मनोरंजक मराठी बोधकथा – स्त्री पुरुषाकडून कोणत्या गोष्टी ची इच्छा ठेवते

नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. प्रियदर्शकांनो आज मी एक अतिशय मनोरंजक मराठी बोधकथा आणि उद्बोधक कथा घेऊन आले आहे. आजची गोष्ट अशी आहे की, स्त्री पुरुषाकडून कोणत्या गोष्टी ची इच्छा ठेवते हे आज आपण पाहणार आहोत. त्यामुळे हि कथा शेवट पर्यंत पहा.

मनोरंजक मराठी बोधकथा

मनोरंजक मराठी बोधकथा

मित्रांनो, एकदा देवर्षी नारद मुनी, भगवान श्रीकृष्ण यांना भेटण्यासाठी द्वारका नगरीमध्ये येतात. नारदमुनींना पाहून भगवान श्रीकृष्ण म्हणतात, हे देवर्षी द्वारका नगरीमध्ये तुमचे स्वागत आहे. कोणत्या कारणामुळे आज तुम्ही द्वारका नगरीमध्ये आगमन केले आहे. तेव्हा नारद जी म्हणतात. हे प्रभू तुम्हाला तर सर्व काही माहित आहे, तरी सुद्धा तुम्ही मला विचारता आहात. जर तुम्ही मला आज्ञा देत असाल, तर मला तुम्हाला एक गोष्ट विचारायची आहे. तेव्हा भगवान श्रीकृष्णा नारद मुनी यांना म्हणतात. तुमच्या मनात जे पण प्रश्न आहेत.

ते निसंकोच होऊन मला विचारा, तेव्हा नारद मुनी म्हणतात. हे प्रभू, एक स्त्री पुरुषांकडून सर्वात जास्त कोणत्या गोष्टीची इच्छा ठेवत असते? तिच्या नवर्या कडून ती सर्वात जास्त कोणती गोष्ट मागत असते? जी गोष्ट, सोने, चांदी, दागिने, कपडे या सर्वांपेक्षाही मौल्यवान आहे. तेव्हा भगवान श्रीकृष्ण म्हणतात, हे देवर्षी. आज तुम्ही खूपच चांगला प्रश्न विचारला आहे. तुमच्या या प्रश्नाच्या उत्तरामध्ये या संसारातील समस्त स्त्रियांचे कल्याण लपले आहे. तुमच्या या अत्यंत महत्त्वपूर्ण प्रश्नाचे उत्तर, मी देवी नंदा हिच्या कथेद्वारे तुम्हाला सांगणार आहे. तेव्हा देवर्षी म्हणतात.

हे प्रभू ही देवी नंदा कोण आहे? आणि हिचे आचारविचार कसे होते? देवी नंदा बद्दल मी तुमच्याकडून जाणून घेण्यासाठी खूप जास्त उत्सुक आहे. कृपा करून तुम्ही मला देवी नंदाचा वृत्तांत सागा. तेव्हा भगवान श्रीकृष्ण म्हणतात. हे देवर्षी, देवी नंदा गुणवान त्याचबरोबर मनोकामना पूर्ण करणारी गाय आहे. फक्त नंदा हे नाव आपल्या मुखामध्ये घेतल्याने आपल्या पापांचा नाश होत असतो. देवी नंदाची ही महान कथा ऐकल्याने सुध्दा मनुष्याचे सर्व दुःख नष्ट होत असतात.

आणि त्याला सुख समृद्धीची प्राप्ती होत असते. देवी नंदा महान पुण्यवान त्याचबरोबर सर्व मनोकामना पूर्ण करणारी देवी आहे. आणि म्हणूनच आज मी तुम्हाला या महान नंदा देवीची कथा सांगणार आहे. तुम्ही या कथेला लक्षपूर्वक नक्की ऐका. तेव्हा देवर्षी म्हणतात, हे प्रभू. आज ऐकायला मिळणार्या या कथेला मी पूर्णपणे आवश्य ऐकणार आहे.

