God Katha In Marathi – मराठी स्टोरी | मराठी कथा | मराठी बोधकथा | हृदयस्पर्शी कथा

नमस्कार मित्रांनो, जय श्रीकृष्ण, श्री स्वामी समर्थ, जय श्री हनुमान, तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे. आज पुन्हा एकदा आम्ही तुमच्यासाठी एक अतिशय माहितीपूर्ण मराठी कथा, God Katha In Marathi घेऊन आलो आहोत. ज्यामध्ये आपल्याला सांगितले जाईल की, तुमच्या घरात सुख शांती, संतती नसणे, पैसा नसणे यामुळे तुम्ही ही त्रस्त झाला आहात का? तुमचे नशीब तुमच्या बाजूने नाही का? तुमच्या घरात लक्ष्मी वास करत नाही का? तुमच्या घरातील शांती आणि आनंदाला ग्रहण लागले आहे का?

God Katha In Marathi

तुमचे कोणतेच काम व्यवस्थित पार पडत नाही का? तर मित्रांनो, आजच्या गोष्टीमध्ये आम्ही खूप महत्त्वाची माहिती देणार आहोत. ज्या महिला रात्री आपल्या पतीसोबत झोपतात त्यांच्यासाठी ही माहिती खूप महत्त्वाची आहे. मित्रांनो ज्या स्त्रिया आपल्या पतीवर रागावता किंवा पतीसोबत झोपत नाहीत, तर त्यांनी या कथे कडे अजिबात दुर्लक्ष करू नये. चला मित्रांनो कथेला सुरु करूयात.

मराठी कथा

मित्रांनो एका गावात एक गरीब सेठ राहत होता. होय, गरीब सेठ. तुम्ही विचार करत असाल की, सेठ होता आणि तोही गरीब. हे दोन परस्पर विरोधी शब्द एकत्र कसे, हा सगळा नशिबाचा खेळ आहे. मित्रांनो प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात चढ-उतार येत असतात. तसेच दिनानाथ सेठ हे देखील एकेकाळी खूप श्रीमंत होते. आणि ते पुष्कळ दानधर्म आणि सत्कर्म करत असे, पण काळ बदलला आणि त्यांनी हळूहळू आपली संपत्ती गमावली. आणि शेवटी अशा टप्प्यावर पोहोचले की, लोक त्याला गरीब सेठ नावाने ओळखू लागले.

पण ते म्हणतात ना की, चांगल्या कर्मांची फळे लवकर किंवा उशिरा का होईना पण नक्कीच मिळतात. असंच काहीसं या गरीब सेठच होणार होतं. ज्या गावात हा सेठ राहत असे तेथे एकदा राजाने घोषणा केली की, ज्याने चांगले काम केले आहे, त्याच्या चांगल्या कर्मांची मोजणी करावी आणि त्या बदल्यात राजाकडून जो काही सन्मान असेल तो घ्यावा. ही घोषणा सेटच्या पत्नीने ऐकली आणि सेठच्या पत्नीला खूप आनंद झाला.

कारण सेट ने आपल्या चांगल्या दिवसात असंख्य पुण्य कर्मे केली आहे. हे तिला माहीत होते. हे बायकोने सेटला सांगितल्यावर सेठही खुश झाला आणि म्हणाला की, तसे असेल तर आपल्याला खूप मोठे बक्षीस मिळायला हवे, कारण आपल्या सत्कर्मांची यादी खूप मोठी आहे. दुसऱ्याच दिवशी शेठ ने पहाटेच चार भाकरी सोबत घेतल्या आणि राजाच्या महालाकडे निघाला. शेठच्या घरापासून राजाचा वाडा बराच दूर होता. प्रवास लांबचा होता, अर्ध्या वाटेवर पोहोचल्यावर सेट खूप थकले, व विश्रांतीसाठी एका झाडाच्या सावलीत बसले आणि सोबत आणलेल्या भाकऱ्या खाण्याचा विचार करू लागले.

