊन आला. आणि घराच्या एका कोपऱ्यामध्ये त्या म्हाताऱ्या आई-वडिलांची व्यवस्था त्याने केली. त्या आई-वडिलांना त्याच प्लास्टिकच्या भांड्यांमध्ये जेवण वाढले जायचे. म्हातारी आई वडील ज्या प्रकारे त्यांची भांडी धुवू शकत होते. त्या प्रकारे ते त्यांची भांडी धुवत होते. नाहीतर त्याच उष्ट्या भांड्यांमध्ये त्यांना अन्न वाढले जायचे.

आणखी धार्मिक कथा, मराठी गोष्टी वाचा

ज्या प्रकारे आपण आपल्या घरामध्ये एखाद्या पालतू प्राण्याला वेगळ्या भांड्यामध्ये जेवण देतो. त्याच प्रकारे त्या म्हाताऱ्या आई-वडिलांची भांडी होती. त्यांची भांडी कधीच धुतली जात नव्हती. किंवा ते जिथे राहत होते, त्या जागेची स्वच्छता सुद्धा केली जात नव्हती. ते दोघेही म्हातारे आई-वडील कोपऱ्यात बसून गुपचूप जेवण जेवायचे. मुलाच्या आणि सुनबाईच्या या वागणुकीमुळे, त्या दोघाही वृद्धा आई वडिलांच्या डोळ्यांमध्ये पाणी यायचे. परंतु या गोष्टीचा मुलाबरोबर सुनबाई वर काहीच फरक पडत नव्हता. जर वृद्ध आई-वडिलांकडून एखादी चूक झाली.

तर मुलगा आणि सुनबाई त्यांना खूपच घालून पाडून बोलत होते. आई-वडिलांचा वृद्ध माता पिताच्या प्रति हा व्यवहार पाच वर्षाच्या मुलाला चांगला वाटला नाही. तो शांत राहून हा सर्व प्रकार पाहत होता. एके दिवशी तो पाच वर्षांचा मुलगा, त्याच्या आईवडिलांना म्हणाला. बाबा मला हे सांगा की, आजी आजोबांची भांडी आपल्या भांड्यांपेक्षा वेगळी का आहेत? तेव्हा मुलाचे आईने उत्तर दिलं, तुझी आजी आजोबा म्हातारे झाले आहेत.

म्हातारपणामुळे त्यांच्या शरीरातून घाण वास येत असतो. ते रोजच्या रोज आंघोळ करू शकत नाहीत. आणि म्हणूनच त्यांचे कपडे आणि भांडी वेगळी आहेत. त्यावर मुलगा म्हणाला, मी ही भांडी जपून ठेवणार आहे. कारण म्हातारपणी तुम्हाला सुद्धा याच भांड्यांची गरज पडेल. माझी पत्नी सुद्धा ज्याप्रकारे तुम्ही आजी आजोबांना कोपऱ्यात बसून जेवण वाढत आहात. त्याच प्रकारे माझी पत्नी सुद्धा तुम्हाला याच कोपऱ्यात बसवून जेवण वाढत जाईल. मुलाचे हे बोलणं ऐकून दोघेही नवरा बायको आश्चर्य चकित झाले. त्यांना त्यांच्या डोळ्यांमध्ये त्यांचे भविष्य दिसू लागले.

त्यांच्या मुखातून एक शब्दही निघाला नाही. त्यांना त्यांच्या कृत्यावर पश्चाताप होत होता. मुलाच्या एका उत्तराने त्यांना विचार करण्यास भाग पाडले. त्या दोघांनाही त्यांच्या कृत्यावर खूपच लाज वाटत होती. त्या दोघांनीही त्यांच्या मुलाजवळ व वृद्ध आई-वडिलां जवळ क्षमा मागितली. आणि सांगितलं की, आता भविष्यामध्ये ते अशी चूक कधीच करणार नाहीत. मित्रांनो, विचार करा जर आई-वडील नसते. तर तुम्ही या पृथ्वीवर जन्माला कुठून आला असता. तुम्ही तुमच्या घरातील लहान मुलांसाठी आदर्श आहात. तुम्ही जसे कराल, तसेच ते तुमच्याकडून शिकतील.

आणि म्हणूनच मुलांसमोर नेहमी चांगले आचरण ठेवायला हवे. आणि तुमच्या घरातील वृद्ध लोकांचा नेहमी मानसन्मान ठेवायला हवा. जर तुम्हाला असं वाटत असेल की, म्हातारपणात तुमच्या मुलांनी तुमची काळजी घ्यावी. तर या गोष्टी नेहमी लक्षात ठेवा. म्हातारपण आपल्या आयुष्याचा एक भाग आहे. ज्याला इच्छा नसताना सुद्धा, आपल्याला स्वीकारावे लागते. म्हातारपणात शरीर शिथिल बनते. हात पाय व्यवस्थित काम करत नाहीत. ज्यामुळे आपल्या सर्वांना खूप अडचणींचा सामना करावा लागतो अपमानित व्हावं लागतं.