आणि या कथेचा प्रचार सुद्धा करणार आहे. तेव्हा भगवान श्रीकृष्ण म्हणतात, हे देवर्षी, पूर्व काळातील गोष्ट आहे. पृथ्वीवर चंद्रसेन नावाचा प्रसिद्ध एक महाबली राजा राज्य करत होता. एके दिवशी महाराज चंद्रसेन त्यांच्या रथामध्ये बसून शिकार करण्यासाठी जंगलामध्ये जातात. ते जंगलामध्ये शिकार शोधण्यासाठी इकडे तिकडे फिरत होते, तेव्हा त्यांना जंगलामध्ये झुडपांच्यामध्ये एक हरीण दिसले. महाराजांनी लगेचच त्यांचा बान काढला.

आणि धनुष्य ताणून हरणावर निशाणा साधला. हरणाच्या दिशेने जसा राजाने बाण सोडला तेव्हा ताबडतोब तो बाण हरणाला लागला. व हरिण तिथेच जखमी झाले. हरिण चारी बाजूला पाहू लागले. तेव्हा त्याची दृष्टी महाराज चंद्रसेन यांच्यावर पडली.

महाराज त्यांच्या हातामध्ये धनुष्य घेऊन उभे होते. हे पाहून हरिण मनाली, हे दृष्ट माणसा. हे तू काय केले आहेस? तू जे काही केल आहेस त्यामुळे तुझे कर्म पापाने भरलेली आहेत. मी निर्भय होऊन या वनामध्ये माझ्या बछड्याला दूध पाजत होते. आणि अशा अवस्थेमध्ये तू माझ्यासारख्या निरपराध हरणीला, तुझ्या बाणाचा निशाणा बनवला आहे. तू खूपच निर्दयी आणि क्रूर आहेस.

शास्त्रामध्ये असं सांगितलं गेलं आहे की, मुलाला स्तनपान करत असणार्या स्त्रीकडे पाहने सुद्धा खूप मोठे पाप आहे. तू तर माझी हत्या करण्याचा प्रयत्न केला आहेस. आता माझ्या मृत्यूनंतर माझ्या या बछड्याचे काय होणार? त्याची रक्षा कोण करेल. हे निर्दई राजा तुझ्या पापासाठी मी तुला श्राप देणार आहे.

आत्ताच्या आत्ता या क्षणाला तू कच्चे मांस खाणारा एक वाघ बनशील. आणि ह्याच वणा मध्ये तू निवास करशील? त्या हरणीचे हे शब्द ऐकून महाराज चंद्रसेन खूपच घाबरला. त्याला खूपच घाम फुटू लागला. महाराज चंद्रसेन हरणीची क्षमा मागू लागला. महाराज त्या हरणीसमोर बसून हात जोडून प्रार्थना करूं लागला. महाराज म्हणू लागला, हे कल्याणी, मला क्षमा कर. मला माहीत नव्हतं की तू तुझ्या बछड्याला दूध पाजत आहेस.

मी नकळतपणे तुझा वध केला आहे. कृपा करून माझ्या या चुकीला क्षमा कर. आणि मला या शापापासून मुक्ती मिळण्यासाठी मार्ग सांग. तेव्हा ती हरिणी म्हणू लागली. हे राजन आजपासून 100 वर्षानंतर या वनामध्ये नंदा नावाची एक गाय येईल.

तीच गाय तुला या पापापासून मुक्ती मिळवून देईल. त्यानंतर राजा लगेचच एक वाघ बनला. त्या वाघाचा आकार भयंकर मोठा होता आणि तो दिसायलासुद्धा अत्यंत भयानक होता. तो वाघ त्याच वनामध्ये राहून हरणीच्यां मासंची आणि वेगवेगळ्या प्राण्यांची शिकार करून, त्यांना खाऊ लागला. तो वाघ स्वतःलाच दोष द्यायचा की, मी या शरीरातून निघून कधी मानव शरीर धारण करेल? या वाघाच्या योनीमध्ये राहून माझ्याकडून एकही पुण्यकर्म होऊ शकत नाही. एक मात्र हिंसा करणे हीच माझी वृत्ती आहे. आणि यामुळे मला सदैव दुखच प्राप्त होणार आहे.

