मित्रांनो, एका राजकुमारीने सांगितलं की, जो पुरुष त्याच्या पत्नीसोबत हे आठ गोष्टी करत असतो. त्याची बायको नेहमी आनंदी राहते. कोणत्या आठ गोष्टी कराव्यात त्यासाठी आमची ही मराठी पौराणिक कथा, धार्मिक कथा शेवट पर्यंत वाचा.

मित्रांनो, मध्य देशाच्या राजाचं नाव होतं चंद्रसेन. त्याची खूपच सुंदर कन्या होती, जिचं नाव कलावती होतं. कलावती रूपाने बुद्धीने खूपच वरचढ होती. हळूहळू राजकुमारी जेव्हा विवाहयोग्य झाली. तेव्हा राजाने त्याच्या मुलीला विचारलं, मी तुझ्यासाठी एका स्वयंवराची व्यवस्था करत आहे.
मराठी पौराणिक कथा
मला सांग तू तुझ्या होणाऱ्या नवर्यामध्ये, कोणकोणते गुण पाहू इच्छित आहेस. तुझा नवरा कसा असावा? हे मला सांग. मग मी तू सांगितलेले ध्यानात ठेवून, तुझ्या स्वयंवराची व्यवस्था करेल. तेव्हा राजकुमारी कलावती म्हणू लागली. बाबा ज्याला मी माझ्या नवऱ्याच्या स्वरूपात स्वीकारेल. तो एक विशेष व्यक्ती असायला हवा.
जो सर्वोत्तम असायला हवा. तेव्हा राजा म्हणाला. पोरी, कोणता राजकुमार सर्वोत्तम आहे. हे आपल्याला कसे कळेल. तेव्हा राजकुमारी म्हणते, बाबा, आपण राजकुमारांमध्ये स्पर्धा ठेवल्यास. आपल्याला त्यांच्या मधील सर्व गुणांची ओळख होऊ शकेल. आपण आपल्या इथे वेगवेगळ्या प्रकारच्या स्पर्धा ठेवायला हव्यात. जो राजकुमार सर्व स्पर्धांमध्ये अव्वल असेल. त्यालाच मी माझा पती म्हणून स्वीकार करेल. मित्रांनो, मुलीच्या बोलण्यानुसार राजाने त्याच्या इथे वेगवेगळ्या स्पर्धांचे आयोजन केले.
जसं की, धनुर्विद्या, गायन, नृत्य कला व शास्त्रांचे ज्ञान. राजाने या सर्व स्पर्धांचे काम त्याच्या मंत्र्याच्या मुलाला. म्हणजेच महेश ला दिले. महेश हा राजाच्या मंत्र्याचा मुलगा होता. लहानपणापासूनच महेश आणि राजकुमारी एकत्रच खेळून मोठे झाले होते. महेश मनातल्या मनात राजकुमारीवर प्रेम करत होता. परंतु त्याने त्याच्या मनातील ही गोष्ट राजकुमारी कलावती हिला कधीच सांगितली नाही. कारण त्याला माहीत होतं.
राजकुमारी कलावती ही आमच्या राजाची मुलगी आहे. आणि मी एका मंत्राचा मुलगा आहे. राजा साहेब त्यांच्या मुलीचे लग्न माझ्यासोबत करण्यासाठी कधीच तयार होणार नाहीत. राजा त्यांच्या मुलीचा विवाह एखाद्या राजाच्या मुलासोबतच करतील. आणि हाच विचार करून महेशने त्याच्या मनातील गोष्ट कधीच बाहेर येऊ दिली नाही. महेशला राजाने जो काम दिले होते. तो ते काम पूर्ण निष्ठेने करत होता. त्याने सर्व प्रकारच्या स्पर्धांची व्यवस्था केली.