सेट जेवायचा विचार करत होते तेवढ्यात अचानक एक गाय आणि तिचे दोन बछडे त्यांच्या समोर आले. सेठच्या हातातल्या भाकऱ्या पाहून गाय आणि तिचे वासरू त्याच्या समोर येऊन उभ राहील, आणि त्यांच्याकडे पाहून सेठला समजले की, ती भुकेली आहे. आणि सेट कडे खायला मागत आहे. सेठच्या चांगल्या दिवसात सेट कडे अनेक गाई होत्या, त्यामुळे सेटला गाईंची वागणूक चांगलीच माहित होती.

मराठी बोधकथा | God Katha In Marathi

जरी सेट ची परिस्थिती आता चांगली नव्हती, पण सेटचा स्वभाव अजिबात बदलला नव्हता. तो आधीच दानशूर होता. त्यामुळे त्याला गाईची किव आली, आणि त्याने त्या बांधून आणलेल्या भाकरी यांपैकी, दोन भाकऱ्या गाईला खायला दिल्या. दोन भाकऱ्या खाऊन गाय काही क्षणातच पुन्हा सेट कडे पाहू लागली. तेव्हा सेटला वाटले की, ही गाय खूप भुकेलेली आहे. या गाईला तिच्या दोन बछड्यांना दूध पाजावे लागते, या दोन भाकरी नि तिचे काय होणार.

शेठ ने सोबत उरलेल्या दोन भाकऱ्या ही गाईला खाऊ घातल्या, आणि जवळच्या तलावाचे फक्त पाणी पिऊन सेट आपल्या प्रवासाला निघाला. सेठ राजाच्या दरबारात पोहोचल्यावर, राजाने संपूर्ण दरबारा समोर सेटला त्याचे नाव विचारले आणि त्याच्या चांगल्या कर्मा बद्दल सांगण्यास सांगितले. सेठ राजाला त्याच्या कृत्याबद्दल सांगू लागला. सेट म्हणाले, महाराज मी अनेक भुकेल्यांना जेवण दिले आहे. अनेक मंदिरात दान केले आहे. अनेक निराधारांना आसरा दिला आहे. आणि खूप तीर्थक्षेत्रांना भेटी दिल्या आहेत.

त्यांनी शेकडो संतांची केलेली सेवा, आणि अशी डझन भर कामे सांगितल्यावर सेट म्हणाले, महाराज ही माझी अनेक सत्कर्मे आहेत. त्याबदल्यात तुम्हाला हवे ते बक्षीस द्या. थोडा वेळ विचार करून राजा म्हणाला, तुमच्याकडे अजून काही सत्कर्म असतील तर सांगा. कारण तुम्ही मला जे काही सांगितले आहे ते मी सत्कर्म म्हणून गणत नाही. राजाजे बोलला ते ऐकून सेटला खूप आश्चर्य वाटले. शेठ हात जोडून राजाला म्हणाला, जर मी सांगितलेली हि कर्मे सत्कर्मे किंवा पून्यकरमे वाटत नसतील तर, माझ्या बाकीच्या कर्माचा उल्लेख करणे व्यर्थ आहे.

तुम्ही मला परवानगी द्या, मी परत जातो. जेव्हा सेठ दरबारातून निघू लागला तेव्हा राजाचा एक दरबारी राजाकडे गेला, आणि काहीतरी बोलला. ते ऐकून राजाने सेटला पुन्हा दरबारात बोलावले. राजा म्हणाला. तू आज चांगले काम केले आहे ते सांगितले नाहीस. सेठ म्हणाला, महाराज आज मी कोणतेही चांगले काम केले नाही, मग तुम्हाला काय सांगू. राजाने त्याच दरबार्याला उभे राहून संपूर्ण घटना सांगण्यास सांगितले. ज्याने राजाला त्याच्या बद्दल सांगितले होते.