अशा प्रकारे मी या पापातून मुक्त कसा होऊ शकेल. अशा प्रकारे तो वाघ स्वतःलाच दोष देत असे. जेव्हा त्या वाघाला जंगलात राहून 100 वर्ष पूर्ण झाली, तेव्हा एके दिवशी तिथे गाईंचा खूप मोठा कळप आला. त्या वनामध्ये गवत आणि पाण्याची काहीच कमतरता नव्हती.

त्याच्यामुळे गाई तेथे चरण्यासाठी आल्या होत्या. त्या गाईच्या कळपामध्ये खूपच सुंदर गाय होती. जिचे नाव नंदा होते. ती गाय त्या गाईच्या कळपाची प्रधान गाय होती. सर्वात पुढे निर्भीडपणे राहून ती चालत असे. एके दिवशी चरता चरतातिच्या कळपापासून दूर निघून गेली. आणि ती त्या वाघाच्या समोर आली. वाघाने जेव्हा त्या गाईला पाहिलं तेव्हा, तो तिच्यासमोर उभा राहिला, आणि म्हणू लागला. हे गाय, आज विधात्याने माझ्या भोजनाच्या स्वरूपात तुझी निवड केली आहे. कारण तू स्वतःच माझ्या जवळ चालत आली आहेस. त्या वाघाचे हे बोलणे ऐकल्यानंतर गाईला, तिच्या वासराची आठवण आली. गाईचा गळा भरून आला.

आणि ती रडत रडत हंबरडा फोडत तीच्या बछड्याला हाक मारू लागली. त्या गाईला असं रडताना पाहून तो वाघ म्हणाला, हे गाई तू का रडत आहे? या संसारामध्ये सर्व प्राणी त्यांच्या कर्माचे फळ भोगत असतात. आज तू स्वतः चालत चालत माझ्या जवळ आली आहे. यावरून हे समजते की तुझा मृत्यु माझ्या हाती लिहिला गेला आहे. मग तू व्यर्थ शोक का करत आहेस. चल ठीक आहे, तू मला हे सांग. तू कशामुळे रडत आहे. तेव्हा त्या वाघाचं हे बोलणं ऐकून नंदा नावाच्या त्या गाईने म्हटलं. हे वाघा तुला माझा नमस्कार आहे. माझ्याकडून जे पण अपराध झाले असतील, त्याबाबत मला क्षमा कर. मला माहीत आहे. तुझ्याजवळ आलेल्या प्राण्यांचे प्राण वाचणे असंभव आहे.

आता मी माझ्या प्राणासाठी शोक करत नाही. माझा मृत्यु एक ना एक दिवस तर होणारच आहे. परंतु हे वाघ, माझ वासरू अजूनही त्याचं जीवन माझ्या दुधावर चालवत आहे. गवत तर ते खाऊ शकत नाही. या वेळेला ते गोठ्यामध्ये आहे. आणि भुकेमुळे व्याकुळ झाले असेल. व ते माझी वाट पाहत असेल. म्हणूनच मला या गोष्टीचं खूप वाईट वाटत आहे. की माझ्यानंतर माझ्या वासराचं काय होईल? ते त्याचे जीवन कशाप्रकारे जगेल? मी माझा पुत्रस्नेहामध्ये वशीभूत झालेली आहे. आणि म्हणूनच मला त्याला दूध पाजायचं आहे.

आणखी मराठी गोष्टी वाचा…

मला थोड्या वेळासाठी जाऊ दे, मी माझ्या वासराला दूध पाजून, प्रेमाने त्याचं मस्तक चाटून व त्याला काही उपदेश सांगून, माझ्या मैत्रिणीकडून त्याचे रक्षण करण्याचे वचन घेऊन. मी तुझाकडे परत येईल. त्यानंतर तुझ्या इच्छेनुसार तू मला खा. जर मी पुन्हा तुझ्याजवळ आले नाही. तर मला ते पाप लागेल जे आई वडिलांचा वध केल्यामुळे लागत असते. जे झोपलेल्या प्राण्याला मारल्या मुळे लागत असते. जे एकदा कन्यादान केल्यानंतर पुन्हा त्याच्या कन्येला दुसर्याला देऊ इच्छित असतो. अशा लोकांना जे पाप लागत असते. तेच पाप मला लागेल. आणि याच पापाच्या भीतीमुळे मी पुन्हा परत नक्की येईन. नंदा गाईची अशी शपथ ऐकल्यानंतर, वाघाला तिच्यावर विश्वास बसला. आणि तो म्हणाला. हे नंदा गाय, तुझ्या या शपथेवर मला विश्वास आहे.

