मराठी बोधकथा – मुलगी वडिलांच्या घरात राहून जे पाप करते, त्याचे फळ आई-वडिलांना भोगावे लागते

मित्रांनो, भगवान शिव म्हणतात. मुलगी तिच्या वडिलांच्या घरात राहून जे पाप करत असते, त्या पापाचे फळ आई-वडिलांना सुद्धा भोगावे लागत असते. कसे आई वडिलांना याची फळे भोगावी लागतात ते आपण एका मराठी बोधकथा मार्फत समजून घेणार आहोत तरीही मराठी कथा, मराठी लेख शेवटपर्यंत वाचा.

मराठी बोधकथा

मराठी बोधकथा

मित्रांनो, एका दिवसाची गोष्ट आहे जेव्हा माता पार्वती पृथ्वीवर भ्रमण करून भगवान भोलेनाथान कडे येते. आणि भगवान भोलेनाथ यांना म्हणते, हे परम परमेश्वर देवांचे देव. आज जेव्हा मी पृथ्वी लोकावर भ्रमण करत होते, तेव्हा मी पाहिलं की, काही मुली त्यांच्या वडिलांच्या घरी गरजेपेक्षा जास्त काळ राहतात. परंतु पूर्वी तर मुलींची लग्न खूप कमी वयात केले जात होते. आणि त्याच वयात त्या त्यांच्या नवर्याच्या घरी राहण्यासाठी जात असत.

त्याच बरोबर मी एक विचित्र घटना सुद्धा पाहिली आहे. खूप सार्या मुली लग्नानंतर सुद्धा वडीलांच्या घरी सारखे राहायला जातात. हे प्राण नाथ, मला हे जाणून घ्यायचे आहे की, एका कुमारिका मुलीने वडिलांच्या घरी जास्त काळ राहणे योग्य आहे की नाही. कोणत्या वयामध्ये मुलीचे लग्न करणे योग्य आहे. आणि लग्न झाल्यानंतर वडिलांच्या घरी राहिल्याने कोणते पाप लागते. हे स्वामी, तुम्हीच या जगाचे सत्य आहात, आणि सत्यच शिव आहे. कृपा करा, आणि माझ्या मनातील हा संभ्रम दूर करा.

तेव्हा भगवान शिव स्मित हास्य देत म्हणतात, हे देवी आज तुम्ही जो प्रश्न केला आहे, तो समस्त मानवजातीच्या कल्याणासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. आज मी तुम्हाला तुमच्या या प्रश्नांची उत्तरे एका कथे मार्फत देणार आहे. ही कथा भगवान श्रीकृष्णांच्या काळातील, द्वापार युगातील आहे. तुम्ही या कथेला लक्ष देऊन ऐका, त्याचबरोबर जो कोणी ही कथा इतरांसोबत शेअर करेल, त्याला माझ्या द्वारे पुण्याची प्राप्ती होणार आहे.

मित्रांनो, तेव्हा देवी पार्वती म्हणते. हे स्वामी, मी या कथेला ध्यानपुर्वाक नक्की ऐकेन. आणि या कथेला इतरांना ऐकायला सुद्धा सांगेन. जे पण ही कथा ऐकतील ते सर्व नवरा-बायको, माझ्या आशीर्वादाने सुखपूर्वक जीवन व्यतीत करतील. कृपा करून तुम्ही ही कथा सांगण्यास आरंभ करा. मित्रानो, भगवान शिव म्हणतात, हे देवी पार्वती, ही द्वापार युगातील घटना आहे. यादुकुल श्रेष्ठ वीर उग्रसेन यांच्या येथे ही घटना घडली होती.

त्याच घटनेचे मी वर्णन करणार आहे. मथुरा नावाच्या नगरीमध्ये उग्रसेन नावाचा यदुवंशी राजा राज्य करत होता. राजा बलाढ्य शूरवीर संपूर्ण धर्माचे पालन करणारा, आणि प्रजेचे रक्षण करणारा अती गुणवान राजा होता. राजा उग्रसेन धर्म पूर्वक राज्याचे संचालन आणि प्रजेचे पालन करत होते. त्याच वेळेला परम पवित्र विदर्भ देशांमध्ये, सत्यकेतू नावाने प्रसिद्ध एक महापराक्रमी राजा होते. त्यांची एक पुत्री होती, तिचे नाव पद्मावती होतं.