दरबारी उभा राहिला आणि म्हणाला, महाराज मी सांगितल्या प्रमाणे मी त्याच गावात राहतो. जिथे हा सेट आराम करायला बसला होता. तिथे मी पाहिले की, त्याने त्याच्या जवळचे सर्व अन्न गाईला कसे दिले, आणि तो स्वतः न खाता फक्त पाणी पिऊन उपाशी राहिला. राजा काय बोलतोय ते सेटच्या लक्षात आले. तेव्हा सेट राजाला म्हणाला, प्राण्याला खायला घालण्यात काय पुण्य आहे, ते आपले काम आहे. राजा शेठला म्हणाला, माझ्या महान गुरुजींनी सांगितल्या प्रमाणे मी ती कामे पुण्यकर्म मानतो, जी निस्वार्थ भावनेने केलेली असतात.

या मराठी कथा चा विडिओ पहा

हृदयस्पर्शी कथा

म्हणूनच तुम्ही आज जे काम केले ते सर्वोत्कृष्ट होते. ज्यासाठी तुम्ही खरोखर बक्षीस पात्र आहात, यानंतर राजाने त्या सेठला आपल्या सर्वात विश्वासू सेवकाचे पद दिले.आता सेटला त्या राजाच्या दरबारात बसण्याची संधी मिळाली होती. त्याला खूप आनंद झाला त्याने लगेच घरी जाऊन पत्नीला सांगितले कि, आज सुदैवाने राजाने मला खूप मोठे बक्षीस दिले आहे. त्याने मला त्याचा सर्वात जवळचा सेवक म्हणून ठेवले आहे. हे ऐकून पत्नी खूप आनंदी झाली. आणि म्हणाली, हे देवा मी तुझी आभारी आहे, आज तू माझे ऐकलस.

स्वतःला बदलायचे असेल तर स्वामींची हि गोष्ट वाचा

आता सेट राजासोबत त्याचा वैयक्तिक सेवक म्हणून राहू लागला, राजाने त्याच्यावर खूप विश्वास ठेवला. कारण सेट खूप प्रामाणिक माणूस आहे हे त्याला माहीत होते. तो कधीही खोटे बोलणार नाही किंवा अप्रामाणिक होणार नाही, हे राजाला माहित होते. दरबारात कोणतेही महत्वाचे काम असले की, राजा ते काम त्या सेठकडे सोपवत असे, आणि सेटने ही राजासाहेबांचे काम आपल्या देखरेखीखाली अत्यंत प्रामाणिकपणे करून घेत असे. एके दिवशी राजा आपल्या महालात बसला होता, आणि त्याचा सेवक सेट देखील त्याच्या सोबत बसला होता.

तेवढ्यात अचानक एक शिपाई तिथे येतो, आणि राजाला सांगतो की, राजा साहेब आज तुम्हाला एका साधूला भेटायचे आहे. तेव्हा राजाने त्याला आदरपूर्वक आणण्याची आज्ञा केली. शिपाई बाहेर जाऊन साधूला आदराने आत घेऊन येतो. राजा त्या साधूला आपल्या महालात मोठ्या आदराने ठेवतो, आणि त्याला अन्न पाणी वगैरे पुरवतो. यामुळे साधु राजावर खूप खुश होतो. त्यानंतर साधू राजाला म्हणतात, हे राजा तुमची सेवाभाव पाहून मला खूप आनंद झाला. म्हणून मला तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगायची आहे, जी तुम्ही तुमच्या आयुष्यात नक्कीच अमलात आणावी.

मराठी स्टोरी

ते म्हणाले की प्रत्येक पुरुषाने नेहमी लक्षात ठेवले पाहिजे की, पुरुषाचे आपल्या पत्नीशी नेहमी चांगले संबंध असले पाहिजेत. आणि जर कधी पती-पत्नीमध्ये मतभेद किंवा भांडण झाले तर ते वेळीच सोडवले पाहिजे. कारण पती-पत्नीच्या आपसी कलहामुळे घरात दारिद्र्य आणि आर्थिक तंगी येऊ लागते. त्यामुळे पती-पत्नीमध्ये आपुलकी असणे अत्यंत गरजेचे आहे. रागाच्या भरात कोणत्याही पतीने पत्नी पासून दूर राहू नये. हे प्रत्येक पुरुषाने लक्षात ठेवावे, कारण यामुळे पत्नीच्या हृदयात प्रचंड वेदना होतात आणि पत्नीला घरची लक्ष्मी मानली जाते. आणि लक्ष्मी दुखावली तर घरात धनाची कमतरता भासते, घरात गरिबी येऊ लागेल.