एके ठिकाणी तिरंदाजीसाठी मैदान तयार केले. एका ठिकाणी नृत्य शाळा बनवण्यात आली. एका ठिकाणी गायन विद्याचे सामान ठेवण्यात आले. एका ठिकाणी शास्त्राच्या ज्ञानाची व्यवस्था करण्यात आली. तर एका ठिकाणी सौंदर्याचे प्रदर्शन करण्याची व्यवस्था करण्यात आली. आता दुर दुरून राजा महाराजा आणि राजकुमार त्या स्पर्धांमध्ये भाग घेण्यासाठी येऊ लागले. सर्व राज्यांनी राजकुमाराने त्या स्पर्धांमध्ये भाग घेतले. अनेक दिवस हा कार्यक्रम चालूच राहिला. परंतु कुठलाही राजा असा निघाला नाही. जो सर्व स्पर्धांमध्ये निपुण असेल.
कोणाला धनुर्विद्या अवगत होती तर कोणाला दुसरी कोणती तरी. म्हणण्याचा तात्पर्य हे की, असा कुठलाही राजा किंवा राजकुमार नव्हता. जो सर्व गुणांमध्ये निपुण असेल पारंगत असेल. शेवटी निष्कर्ष काढण्यात आला की, जो राजा कुठल्या तरी गुणांमध्ये पारंगत असेल त्याला थांबवण्यात यावं. आणि बाकीच्यांना परत पाठवण्यात यावे. मित्रांनो, तेव्हा असेच झाले सर्व स्पर्धांमधील जो जो राजा किंवा राजकुमार ज्या स्पर्धेमध्ये पारंगत होता. त्याला थांबवण्यात आले. तेव्हा राजा त्याच्या मुलीला म्हणाला, पोरी, कुठल्याही एका राजकुमारामध्ये सर्व गुण नाहीत.
एका राजकुमारामध्ये एक गुण आहे. तर दुसऱ्या मध्ये दोन आहेत. आणि म्हणूनच आम्ही हा निर्णय घेतला आहे की, वेगवेगळ्या गुणांमध्ये पारंगत असणाऱ्या या राजकुमारांमधूनच, तुम्हाला सर्वोत्तम वर निवडावा लागेल. तेव्हा राजकुमारी म्हणू लागली, बाबा, हे सर्व राजकुमार तर एका एका गुणांमध्ये श्रेष्ठ आहेत. मग यामध्ये मी माझ्यासाठी सर्वोत्तम वर कसा निवडू शकेल. तेव्हा राजा म्हणतो, पोरी.
आणखी धार्मिक कथा, मराठी गोष्टी वाचा
- स्वतःला बदलायचे असेल तर स्वामींची हि गोष्ट वाचा
- कोणती गोष्ट बायको नवऱ्याला मागून पण देत नाही
- देवाने स्त्रीला बनवताना तिच्यात कोणती कमतरता सोडली
- पालकांनी या तीन चुका केल्या नाही, तर त्यांची मुलगी बिघडणार नाही
आपण या सर्व राजकुमारांना काही दिवसांसाठी आपल्या इथे थांबून ठेवू. यामधील तुला जो राजकुमार सर्वश्रेष्ठ वाटेल. तू त्याची निवड कर. आणि मला सांग, मी त्या राजकुमारासोबत तुझा विवाह संपन्न करेल. मित्रांनो, अशा प्रकारे वेगवेगळ्या गुणांमध्ये पारंगत असणाऱ्या त्या राजकुमारांना, राजा चंद्रसेन ने त्यांच्याजवळ थांबवून ठेवले. ते सर्व राजकुमार स्वतःला सर्वश्रेष्ठ सिद्ध करण्यासाठी त्यांच्या परीने, जे काही शक्य होईल ते सर्व प्रयत्न करू लागले.