ती सत्य धर्माचं पालन करणारी, अतिसुंदर गुणवान आणि चरित्रवान होण्याबरोबरच लक्ष्मी समान होती. मथुरेचा राजा उग्रसेन यांनी त्या सुंदर पद्मावती सोबत लग्न केलं. तिच्या प्रेमाने आणि करुणेने मथुरेचे राजन प्रसन्न झाले. पद्मावती वर ते स्वतःच्या प्राणापेक्षाही अधिक प्रेम करायचे. पद्मावती शिवाय राजा भोजन सुद्धा करत नव्हता. पद्मावती सोबत सुख भोगण्यातच राजाचा वेळ व्यतीत होऊ लागला. मित्रांनो, भगवान शिव म्हणतात.

हे देवी पार्वती, पद्मावती शिवाय राजाला एक क्षण सुद्धा चैन पडत नसे. अशा प्रकारे दिवसा गणिक या दोघा नवरा बायको मध्ये अधिक अधिक प्रेम वाढू लागले. काही दिवसानंतर विदर्भ चा राजा सत्य केतू यांना, त्यांच्या पुत्रीची पद्मावती ची आठवण आली. त्याच बरोबर तिच्या आईला सुद्धा मुलीची खूप जास्त आठवण येत होती. त्यामुळे एके दिवशी मुलीची चौकशी करण्यासाठी राजा सात्यकेतू ने, मथुरेला राजा उग्रसेन यांच्याकडे त्यांचे काही दूत पाठवले.

भगवान शिव म्हणतात, हे देवी पार्वती, दुताने तिकडे जाऊन आदरपूर्वक राजाला म्हटलं. महाराज, विदर्भ चे राजा सत्य केतू यांनी, त्यांची पुत्री पद्मावती यांच्या तब्येतीची चौकशी करण्यासाठी आम्हाला येथे पाठवले आहे. तुम्हाला आमचा प्रणाम, जर तुम्हाला काही हरकत नसेल तर, राजकुमारी यांना आमच्यासोबत विदर्भामध्ये जाण्याची परवानगी द्यावी. राजा सत्यकेतू आणि राणी त्यांच्या पुत्रिला पाहू इच्छित आहेत.

जेव्हा राजा उग्रसेन ने दुतान कडून हा निरोप ऐकला, तेव्हा त्यांना सुद्धा आनंद वाटला. कारण त्यांची सुद्धा अशीच इच्छा होती की, राणी पद्मावती ला आराम करण्यासाठी त्यांच्या वडिलांच्या घरी जायला पाहिजे. तेव्हा त्यांनी प्रेमाखातर त्यांच्या पत्नीला पद्मावती ला विदर्भ राजाकडे पाठवून दिले. पती ने पाठवल्यामुळे राणी पद्मावती खूपच आनंदाने तिच्या माहेरी आली. तिकडे पोहोचल्यावर तिने तिच्या आई-वडिलांच्या चरणांना हात लागून प्रणाम केला.

मुलगी घरी आल्यामुळे राजा ला सुद्धा खूप प्रसन्न वाटले. भगवान शिव म्हणतात, हे देवी पार्वती, माहेरी आल्यावर राणी पद्मावती तिच्या मैत्रिणीसोबत आनंदाने इकडेतिकडे फिरू लागली. जशी ती लग्नापूर्वी इकडे तिकडे मजा मस्करी करत फिरायची, त्याच प्रकारे ती आता सुद्धा इकडे तिकडे फिरू लागली. जंगलामध्ये तलावांमध्ये वनांमध्ये सर्वत्र ती मनसोक्त फिरण्याचा आनंद घेत होती. कारण ती आज लग्नानंतर पहिल्यांदाच घरी आली होती.

ईकडे आल्यानंतर ती पुन्हा स्वतःला कुमारिका समजू लागली. काही दिवस माहेरी राहिल्यानंतर राणी पद्मावती विसरली की, तिचा विवाह झाला आहे. तिच्या वागणुकी मध्ये आता कोणत्या ही प्रकारची, लाज लज्जा या प्रकारचे भाव राहिले नव्हते. मित्रांनो, भगवान शिव म्हणतात, हे देवी पार्वती, एका दिवसाची गोष्ट आहे, राणी पद्मावती तिच्या मैत्रिणीसोबत एका सुंदर पर्वतावर फिरण्यासाठी गेली. तिथे एक रमणीय वन होते, जिथे खूप मोठ्या प्रमाणात केळीची झाडे होती. त्याचबरोबर अनेक प्रकारची फुलांची झाडं सुद्धा होती. तेव्हा पुढे राणीने पाहिले, एका साईडला केळी चे वण आहे.