धार्मिक कथेचा विडिओ पहा

Video Credit by – स्वामींचे बोल

अनेक कष्टांपासून रोगांपासून पीडित राहावं लागतं. आणि अशा परिस्थितीत जर मूलबाळ कुलक्षणी असेल. तर मग हा त्रास किती पटीने वाढून जातो. जो जिवंतपणे नरका समान यातना आपल्याला देत असतो. जितकी मर्जी असेल तेवढे धन कमवा. जेवढे वाटतील तेवढ्या सुखाच्या वस्तू एकवटून ठेवा. परंतु यासोबतच एक काम नक्कीच करा. जे खूप महत्त्वपूर्ण आहे. आणि ते काम आहे. तुमच्या मुलाला सुलक्षणी बनवणे, मुलाला चांगल्या संस्कारांनी संपन्न ठेवणे. आपल्या महापुरुषांबद्दल त्यांना सांगणे. त्यांच्या आदर्शांवर तुम्ही चालणे.

आणि मुलांना चालण्यास सांगणे. जर तुम्ही असं केलं नाही, तर तुमच्या म्हातारपणी तुमची दुर्गती होणे योग्य आहे. माकड म्हणाला, हे गोमाता. आपल्याला तेच मिळत असतं. जे आपण पेरत असतो. जर आपण आपल्या वडीलधाऱ्या माणसांना त्रास दिला आहे. मग आपण सुद्धा सुखाची अपेक्षा करू नये. असं म्हणतात की, आई वडील हे देवा समान असतात. जर आपण देवाला त्रास देत असतो. मग देव आपल्याला कधीच माफ करणार नाही. ज्या प्रकारे सेवकाची परीक्षा सेवेच्या वेळी होत असते. बंधू बांधवांचा प्रेम दुःखाच्या वेळी दिसत असते.

मित्राची परीक्षा कठीण प्रसंगाच्या वेळी होत असते. पुत्राची परीक्षा म्हातारपणात होत असते. पत्नीचे प्रेम गरिबीत समजत असते. या सर्व प्रसंगांमध्ये जे ठामपणे तुमच्या सोबत उभे असतात. तेच खरे सेवक, बंधू, बांधव, मित्र, पुत्र तसेच पत्नी असतात. अन्यथा बाकी सर्व फक्त देखावा आहे. जो वडिलांचा आज्ञाकारी आहे. तोच पुत्र श्रेष्ठ आहे. जो मुलाबाळांचा योग्य प्रकारे पालनपोषण करत असतो. त्यांना चांगले शिक्षण प्रदान करत असतो. तेच वडील श्रेष्ठ असतात. खरा मित्र तोच आहे. जो कठीण प्रसंगात साथ देतो. तीच पत्नी चांगली असते, जी पतीचे अनुसरण करते.

पती तोच योग्य असतो, जो धर्मानुसार पत्नी प्रती त्याच्या कर्तव्याचे पालन करतो. अन्यथा सर्वकाही निष्फळ आहे. माकड म्हणाला. हे गोमाता, मनुष्याने कधीच ही सहा कामे त्यांच्या मुलांसमोर करू नयेत. नंबर 1. माता, पिता, भाऊ-बहीण आणि गुरुजनांचा अपमान कधीच मुलांसमोर करू नये. नंबर 2. मुलांसमोर कधीच भोगविलास या प्रकारचे कार्य करू नये. जसे की घाणेरडे चित्र पाहणे, स्त्रीसोबत प्रेम संबंध करणे. नंबर 3. मुलांसमोर कधीही शिव्या देऊ नये. परिवारातील कोणत्याही सदस्या सोबत नाराजी किंवा भांडण होत असेल, तर तुम्ही तुमच्या भाषेवर नेहमी नियंत्रण ठेवायला हवं.

ज्या घरामध्ये लोक शिव्या देत असतात. त्या घरातील मुलं सुद्धा शिव्या द्यायला शिकतात. नंबर 4. कोणाचेही नाव खोडकर पद्धतीने घेऊ नये. जरी एखादा लहान बालक असेल, तरीसुद्धा त्याचं नाव व्यवस्थितच घ्यायला हवं. नंबर 5. मुलांसमोर कधीच कोणत्याही शास्त्राचे प्रदर्शन करू नये. कोणालाही मारण्याची गोष्ट करू नये. मुलांना कधीच हे दर्शवून देऊ नका की, तुम्ही किती शक्तिशाली आहात. अन्यथा त्यांच्यामध्ये लहानपणापासूनच, दुसऱ्यांवर प्रभाव गाजवण्याची सवय निर्माण होईल. नंबर 6. मुलांसमोर कधीच तुमचं धन प्रदर्शित करू नका.

तात्पर्य

जर मुलांना तुमच्या धना बद्दल समजलं. तर त्या मुलाचे लक्ष शिक्षणामध्ये कमी, आणि अन्य गोष्टींमध्ये जास्त लागू लागते. माकड म्हणाला की, गोमाता, जो मनुष्य त्याच्या सारख्या माणसांचा झाला नाही. तो तुझा कसा होईल. माकडाचा हे बोलणं ऐकून, गोमाता तिचा दुःख विसरून गेली. आणि देवावर विश्वास ठेवून जंगलामध्ये राहू लागली. मित्रांनो, या कथेमार्फत तुम्हाला जर एखादी चांगली गोष्ट शिकायला मिळाली असेल, तर विडिओला एक लाईक करा. भेटूया पुढच्या अशाच एका ज्ञानवर्धक व्हिडिओमध्ये, एका नवीन चर्चेसह. तोपर्यंत तुम्हा सर्वांचे मनःपूर्वक आभार. श्री स्वामी समर्थ, जय श्रीराम, जय श्री हनुमान, जय श्रीकृष्ण, जय माता लक्ष्मी….

Leave a Comment