एखादा राजकुमार गायन विद्ये मध्ये सर्वश्रेष्ठ होता. तेव्हा तो सकाळ सकाळी जेव्हा राजकुमारी उठून यायची, तेव्हा तो त्याची धून वाजू लागायचा. तर दुसरीकडे सुंदर राजकुमार त्याच्या सौंदर्याने राजकुमारीला मोहित करण्याचा प्रयत्न करायचा. ज्ञानी राजकुमार त्याच्या ज्ञानाने राजकुमारीला आकर्षित करण्याचा प्रयत्न करायचा. तलवारीमध्ये, धनुष्यबाणामध्ये तरबेज असणारे राजकुमार, त्यांची त्यांची कला दाखवून राजकुमारीचे मन जिंकण्याचे प्रयत्न करत होते. राजकुमारी झोपण्यासाठी जात होती.
तेव्हा नृत्य कलेमध्ये सर्वश्रेष्ठ राजकुमार राजकुमारीला नृत्य शाळेमध्ये बोलवत असे. आणि राजकुमारीचे खूप मनोरंजन करायचा. एखादा राजकुमार राजकुमारीला हसवण्याचा प्रयत्न करायचा. तर दुसरा आणखी काही करायचा. अशा प्रकारे तिथे थांबलेले सर्व राजकुमार त्यांच्या त्यांच्या परीने शक्य होईल. तसे राजकुमारी समोर त्यांच्या गुणांचे प्रदर्शन करायचे. अनेक दिवसांपर्यंत असेच चालू राहिले. जसं जसं राजकुमारी त्या सर्व राजकुमारांसोबत तिचा वेळ व्यतीत करत होती. तसं तसं तिच्या मनामध्ये गोंधळ वाढू लागला होता.
तिच्या मनामध्ये प्रश्न पडला होता की, मी आता कोणासोबत लग्न करू? तिच्या मनातील दुविधा घेऊन राजकुमारी मंत्र्याच्या मुला जवळ महेश जवळ गेली. आणि जाऊन त्याला सांगितलं कि, ती एका अशा भोवऱ्यामध्ये अडकली आहे की, तिथून दूरवर कुठेही तिला किनारा दिसतच नाही. मला हे ठरवण्यात खूपच अडचण होत आहे की, मी माझ्या वराच्या स्वरूपात कोणाला निवडावे. राजकुमारी महेश ला म्हणाली, तू माझी काहीतरी मदत कर.
तेव्हा महेश म्हणाला. राजकुमारी या कामांमध्ये मी तुझी कोणतीच मदत करू शकत नाही. तुमचं जीवन आणि तुमची पसंत मग निर्णय सुद्धा तुम्हालाच घ्यावा लागेल. कारण लग्नानंतर राजकुमारासोबत तुम्हालाच राहायचं आहे, मला नाही. मी तर फक्त हेच सांगू शकतो की, तू जो काही निर्णय घेशील, तो पूर्ण विचार करून घे. हे आयुष्य पुन्हा पुन्हा मिळत नाही. तेव्हा राजकुमारी म्हणाली, महेश इतके सारे राजकुमार इथे आहेत.
आणि जेव्हा मी त्यांचे गुण पाहते. तेव्हा मी पूर्णपणे गोंधळून जाते. तेव्हा महेश म्हणाला, हे राजकुमारी, मला तुम्ही एक गोष्ट सांगा. विवाह करण्यासाठी तुम्ही कुठल्या व्यक्तीला शोधत आहात. तेव्हा राजकुमारी म्हणाली, ही तर उघड गोष्ट आहे, मी कुठल्यातरी तरुणाला शोधत आहे. जो मला आनंदी ठेवू शकेल. तेव्हा महेश म्हणतो, हे राजकुमारी, जेव्हा तुम्ही चांगल्या व्यक्तीला शोधत आहात. मग तुम्हाला गुणांचे वेड का लागले आहे. तुमच्या या सर्व क्रियेमध्ये तुम्ही स्वतःला विसरत आहात. तुम्हाला हे माहित आहे का की, जो व्यक्ती धनुर्विद्यांमध्ये पारंगत आहे.