आणि दुसरीकडे सुंदर फूले आहेत, आणि त्यांच्या मध्यभागी एक सुंदर असा तलाव आहे. एका छोट्या मुली सारखी ती तिच्या मैत्रिणीसोबत तिथे खेळू लागली. त्या सर्व मैत्रिणींना आजूबाजूचे काहीच भान नव्हते. मुक्त होऊन त्या तिथे खेळू बागडू लागल्या. त्यानंतर तलावामध्ये उतरून पाण्यामध्ये खेळण्याचा मनसोक्त आनंद लुटू लागल्या. मित्रांनो त्याच वेळेला राजा कुबेराचा सेवक गोबिल नावाचा एक दैत्य दिव्य विमानात बसून आकाश मार्गाने कुठेतरी चालला होता.

जेव्हा तो आकाश मार्गाने जात होता, तेव्हा त्याच लक्ष तलावामध्ये असणार्या विदर्भ राज्याच्या राजकुमारी पद्मावती वर गेलं. जी तलावामध्ये मनसोक्त आंघोळीचा आनंद घेत होती. गोबील कडे दैवी शक्ती असल्यामुळे त्याने जाणलं होतं की, ही विदर्भ चा राजा सत्य केतू यांची मुलगी आहे, व त्याचबरोबर राजा उग्रसेन यांची पत्नी आहे. तेव्हा तो मनातल्या मनात विचार करू लागला, ही पतीव्रता असल्यामुळे खूपच सुरक्षित आहे. कोणत्याही परपुरुषाला हिला प्राप्त करणे अत्यंत कठीण आहे.

राजा उग्रसेन अत्यंत महामूर्ख आहे. जे त्याने इतक्या सुंदर पत्नीला माहेरी पाठवली आहे. ती पतिव्रता स्त्री पुरुषांसाठी दुर्लभ आहे. परंतु माझ्यातला काम देव मला अत्यंत त्रास देत आहे, असं काय करता येईल जेणेकरून मी या स्त्रीच्या जवळ जाऊ शकतो. आणि तिचा उपभोग घेऊ शकतो. मित्रांनो, भगवान शिव म्हणतात. हे देवी पार्वती, राणी पद्मावतीच्या सौंदर्यावर गोबिल दैत्य मोठ्या प्रमाणात मोहित झाला होता. त्यानंतर थोडा विचार करून त्याला एक कल्पना सुचली.

मित्रांनो, गोबिल ने राजा उग्रसेन चे मायावी रूप धारण केले, सर्व काही अगदी राजासारखा होतं. तेच कपडे, तेच शरीर सर्व काही अगदी सारखाच होतं. संपूर्ण उग्रसेन सारखा झाल्यानंतर गोबिल पर्वताच्या थरावर उतरला, व त्यानंतर तो एका झाडाखाली बसून सुंदर आवाजात गीत गाऊ लागला. ते गीत अत्यंत मधुर होते, अत्यंत मधुर अशा या गीताला मैत्रिणी मध्ये बसलेल्या राणी पद्मावती ने सुद्धा ऐकलं. ती विचार करू लागली इतके मधुर गीत कोण गात आहे.

त्यामुळे राजकुमारीच्या मनामध्ये त्या व्यक्तीला पाहण्याची तीव्र इच्छा झाली. तिने तिच्या मैत्रिणीसोबत जाऊन पाहिल की, एका झाडाखाली एक सुंदर असा प्रतापी व्यक्ती बसून गीत गात आहे. आणि तो महाराज उग्रसेन यांच्या सारखा दिसत आहे. हे देवी पार्वती, परंतु सत्य म्हणजे राजा उग्रसेन यांच्या वेशामध्ये नीच गोबिल दानव होता. पद्मावती विचार करू लागली की, माझे स्वामी मथुरेचे राजन एवढ्या दूर कधी आले, ती हा विचार करतच होती.