परंतु काही लोक तुला असे सुद्धा म्हणतील की, प्राण संकटामध्ये पडल्यानंतर संकटामधून बाहेर पडण्यासाठी जी शपथ घेतली जाते. त्या शपथेला तोडल्याने पाप लागत नाही. परंतु तू या लोकांच्या बोलण्यावर विश्वास ठेवू नकोस. या संसारामध्ये असे कित्येक लोक आहेत, जे नास्तिक आहेत. जे स्वतः मूर्ख असतात, परंतु स्वतःला पंडित समजता. अशी लोक तुला भ्रमामध्ये टाकतील.

ज्यांच्या चित्तावर अज्ञानाचा पडदा आहे, ते तुच्छ मनुष्य कुतर्क लावून तुला ही शपथ तोडण्यासाठी सांगतील. परंतु तू तुझ्या वचनाचे पालन कर. तेव्हा नंदा काय म्हणाली, हे वाघा. तुझ बोलन अगदी सत्य आहे. मी माझ्या वचनाचे पालन आवश्य करणार. त्यानंतर तो वाघा म्हणाला, हे गाय आता तू जाऊ शकते.

तू तुझ्या वासराला भेट, त्याला दूध पाज, त्याचं डोकं चाट. त्याचबरोबर तुझ्या मैत्रिणींना सांग की, तूझ्या वासराची काळजी घ्या व त्यानंतर तू माझ्या जवळ परत ये. त्यानंतर ती गाय त्या वाघाची आज्ञा घेऊन तिथून निघून गेली. गाईच्या डोळ्यातून सतत अश्रू वाहत होते. ती अत्यंत दुखी झाली होती. तिच्या हृदयामध्ये.

खूप जास्त दुःख होत. जशी गाय तिच्या घरी पोहोचली. तिने तिच्या वासराचा आवाज ऐकला, तेव्हा ती पळतच तिच्या वासरा जवळ पोहोचली आणि रडू लागली. मातेला असं रडताना पाहून ते वासरू म्हणाले, हे माता काय झाल आहे? तेव्हा नंदा गाय म्हणाली. बाळा तु माझ दूध पिऊन घे, आज तुझी आणि माझी ही शेवटची भेट आहे.

आता तुला तुझ्या मातेचे दर्शन होणार नाहीत. आज एक दिवस तू माझ दूध पी. मला ताबडतोब इथून जायचं आहे. मी वाघाला वचन देऊन आली आहे. जो भुकेमुळे व्याकुळ झाला आहे. त्याला मी माझे जीवन अर्पण करण्याचे वचन दिले आहे. तेव्हा वासरू म्हणाले. आई तू जिथे जाणार आहे तिथे मी सुद्धा तुझ्यासोबत येईल. तुझ्याशिवाय मी तरी कसं जगू शकेन. तुझ्यासोबत माझं ही मारणे चांगल आहे. तु जर नसेल तर मी सुद्धा एकटा मारूनच जाणार आहे. जर वाघाने तुझ्या सोबत मलासुद्धा मारलं तर निश्चितच मलासुद्धा मृत्यूनंतर चांगला मार्ग मिळेल.

मनोरंजक मराठी बोधकथेचा विडिओ पहा

Video Credit by – स्वामींचे बोल

जो मातृभक्त पुत्राला मिळत असतो, तोच मार्ग मला मिळेल. आणि म्हणूनच मी तुझ्यासोबत नक्कीच येणार आहे. आईपासून वेगळ्या झालेल्या बालकाचे जीवन खूपच दुखी असतं. दूध पिणार्या बालकांसाठी आईपेक्षा मोठ या जगामध्ये दुसरे काहीच नाही. मातेसमान रक्षक, मातेसमान आश्रय, मातेसमान स्नेह, मातेसमान सुख, त्याचबरोबर मातेसमान देवता. या जगामध्यें काय तर स्वर्गामध्ये सुद्धा नाहीत. तेव्हा नंदा गाय म्हणाली, बाळा माझा मृत्यू ही नियत आहे. तू तिकडे येऊ नकोस. नियतीने ज्यांच्या नशिबामध्ये मृत्यू लिहिला आहे फक्त त्याचाच मृत्यू होत असतो.