तो तुम्हाला आनंदी ठेवण्यास सक्षम असेल. असं होऊ शकत की, त्याला फक्त धनुर्विद्याच माहीत असेल. प्रेम, समर्पण, सामंजस्य आणि सन्मान असे कोणतेही गुण त्याच्यामध्ये नसतील. तुला हे माहित नाही की, सुंदर तरुण उच्च प्रतीचा नर्तक, धनुर्धर, गायक आणि शास्त्रज्ञांना व्यतिरिक्त तुम्हाला एका अशा वराची निवड करायला पाहिजे. जो आयुष्यात येणाऱ्या संकटांसोबत लढण्यास सक्षम असेल.
जो पत्नीचे महत्त्व समजत असेल. जो त्याच्या पत्नीला सन्मान देऊ शकेल. जो वेळ आल्यावर त्याच्या जीवाची बाजी लावून पत्नीचे रक्षण करू शकेल. जो हे समजत असेल की, स्त्री ही फक्त एक विषय वस्तू नाही. स्त्री-पुरुषाची भूक वस्तू नाही. ज्याला या गोष्टीची जाण असेल की, त्याची पत्नी फक्त त्याच्यासाठी तिचे आई-वडील, भाऊ-बहीण यांचा त्याग करून आली आहे. मग तिच्यासोबत कसे वागायला हवे? जो स्त्रीला आयुष्यभर सुखी ठेवण्याचा प्रयत्न करत असेल. ज्याच्या सोबत राहून स्त्रीला सर्व सुख सोयी मिळत असतील. असा वर तुम्ही शोधायला हवा.
असा वर शोधून काय फायदा, जो दिसायला फक्त सुंदर असेल. आणि तो त्याच्या सौंदर्याच्या अभिमाना पुढे पत्नीला महत्त्व देत नसेल. कठीण परिस्थितीमध्ये पाठ दाखवून पळून जाणारा असेल. ज्याच्यामध्ये ज्ञान असेल, परंतु ज्ञानाच्या अहंकाराची नशा त्याला सदैव चढलेली असेल. मला असे वाटते तुम्ही असा एक वर निवडा जो स्त्रीने दिलेले बलिदान तिचे त्याग लक्षात ठेवत असेल. प्रत्येक परिस्थितीमध्ये तो तुमचे रक्षण करत असेल. त्याला या गोष्टीची जाण असेल की, त्याच्या बायकोने दुसऱ्या कुठल्यातरी अनोळखी व्यक्ती सोबत लग्न करून.
जिथे तिने जन्म घेतला होता, ज्या घरातील लहानाची मोठी झाली होती. त्या आई वडिलांचे घर सोडून ती तुमच्या घरी येत आहे. मग ती तुमच्या घरी तुमचा अपमान सहन करण्यासाठी आलेले नाही. ती तुमच्या घराला आनंद देण्यासाठी आलेली आहे. तुम्ही तिला आनंदी ठेवा. मग ती तुम्हाला आनंदी ठेवेल. आणि हाच असतो पती-पत्नी मधील प्रेमाचा खरा अर्थ. मित्रांनो, महेशच हे बोलणं ऐकल्यानंतर राजकुमारी कलावतीचे डोळे पानावले. तिच्या डोळ्यातून अश्रू येऊ लागले. तिला आश्चर्य वाटलं की, तिने याचा कधीच विचार केला नव्हता.
मराठी पौराणिक कथा चा विडिओ पहा
तिला हे कधीच वाटलं नव्हतं की, जी गोष्ट तिला स्वतःला माहित नाही. ती गोष्ट महेशला माहित आहे. राजकुमारी पुढे काही बोलणार, तेवढ्यातच महेश तिथून निघून गेला. महेश चे शब्द राजकुमारीच्या कानामध्ये रात्रभर वाजत राहिले. दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर तिने फिरायला जाण्याचा निश्चय केला. राजकुमारी सर्व राजकुमारांसोबत फिरण्यासाठी जंगलामध्ये गेली. त्यांच्या सुरक्षेसाठी महेश सुद्धा त्यांच्यासोबत गेला. राजकुमारी त्या सर्व राजकुमारांसोबत बोलत बोलत पुढे चालली होती.