तेव्हा त्या दैत्याने स्वतः राणीला आवाज दिला. हे प्रिये, तुझ्या विना मी जगू शकत नाही. हे माझे प्रिय पत्नी, तुझ्या विना जीवन व्यतीत करणे माझ्यासाठी खूप अवघड झाले आहे. तुझ्या प्रेमाची मला खुप आठवण येते, आणि त्यामुळेच मी तुझ्याविना कुठेही राहू शकत नाही. आणि म्हणूनच मी तुला भेटण्यासाठी इकडे आलो आहे. दैत्य गोबिल जो महाराजांच्या वेशात होता. त्याच्या तोंडून असं बोलणं ऐकल्या नंतर राणी पद्मावती थोडी लज्जित झाली.

राजा उग्रसेन जो दैत्य गोबिल होता, ज्याने राजा उग्रसेन यांचे रूप धारण केले होते. तो राणी पद्मावती ला घेऊन एका गुप्त जागेवर निघून गेला. आणि तिकडे जाऊन त्याच्या इच्छेनुसार राणी पद्मावतीचा उपभोग घेतला. मित्रांनो, भगवान शिव म्हणतात. हे देवी पार्वती, महाराज उग्रसेन यांच्या गुप्त स्थानावर काही विशिष्ट निशान होतं. जे त्या पुरुषांमध्ये राणीला दिसलं नाही. या मुळे राणी पद्मावतीच्या मनामध्ये त्याच्या प्रती संदेह निर्माण झाला.

राजकुमारीने तिचे वस्त्र पुन्हा परिधान केले. परंतु तिच्या हृदयामध्ये या घटनेमुळे खूप जास्त दुःख झाले. रागाने राजकुमारी खूपच क्रोधित झाली होती, ती दानव गोबिल ला म्हणाली, हे नीच माणसा, लवकर सांग तू कोण आहेस. तू तर एका दानवा सारखा दिसत आहेस. तू पापाचारी आणि निर्दई आहेस.

हि गोष्ट वाचा – देवी लक्ष्मी म्हणते कोणती गोष्ट बायको नवऱ्याला मागून पण देत नाही

बोलता बोलता राणीच्या डोळ्यातून पाणी येऊ लागले, व ती त्या दनवाला शाप देऊ लागली. राणी म्हणू लागली, हे दुरात्मा तू माझ्या पतीच्या रूपात येऊन माझ्यासोबत छळ केला आहेस. आणि या पतिव्रता शरीराला तू अपवित्र केल आहेस. तू माझ्या पतिव्रता धर्माचा नाश केला आहेस, परंतु आता तुला तुझ्या पापाची शिक्षा मी नक्कीच देणार आहे. मी तुला खूपच कठोर असा शाप देणार आहे. राणीच हे बोलणे ऐकून गोबिल म्हणाला.

हे पतिव्रता स्त्री, भगवान श्रीहरी विष्णू आणि उत्तम ब्राह्मणाच्या भीतीपोटी राक्षस सुद्धा दूर पळत असतात. मी दानधर्म नुसारच या पृथ्वीवर विचरण करत आहे. प्रथम तुम्ही माझ्या द्वेषाचा विचार करा. कोणत्या अपराधावर तुम्ही मला शाप देऊ इच्छित आहात. तेव्हा राणी पद्मावती म्हणाली, हे पापी मी एक साद्वी आणि पतिव्रता स्त्री आहे. माझ्या मनामध्ये पतीशिवाय दुसर्या कोणाचाही विचार नसतो. मी सदैव माझ्या पतीसाठी तपश्चर्या करत असते.

मी माझ्या धर्माच्या मार्गावर होते. परंतु तू तुझ्या मायावी पणामुळे माझ्यासोबत कपट रचून, माझ्या धर्मा सोबत माझा सुद्धा नाश केला आहेस. आणि म्हणूनच हे दृष्ट नीच दानवा, तुला मी भस्म करणार आहे. तेव्हा गोबिल म्हणाला, हे राजकुमारी, जर तुला योग्य वाटत असेल तर माझे म्हणणे लक्षपूर्वक ऐक, मी धर्मा बद्दलच बोलत आहे. जी स्त्री प्रति दिवस मन आणि कामाने तिच्या नवर्या ची सेवा करत असते. जेव्हा नवरा संतुष्ट असतो, तेव्हा स्वतः सुद्धा संतुष्टी चा अनुभव घेत असते. जेव्हा नवरा क्रोधित असतो तेव्हा सुद्धा त्याला ती कधीच सोडत नाही.