तुझ्यासाठी माझा हा अंतिम संदेश आहे. माझे हे वचन तू नेहमी लक्षात ठेव. पाण्याशेजारी किंवा जंगलामध्ये निष्काळजीपणे कधीच फिरू नकोस. लोभापाई असं गवत खाण्यासाठी जाऊ नकोस. जे गवत एखाद्या दुर्गम ठिकाणी उगवलेला आहे. कारण लोभ केल्यामुळे सर्व काही नाश होत असते. लोभामुळे विद्वान पुरुषसुद्धा भयंकर मोठे पाप करून बसतात. आणि त्याचबरोबर प्रत्येकावर विश्वास कधीच करू नकोस. लोभ, निष्काळजीपणा आणि प्रत्येकावर विश्वास ठेवणे या तीन कारणांमुळे प्राण्यांचा विनाश होत असतो.

या तीन दोषांचा त्याग करणे उचित आहे. बाळा ज्याने विश्वास तोडला त्याच्या वर पुन्हा कधीच विश्वास करू नये. आणि त्याच्यावर डोळे बंद करून कधीही भरोसा ठेवू नये. कारण दुसर्यां वर विश्वास ठेवल्याने भीती निर्माण होते. आणि विश्वास ठेवणाराच नष्ट होत असतो. दुसर्यांचेच काय तर कधी स्वतःच्या शरीरावरसुद्धा विश्वास ठेवू नकोस. हे शरीर कधी साथ सोडून जाईल, याचासुद्धा काहीच भरोसा नाही. तू धर्माचे चिंतन करत राहा. माझ्या मृत्युमुळे तू घाबरू नकोस. कारण एक ना एक दिवस सर्वांचा मृत्यू होणारच आहे. बाळा तू दुख सोडून माझ्या या वचनाचे पालन कर. इतकं म्हटल्यानंतर नंदा गाय तिच्या वासराचे मस्तक चाटू लागली.

आणि अत्यंत शोकाकुल होऊन ती रडू लागली. त्यानंतर तिने डोळे भरून तिच्या पुत्राला पाहिलं. व त्यानंतर ती तिच्या मैत्रिणीजवळ गेली. आणि त्यांना सर्व हकीकत सांगितली. नंदा म्हणू लागली, हे सखींनो मी कळत नकळत जर तुमच्यासोबत एखादी अप्रिय गोष्ट बोलली असेल. किंवा कोणता अपराध केला असेल. तर त्यासाठी मला तुम्ही क्षमा करा. मी गेल्यानंतर माझ्या वासरावर नेहमी तुम्ही क्षमाभाव ठेवा. माझे वासरू अनाथ आणि व्याकूळ आहे. त्याची तुम्ही रक्षा करा. मी त्याला तुमच्याकडे सोपवून जात आहे. स्वतःच्या पुत्राप्रमाणे तुम्ही त्याचे पोषण करा. नंदाचे बोलणे ऐकल्यानंतर तिच्या मैत्रिणीना खूप जास्त दुख झालं. सर्व मैत्रिणी आश्चर्यामध्ये तिला विचारू लागल्या.

खूपच आश्चर्याची गोष्ट आहे. तू तुझ्या प्राणाची आहुती देण्यासाठी पुन्हा त्या वाघाजवळ चालली आहेस. स्वतःचे प्राण वाचवण्यासाठी शपथ आणि सत्य यांचा त्याग करायला पाहिजे. आणि शत्रूला धोका द्यायला पाहिजे. नंदाच्या सखी म्हणाल्या, हे नंदा तूझ्या वासराला सोडून तिकडे जाऊ नकोस. सत्याच्या लोभापायी त्या वाघाजवळ चालली आहेस, हा तू अधर्म करत आहेस. या विषयामध्ये धर्मवादी ऋषी मुनी म्हटले आहे.