बोलण्या बोलण्यातच ते सर्वजण एका घनदाट जंगलामध्ये पोहोचले. त्यांना या गोष्टीच ध्यानच राहिलं नाही की, पुढे घनदाट जंगल आहे. आणि पुढे जंगली प्राण्यांचा धोका असू शकतो. जंगलाला पाहून महेश मध्येच थांबला. आणि म्हणाला, थांबा. आता आपण इथूनच परत जायला पाहिजे. पुढे जाणे खूपच धोकादायक आहे. महेशचे हे बोलणं ऐकल्यानंतर त्या राजकुमारांपैकी एक राजकुमार महेशच्या बोलण्यावर हसत म्हणाला. जर तू इतका भित्रा आहेस, मग आमच्या सोबत कशासाठी आला आहेस. गुपचूप जाऊन तू घरात बस.
तेव्हा दुसरा राजकुमार हसत हसत म्हणाला. अरे, तू घाबरत का आहेस. आम्ही आहोत ना. चला आपण पुढे जाऊया. महेशने त्यांना खूप समजावले. बघा तुमच्या सर्वांच्या सुरक्षेची जबाबदारी माझ्यावर आहे. पुढे घनदाट जंगल आहे. आणि जंगलामध्ये सिंह, बिबट्या आणि अस्वल यांसारखे भयंकर प्राणी राहतात. मुद्दाम अडचणींना आमंत्रण देणं, हा कुठला शहाणपणा आहे. परंतु ते राजकुमार महेशच काही ऐकायला तयार नव्हते. ते राजकुमारी च्या नजरेत स्वतःला शूर सिद्ध करू इच्छित होते.
राजकुमारी सुद्धा महेशच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत पुढे पुढे चालू लागली. ते सर्व राजकुमार राजकुमारी समोर मोठेपणा करत पुढे पुढे चालू लागले. तेवढ्यातच समोरून एका उग्र वाघाची गर्जना ऐकू आली. वाघ राजकुमारीवर त्याची नजर ठेवून होता. वाघाला पाहून राजकुमारी घाबरली. तिने तिच्या आयुष्यात कधीच असा वाघ पाहिला नव्हता. महेश धावत धावत जाऊन राजकुमारी समोर उभा राहिला.
आता वाघाची दृष्टी राजकुमारी वरून हटून महेश्वर आली होती. महेश राजकुमारीला म्हणाला, हे राजकुमारी तू इथून पळून जा. तेव्हापर्यंत मी या वाघाला थांबवण्याचा प्रयत्न करतो. राजकुमारांनी पाहिलं की, वाघ एकदम जवळ आला आहे. तेव्हा ती भीतीने थरथरू लागले. सर्व राजकुमारांनी राजकुमारीला म्हटलं, राजकुमारी तुम्ही आमच्या सोबत चला. आपण इथून पळून जाऊ, नाहीतर हा वाघ आपला सर्वांना खाऊन टाकेल.
मित्रांनो, त्या सर्व राजकुमारांचं बोलणं ऐकल्यानंतर राजकुमारी म्हणाली. तुम्ही सर्वजण निघून जा मी महेश ला एकट्याला सोडून इथून कुठे जाऊ शकत नाही. मित्रांनो, ते सर्व राजकुमार महेश आणि राजकुमारीला तिथेच सोडून निघुन गेले. वाघाने महेश वर हल्ला केला. महेश गंभीर जखमी झाला होता. तेव्हापर्यंत महेश काय पाहतो की, राजाचे अनेक सैनिक तिथे आले व त्या सैनिकांनी त्यांच्या बाणाने वाघाला गंभीर जखमी करून टाकले. वाघ मेला होता, महेश उठला आणि राजकुमारी जवळ गेला. राजकुमारीने महेशला त्याच्या प्रकृती बद्दल विचारले.