नवर्याच्या दोषांकडे गुणांकडे कधीच ती स्त्री लक्ष देत नाही. आणि नवर्या च्या सर्व कामांमध्येे ती नेहमी पुढे असते. अशी स्त्री नेहमी पतिव्रता समजली गेली आहे. जर स्त्रि पृथ्वी लोकावर तिचे कल्याण करू इच्छित असेल, तर ती आपल्या पतीत रोगी, अंग हिन, कोडी त्याचबरोबर पापी नवर्याचा सुद्धा तिने त्याग करू नये. जी स्त्री नवर्याला सोडून जाते, आणि दुसर्या

या मराठी बोधकथा चा व्हिडिओ पहा

Video Credit by – स्वामींचे बोल

कामांमध्ये तिच मन लागत असते. ती ह्या संसारांमध्ये सर्व धर्माने बहिष्कृत आणि व्याभी चारी समजली जाते. जी पतीच्या अनुपस्थितीमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या व्यंजनांचा आस्वाद घेत असते. त्याचबरोबर शृंगार करत असते, त्या स्त्रीला कुल्टा स्त्री म्हटले जाते. मित्रांनो, भगवान शिव म्हणतात. हे देवी पार्वती, गोबिल पुढे म्हणतो. मला वेदा द्वारे, शास्त्राद्वारे आणि गुरुद्वारे धर्माचे ज्ञान प्राप्त आहे.

गृहस्थ धर्माचा परित्याग करून पतीची सेवा करणे सोडून, तू इथे कशासाठी आली आहेस. इतकं होऊन सुद्धा तू स्वतःच्या तोंडाने म्हणत आहेस, मी पतिव्रता आहे. तुझी कर्म पाहून तर तुझ्या मध्ये पतिव्रतेचा थोडासुद्धा अंश दिसत नाही. तू सर्व लाज लज्जा सोडून पर्वत आणि शिखरांवर मनसोक्त फिरण्याचा आनंद घेत आहेस. आणि म्हणूनच तू एक पापिनी आहेस. मी तुला हा महान दंड देऊन तुला योग्य मार्गावर लावले आहे.

आता यापुढे कधीही तू अशा प्रकारचे पाप करणार नाहीस. मला सांग नवर्याला सोडून तू इकडे कशासाठी आली आहेस. हा शृंगार हे आभूषण, सुंदर वेशभूषा धारण करून, तू इकडे कशासाठी आली आहेस. हे पापीनी मला सांग कशासाठी तू हे सर्व केले आहेस. कुठे आहे तुझा पतिव्रता धर्म, तुला पाहून तर तू एक व्याभिचारी स्त्री आहेस, हेच मला दिसत आहे. तू आता तुझ्या नवर्या पासून कैक मैल दूर आहेस, कुठे आहे तुझ्या मध्ये पतीला देवता मानण्याचा भाव.

तुला लाज वाटत नाही का? मला माझ्या वागण्यावर घृणा वाटत आहे. तू माझ्यासमोर बोलण्याची हिम्मतच कशी केलीस. कुठे आहे तुझ्या तपस्येचा प्रभाव? कुठे आहे तुझ तेज आणि बळ? आज तू मला तुझ बळ आणि पराक्रम दाखव. तेव्हा पद्मावती म्हणाली, हे नीच असुरा ऐक, माझ्या वडिलांनी प्रेमाने मला माहेरी बोलावले आहे. मग यामध्ये पाप कोणत आहे. मी काम, लोभ तथा भीतीपोटी नवर्या ला सोडून आली नाही.

मी ईथे सुद्धा सतत माझ्या नवर्या चा जप करत असते. तू तुझ्या मायेने माझ्या नवर्याचे रूप धारण करून मला फसवले आहेस. तेव्हा गोबिल म्हणाला, पद्मावती माझ म्हणणं ऐक, जस आंधळ्या मनुष्यांला काहीच दिसत नाही, तशी तू धर्म रुपी नेत्राने आंधळी आहेस. मग तू मला कसं ओळखू शकतेस. तुला हे समजायला हवं होतं की, तुझा नवरा इतके लांब कधीच येऊ शकत नाही. आणि इतक असून सुद्धा, तू माझ्या सोबत आलीस.