की प्राणावर संकट आल्यावर वचनांचे पालन जरी नाही केले, तरीसुद्धा पाप लागत नाही. जर खोटे बोलल्यामुळे प्राणांचे रक्षण होत असतील. तर ते अधर्म नाही. त्याला धर्माचें म्हटले गेले आहे. तेव्हा नंदा म्हणते हे सखींनो, दुसर्यांचे प्राण वाचवण्यासाठी मी खोटे बोलू शकते.

परंतु स्वतःचे प्राण वाचवण्यासाठी मी खोटे बोलू शकत नाही. हे तर आधर्म आहे, आणि म्हणूनच मी नेहमी सत्यच बोलणार. सत्यच या संसारामध्ये टिकून राहत असते. सत्यामुळे समुद्र त्याच्या मर्यादेचे उल्लंघन करत नाही. स्वर्ग धर्म त्याचबरोबर मोक्ष सर्व सत्याच्या मार्गावर चालत असतात. सत्याच्या मार्गावर चालण्यामुळे मनुष्याला मोक्ष प्राप्त होऊ शकतो. जो त्याचे वचन तोडत असतो, तो त्याचे सर्व पुण्य कर्म नष्ट करत असतो.

सत्य एक तीर्थ समान आहे, जो त्या तीर्थामध्ये स्नान करतो, असा मनुष्य सर्व पापांपासून मुक्त होत असतो. एक हजार अश्वमेघ यज्ञ आणि सत्यवचन या दोन गोष्टी जर तराजूमध्ये ठेवल्या. तर सत्य वचनही बाजू नेहमी जड असेल.

सत्य हे उत्तम तप आहे. सत्यही उत्कृष्ट शास्त्र ज्ञान आहे. कितीही कठीण परिस्थिती निर्माण झाली, तरीसुद्धा सत्यवचनाचे नेहमी पालन करायला हवे. सत्य उच्चारण केल्यामुळे मोठमोठी पापे सुद्धा स्वर्गामध्ये जात असतात. आणि म्हणूनच मी सत्याचा त्याग कधीच करणार नाही. नंदाच असे बोलणे ऐकल्यानंतर तिच्या सखी म्हणू लागल्या. हे नंदा तू या जगतामधील संपूर्ण देवता आणि दैत्यद्वारा नमस्कार करणे योग्य आहेस. कारण तू सत्याचा आश्रय घेऊन स्वतःचे प्राण त्याग करण्यासाठीसुद्धा तयार आहेस. ज्या गोष्टींचा त्याग करणे खूप कठीण गोष्ट आहे. हे कल्याणी, या विषयामध्ये आम्ही तुझी बरोबरी करू शकत नाही.

तू तर धर्मासाठी खूप मोठा त्याग करत आहेस. आणि आम्हाला विश्वास आहे, तूझ्या या महान त्यागामुळे तुझा आणि तुझ्या पुत्राचा वियोग कधीच होणार नाही. कारण ज्या नारीच चित्त कल्याण मार्गामध्ये लागलेल असतं. त्याच्यावर कधीच कोणतीच आपत्ती येत नाही. यमराजसुद्धा अशा प्राण्यांचे प्राण घेऊ शकत नाहीत. त्यानंतर सर्वांना भेटून नंदा गाय समस्त गौ, समुदायाची परिक्रमा पूर्ण करून. सर्व देवतांचा आणि वृक्षांचा निरोप घेऊन जंगलाच्या दिशेने जाते. नंदा त्या ठिकाणावर पोहोचते जिथे भयंकर मोठा वाघ बसला होता.

गाय जेव्हा त्या वाघाजवळ पोहोचली. तेव्हा गाईचे वासरूसुद्धा धावत धावत तिथे येऊन पोहोचले. आणि गाईच्या आणि वाघाच्या मध्ये येऊन उभा राहिले. वासराला पाहून नंदा गाय त्या वाघाला म्हणाली, हे वाघ, मी सत्य आणि धर्माचे पालन करत तुझ्या जवळ आली आहे. आता तू फक्त मला खाऊन तुझी तृप्ती कर.

आणि माझ्या वासराला जीवनदान दे. तेव्हा वाघ म्हणाला, हे गाय तू तर खूप मोठी सत्यवाणी निघालीस. हे कल्याणी जो त्याच्या वचनाचे पालन करत असतो. जो सत्याच्या मार्गावर चालत असतो. त्याच कधीच अमंगल होत नाही. तू इथून जाण्यापूर्वी मला जे वचन दिले होते. ते ऐकून मला खूप आश्चर्य वाटलं होतं.