प्रत्येक पती-पत्नीने नेहमी जवळ राहून एकत्र झोपले पाहिजे. कारण एकत्र झोपल्याने घरात धन समृद्धी वाढते, यामुळे लक्ष्मी सुद्धा प्रसन्न होते. जेव्हा घरातील लक्ष्मी प्रसन्न असते तेव्हा देवी लक्ष्मी नक्कीच प्रसन्न होते, असे बोलून साधू राजाच्या महालातून निघून जातात. काही दिवसांनी राजाचे राणीशी भांडण होते, आणि दोघेही वेगवेगळ्या ठिकाणी राहू लागतात. म्हणजे दोघेही एकमेकांपासून दूर राहू लागतात. राणी तिच्या खोलीत झोपायची राजा त्याच्या खोलीत एकटाच झोपायचा, पण राणी रोज रात्री राजाच्या खोलीत त्याला पाहण्यासाठी जात असे.

राज्याच्या सैनिकांमध्ये सैनिकांच्या वेशात एक ढोंगी राजवाड्यात राहत होता, जो दुस-या राज्याचा गुप्तहेर होता. राजा आणि राणी यांच्यात भांडण सुरू आहे, हे कळल्यावर तो त्याचा फायदा उठवण्याचा प्रयत्न करतो. आणि राजाला मारून संपूर्ण राज्य ताब्यात घेण्याचा प्रयत्न करतो. एका रात्री तो त्याच्याच काही साथीदारांसह त्याला मारण्यासाठी राजाच्या दालनात जातो. कारण राजा त्याच्या खोलीत एकटाच झोपला होता. त्यांची राणी त्याच्यासोबत नव्हती, हे त्याला माहित होत. गुप्त शत्रूचा दूत राजाच्या खोलीत शिरला, आणि तिथून राणी रात्री राजाला पाहण्यासाठी राजाच्या खोलीकडे येत होती.

राज्याच्या खोलीत राजाला कोणीतरी मारण्यासाठी जात असल्याचे राणीने पाहिले. हे पाहून राणी ताबडतोब काही सैनिक पाठवते आणि त्या शत्रूला अटक करते. सकाळी जेव्हा राजाला या सर्व पराक्रमाची माहिती मिळते तेव्हा त्याने राणीचे लाखो वेळा आभार मानले. आणि पती-पत्नीने नेहमी एकोप्याने राहावे असे साधूंचे ते शब्द राजाला आठवतात. कारण यामुळे घरात ऐश्वर्य आणि समृद्धी येते, आणि सर्वांचे नशीब चांगले राहते. राणीने त्याला जर योग्य वेळी पकडले नसते तर कदाचित राजाची सर्व संपत्ती, आणि प्राण शत्रूने हिरावून घेतले असते.

तात्पर्य

हे खरे आहे की घरातील स्त्री ही स्वतः लक्ष्मी असते, आणि लक्ष्मीला नेहमी प्रसन्न ठेवले पाहिजे. जर पती पत्नी सोबत झोपला तर पत्नी सदैव आनंदी राहते. आणि घरात सुख, शांती, संपत्ती आणि समृद्धी नांदते. मित्रांनो, आजचा ज्ञानवर्धक व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, ते कमेंट करून नक्की कळवा. आणि कमेंट मध्ये हर हर महादेव, जय श्री राम, श्री स्वामी समर्थ, जय श्री हनुमान लिहायला विसरू नका. देवांचे देव महादेव, तुमच्यावर सदैव आशीर्वादाचा वर्षाव करोत, धन्यवाद मित्रांनो…

Leave a Comment