ज्या वेळेला तुझ्या मनामध्ये वडिलांच्या घरी येण्याचा विचार आला, त्याच वेळेला तू पतीची भावना सोडून त्यांच्या ध्याना पासून मुक्त झाली होतीस. पतीचा निरंतर चिंतन करणे हाच नारीचा धर्म आहे. जर तोच नष्ट झाला असेल, मग तू स्वतःला पतिव्रता का म्हणतेस. मित्रांनो, भगवान शिव म्हणतात. हे देवी पार्वती, गोबिल च बोलणे ऐकून राजकुमारी पद्मावती जमिनीवर बसली. तिला आता खूप दुःख होत होतं.

गोबिल पुन्हा म्हणाला, हे स्त्री, मी तुझ्या उदरामध्ये माझा अंश दिला आहे. त्यापासून तिन्ही लोकांना त्रास देणार्या पुत्राची प्राप्ती होणार आहे. मित्रांनो, भगवान शिव म्हणतात. हे देवी पार्वती, त्यानंतर तो दानव तिथून निघून गेला. गोबिल एक ज्ञाणी दानव होता, परंतु तो खूपच दुराचारी आणि पापी होता. गोबिल गेल्यानंतर पद्मावती अत्यंत दुःखी झाली, व ती रडू लागली. रडण्याचा आवाज ऐकून मैत्रिणी तिच्या जवळ आल्या, आणि विचारू लागल्या, राजकुमारी तुम्ही रडत का आहात.

मथुरेचे राजा उग्रसेन कुठे गेले? राणी पद्मावती ने अत्यंत दुखी भावनेने तिचा कशा प्रकारे छळ झाला, कशी फसवणूक झाली. हा सर्व प्रकार तिने तिच्या मैत्रिणींना सांगितला, त्यानंतर सर्व मैत्रिणी राणी पद्मावती ला तिच्या वडिलांच्या घरी घेऊन गेल्या. तेव्हा राणी पद्मावती भीतीने थरथरत होती. मैत्रिणींनी पद्मावतीच्या आईला सर्व घटना सांगितली. घटना ऐकल्या नंतर महाराणी पतीच्या महिलांमध्ये गेली, व नवर्या ला सर्व काही सांगितलं.

ही सर्व घटना ऐकल्या नंतर महाराज सत्य केतू यांना सुद्धा खूप जास्त दुःख झाले. राजा सत्य केतूने ताबडतोब व्यवस्था करून, राणी पद्मावती ला मथुरेचे राजा उग्रसेन यांच्याकडे पाठवून दिले. राणी पद्मावती ला आलेले पाहून, राजा उग्रसेन खूप जास्त आनंदित झाला. राणीला सारखं म्हणू लागला, हे प्रिये, मी तुझ्याविना जीवन व्यतीत करू शकलो नसतो. तू हे खूप चांगलं केलेस जी लवकरच परत आलीस.

हे राणी तू तुझ्या गुणांमुळे, पतिव्रता धर्मामुळे मला खूप जास्त आवडतेस पद्मावती सोबत असं बोलल्या नंतर, राजा पुन्हा तिच्या सोबत सुख भोगु लागला. काही दिवसानंतर राणी पद्मावतीचा गर्भ वाढू लागला. परंतु त्या गर्भाच कारण फक्त पद्मावती ला माहित होत. तिच्या गर्भा मुळे राणी पद्मावती ला दिवस-रात्र चिंता सतावत असायची. दहा वर्ष तो गर्भ वाढतच गेला, त्यानंतर त्या गर्भातून बाळ जन्माला आले.

त्या गर्भातून अती तेजस्वी, महाबळी, दुराचारी प्रजेला कष्ट देणार्या कंसाचा जन्म झाला होता. त्याच्या भीतीने तिन्ही लोकांचे निवासी थरथर कापायचे, त्यानंतर भगवान श्रीकृष्णाच्या हाताने मारले गेल्याने, त्याला मोक्षाची प्राप्ती झाली. तेव्हा देवी पार्वती म्हणते, स्वामी अशा घटना भविष्यामध्ये घडणार आहेत, हे मी सुद्धा ऐकल आहे. हे देवी, मी तुला जे काही सांगितले आहे, ते समस्थ पुराणांमधील मत आहे. अशाप्रकारे वडिलांच्या घरात राहणारी कन्या ही बिघडत असते.