मी विचार केला होता की, तू पुन्हा परत येणारच नाहीस. तुझ्या सत्याची परीक्षा घेण्यासाठीच मी तुला इथून जाऊ दिलं होतं. अन्यथा माझ्याजवळ आल्यानंतर तू जीवंत जाणं शक्यच नव्हतं. मी तुझ्यामध्ये सत्याची तलाश करत होतो. आणि मला तो सत्यपणा सापडला आहे. आणि तुझ्या ह्या सत्यपणामुळे आज मी तुझे प्राण घेणार नाही.

आजपासून तू माझी बहिण आहेस. आणि हे तुझे वासरू माझा भाचा आहे. हे कल्याणी, तु तूझ्या आचरणातून माझ्यासारख्या महापाप्याला उपदेश दिला आहे. की सत्य मार्गावरच सर्व काही टिकून राहिलेल आहे. सत्याच्या आधारावरच धर्म टिकून राहिला आहे. हे देवी जे पण तुझे दूध पितात ते सर्वजण धन्य आहेत. त्यांनी पुण्य प्राप्त केले आहे. त्यांचे जीवन सफल झाले आहे.

गाई इतक्या सत्यवादी असतात हे पाहून मला माझ्या जीवनाची घृणा वाटत आहे. आता मीसुद्धा असेच कर्म करेन, ज्याद्वारे मी माझ्या या पापापासून सुटका मिळवू शकेल. आता पर्यंत मी हजारो जीवांना मारले आहे, आणि त्यांना खाल्ले आहे. मी महापापी, दुराचारी आणि निर्दयी आहे. माहित नाही मी केलेल्या या पाप कर्मामुळे मला कोणत्या लोकांमध्ये जावं लागणार आहे? हे ताई या वेळेला माझ्या पापांपासून शुद्ध होण्यासाठी मी कोणती तपश्चर्या करायला हवी.

ते मला संक्षिप्तपणे सांग. तेव्हा नंदा गाय म्हणाली? हे वाघ भावा विद्वान पुरुष सत्य युगा मध्ये तापाची खूपच प्रशंसा करतात. त्याचबरोबर त्रेतायुगामध्ये ज्ञानाची आणि द्वापारयुगामध्ये यज्ञाला उत्तम म्हटले गेले आहे.

कलीयुगामध्ये एकमात्र दान हे श्रेष्ठ साधन समजले गेले आहे. सर्व धर्मांमध्ये एकच दान सर्वश्रेष्ठ आहे, आणि ते आहे अभयदान. यापेक्षा मोठे दुसरे कोणतेच दान नाही. जो समस्त प्राण्यांना अभयदान करत असतो, असा मनुष्य सर्व प्रकारच्या भीतीपासून मुक्त होऊन, परम ब्रह्माला प्राप्त होत असतो. अहिंसेसारखे दुसरे कोणतेही दान नाही आणि कोणतीही दुसरी तपश्चर्या नाही. ज्याप्रकारे हत्तीच्या पायाच्या ठशामध्ये सर्व प्राण्यांच्या पायाचे ठसे सामावून जातात. त्याचप्रकारे अहिंसेचा मार्ग स्वीकारल्याने सर्व धर्मांची प्राप्ती होत असते.

पुरुषाने नेहमी त्याच्या पत्नीची रक्षा करावी, जो पुरुष त्याच्या पत्नीला अभयदान करत असतो, त्याची पत्नी सात जन्मांसाठी त्याची होत असते. शरणामध्ये आलेल्या स्त्रीला नेहमी अभयदान करावे. ज्या पुरुषापासून कोणत्याही स्त्रीला भीती वाटत नाही, असा पुरुष तीनही लोकांमध्ये कीर्ती प्राप्त करत असतो. जो पुरुष कधीच कोणत्याही स्त्रीसोबत हिंसा करत नाही. जो सदैव स्त्रियांची रक्षा करत असतो. अशा पुरुषाला विष्णु लोकांची प्राप्ती होत असते. स्त्रीचा वध करणार्या पुरुषाला कुंभी पाक नावाच्या नरकामध्ये टाकले जाते.