तेव्हा महेश म्हणाला, मी ठीक आहे. सैनिक म्हणाले, वाटेत आम्हाला काही राजकुमार पळून जाताना दिसले. त्यांनी आम्हाला सांगितलं की, तुम्ही संकटात अडकले आहात. आणि म्हणूनच आम्ही इथे आलो आहोत. अशा प्रकारे ते सर्वजण घरी परत आले. दुसऱ्या दिवशी राजकुमारी महेश ला भेटण्यासाठी त्याच्याजवळ गेली. आणि विचारू लागली. सर्व काही ठीक तर आहे ना. मी तुला माझा निर्णय सांगण्यासाठी आले आहे. तेव्हा महेशने उत्साहाने विचारले. अच्छा मग तुम्ही कोणाची निवड केली आहे. गायक, नर्तक, धनुर्धर शास्त्रज्ञाता की, तू सुंदर राजकुमार निवडला आहेस.
राजकुमारी म्हणाली, महेश यापैकी मी कोणालाही माझा वर म्हणून निवडलेले नाही. यापैकी कोणीही माझा पती बनण्या योग्य नाही. मी अशा व्यक्तीची निवड केली आहे. जो स्वतःपेक्षा माझ्या आयुष्याला जास्त महत्त्व देतो. महेश ने डोकेवर करून राजकुमारीच्या चेहऱ्याकडे पाहिले. आणि म्हणाला, तू खरं म्हणत आहेस का? राजकुमारी म्हणाली, हो महेश. मी खरं बोलत आहे. मी तुलाच माझ्या नवऱ्याच्या स्वरूपात निवडले आहे.
आता मला तुझ्या मनात काय आहे. हे जाणून घ्यायचे आहे. तू मला तुझ्या जीवनसाथीच्या स्वरूपात स्वीकार करशील का? महेशच्या डोळ्यांमध्ये अश्रू आले होते. महेश म्हणाला राजकुमारी मी नेहमीच तुझ्यावर मनापासून प्रेम केले आहे. तुम्ही मला तुमच्या योग्य समजून मला या जगातील सर्वात भाग्यवान व्यक्ती बनवले आहे. मित्रांनो, अशा प्रकारे राजकुमारीने तिच्या मनातील सर्वकाही तिच्या वडिलांना सांगितले. आणि वडिलांनी सुद्धा खूपच आनंदाने धुमधडाक्याने राजकुमारीचा विवाह महेश सोबत लावून दिला. या सर्व कार्यक्रमांमध्ये, समस्त प्रजेने वधू वराचेे खूपच कौतुक केले.
तात्पर्य
मित्रांनो, खूपच आनंदाने दोघेही नवरा बायको त्यांचे जीवन जगू लागले. त्यानंतर तिथे असलेले सर्व राजकुमार निराश होऊन, त्यांच्या त्यांच्या राज्यात परत निघून गेले. मित्रांनो, या कथेच तात्पर्य हेच आहे की, जे पण एक दुसऱ्यासाठी नेहमी समर्पण करत असतात. एक दुसऱ्यासाठी जगत असतात. वास्तविक पाहता हेच खरे प्रेम असते. मित्रांनो, ही कथा तुम्हाला कशी वाटली, कमेंट मध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरु नका. भेटूया पुढच्या अशाच एका ज्ञानवर्धक व्हिडिओमध्ये, एका नवीन चर्चेसह. तोपर्यंत तुम्हा सर्वांचे मनःपूर्वक आभार. श्री स्वामी समर्थ, जय श्रीराम, जय श्री हनुमान, जय श्रीकृष्ण, जय माता लक्ष्मी….