त्यामुळेच वडीलांनी कधीही मुलीला घरात ठेवण्याचा मोह करू नये. भगवान शिव म्हणतात, हे देवी, आता मी तुम्हाला एका कुमारिका कन्येच्या बाबतीत काही महत्त्वपूर्ण गोष्टी सांगत आहे. तुम्ही या गोष्टीसुद्धा लक्षपूर्वक ऐका. जेव्हा कोणतीही कन्या शहाणी होते, जेंव्हा ती विवाह योग्य बनते. तेव्हा आई-वडिलांचे हे कर्तव्य आहे की, त्यांनी योग्य वराची निवड करून, कन्येचा विवाह करावा. तिला कधीच जास्त काळापर्यंत घरामध्ये ठेवू नये.

नवर्या च्या घरामध्ये तिचे पालन पोषण होणे उचित आहे. तिकडे राहून ती भक्तिपूर्वक उत्तम गुण शिकत असते. आणि नवर्याची सेवा करत असते. त्यामुळेच कुळाची कीर्ति वाढत असते, आणि वडील सुद्धा सुख पूर्व जीवन व्यतीत करत असतात. सासरी राहून जर ती पाप करत असेल, तर त्याचे फळ नवर्या ला भोगावे लागतात. जर ती सासरी पुण्य कर्म करत असेल, तर त्याचं फळ सुद्धा नवर्या ला मिळत असतात. व नवर्याची दिवसागणिक प्रगती होत असते.

कन्येच्या उत्तम गुणामुळे वडिलांची कीर्ती वाढत असते. आणि दोन्ही कुळांचे पितृगण संतुष्ट होऊन, शुभ आशीर्वाद देतात. त्याच बरोबर कधीही वडिलांनी कन्येला जावया सोबत घरी ठेवू नये. असे केल्यामुळे, जावयाचा मानसन्मान काही दिवसानंतर कमी होऊ लागतो, आणि या गोष्टीचे जावयाला सुद्धा पाप लागते. जेव्हा मुलगी विवाहयोग्य बनते, तेव्हा परलोक तिच्यावर वाईट नजर टाकू लागतात. अशा मध्ये जर तिने परपुरुषासोबत प्रेमसंबंध बनवले, तर हे खूप मोठे पाप असते.

एक तरुण मुलगी वडिलांच्या घरी राहणे म्हणजे, खजिन्याने भरलेली पेटी चोरांच्या मध्ये ठेवणे हेच आहे. स्त्रीचा खरा दागिना आणि वडिलांचा सन्मान हे त्या मुलीची इज्जत हेच असते. जी तिने नेहमी सांभाळून ठेवायला हवी. कुठल्याही स्त्रीने तिच्या नवर्या पासून कधीच दूर राहू नये. जास्त काळापर्यंत माहेरी राहणे सुद्धा पापच आहे. एका पतिव्रता स्त्रीचं खरं स्थान, तिच्या नवर्याच्या चरणांमध्ये आहे. त्याचबरोबर पतीसाठी त्याच्या पत्नीचे स्थान हे नेहमी हृदयामध्ये असतं.

तात्पर्य

मित्रानो, भगवान शिव म्हणतात, हे देवी पार्वती, आता मी तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे बोधकथा मार्फत दिली आहेत. तेव्हा माता पार्वती म्हणते. हे प्रभु, आज मी धन्य झाले आहे. तुम्ही सांगितलेल्या मराठी कथा मुळे माझ्या मनाची पूर्णपणे संतुष्टी झाली आहे.

आणि मला आशा आहे, ही मराठी बोधकथा ह्या पृथ्वीलोकावर जो कोणी मनुष्य ऐकत असेल. त्याचे सुद्धा जीवन आनंदाने भरून जाईल. भेटुयात पुढच्या अशाच एका ज्ञानवर्धक कथे मध्ये, एका नवीन बोधकथे सह. तोपर्यंत तुम्हा सर्वांचे मनःपूर्वक आभार.

श्री स्वामी समर्थ, जय श्रीराम, जय श्री हनुमान, जय श्री कृष्ण, जय माता लक्ष्मी….

Leave a Comment