आणि म्हणूनच पुरुषांचे हे कर्तव्य आहे की, त्याने त्याच्या पत्नीची नेहमी रक्षा करावी. तिला नेहमी अभयदान करावे. ज्या व्यक्तीपासून सर्वांना भीती वाटत असते. जो व्यक्ती दुसरर्या मध्ये भीती निर्माण करत असतो. जो दुसरासोबत हिंसा करत असतो, असा व्यक्ती सर्वात मोठा पापी आहे. आणि जो सर्वांवर प्रेम करत असतो, सर्वांवर दया करत असतो. जो सर्वांना अभयदान करत असतो. असा व्यक्ती तिन्ही लोकांमध्ये कीर्ती प्राप्त करत असतो.

आणि हेच परमकल्याणाचे साधन आहे. ज्याला मी संक्षिप्त स्वरूपात तुला सांगितल आहे. त्यानंतर तो वाघ म्हणाला. हे देवी पूर्व काळामध्ये मी एक राजा होतो, परंतु एका हरणाच्या शापामुळे मी वाघ बनलो आहे. तेव्हापासून मी निरंतर प्राण्यांचे वध करत आहे.

ज्यामुळे मी सर्व काही विसरून गेलो आहे. यावेळेला तुझ्या सहवासामुळे, आणि तुझ्या उपदेशामुळे मला पुन्हा सर्व काही स्मरण झाले आहे. हे देवी आता मी तुला एक प्रश्न विचारू इच्छित आहे. तुझं नाव काय आहे? तेव्हा ती गाय म्हणाली, माझ्या स्वामीचे नाव नंदा आहे आणि त्यांनीच माझं नाव नंदा ठेवले आहे. जेव्हा नंदा हा शब्द त्या वाघाच्या कानावर पडला. तेव्हा तो वाघ म्हणजेच, राजा चंद्रसेन ताबडतोब त्या शापापासून मुक्त झाला.

आणि तो वाघाचे रूप सोडून, पुन्हा त्याच्या मूळ रूपात परत आला. त्यानंतर त्या वेळेला त्या क्षणाला नंदा मातेचं दर्शन करण्यासाठी, साक्षात धर्म राज त्या ठिकाणावर आले. आणि म्हणू लागले, हे नंदा माते, मी धर्म आहे. तुझ्या सत्यवानीमुळे मी आकर्षित झालो आहे.

आणि इथे आलो आहे. तु माझ्याकडे कोणताही एक वर माग, मी तुझा तो वर नक्की पूर्ण करेल. धर्मराजाचं बोलणं ऐकल्यानंतर, नंदा मातेने वर मागितला. हे धर्मराज, तुमच्या आशीर्वादा मुळे मी माझ्या पुत्रासहित उत्तम स्थानाला प्राप्त होऊन जाईल. या स्थानावर आता जी सरस्वती नदी आहे. ती माझ्या नावाने प्रसिद्ध व्हावी. आणि तिचे नाव नंदा पडावे, या ठिकाणावर धर्म प्रदान करणारे शुभतिर्थ बनावे. अशा प्रकारे वर मागितल्यानंतर, धर्मराजा तथास्तु म्हटला. आणि तिथून अदृश्य झाला. नंदा तिच्या वासरासहित उत्तम लोकांना निघून गेली.

तात्पर्य

तर मित्रानो, अशाप्रकारे या कथेमार्फत आपल्याला हे समजू शकते की, सर्वात मोठे दान हे अभयदान आहे. कधीही तुमच्या माता पिता यांच्यासोबत हिंसा करू नये. सर्वांसोबत नेहमी प्रेमपूर्वक रहावे. या जगामधील सर्व प्राण्यांना अभय दान करावे. मला आशा आहे, या कथे मार्फत सांगितलेली माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल. भेटू या पुढच्या अशाच एका ज्ञानवर्धक, मनोरंजक मराठी बोधकथा मध्ये एका नवीन कथेसह. तोपर्यंत तुम्हां सर्वांचे मनःपूर्वक आभार

” श्री स्वामी समर्थ, जय श्री कृष्ण, जय श्रीराम, जय श्री हनुमान “

Leave a Comment